मोहोळ : चिंचोली काटी येथे राहणाऱ्या लहान मुलगा येथून अडीच महीन्यापूर्वी हरवला होत हरवलेल्या लहान मुलास किकराया तेलंगाना येथून सायबर सेलच्या सहकार्याने शोधून काढण्यास मोहोळ पोलिसांना यश मिळाले. शुक्रवारी (ता. 31) दुपारी त्यास मोहोळ पोलिस ठाण्यात त्याच्या नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आले. त्याच्या आईने अडीच महिन्यानंतर मुलगा दिसल्याने मुलास कडकडून मिठी मारली. Abducted child rescued from Telangana; mother killed him with a tight hug on seeing the child Solapur Mohol Vikirabad
हा मुलगा ११ एप्रिल रोजी एमआयडीसी चिंचोली काटी येथून हरवला होता. त्याचे आजोबा प्रकाश कुंची कोर यांनी याबाबत मोहोळ पोलीस ठाण्यात ११ जानेवारी रोजी पर्यंत दाखल केली होती. त्याबाबत मोहोळ पोलीस त्याचा सर्वत्र कसून तपास करत होते. परंतु त्याचे धागेदोरे लागत नव्हते . सपोनि खारगे व शरद ढावरे यांच्याकडे तपास आल्यानंतर त्यांनी चिंचोली काटी, विडी घरकुल, सोलापूर, लातूर, पंढरपूर, तुळजापूर, तसेच बुधडा जिल्हा उस्मानाबाद या ठिकाणी जाऊन संशयित लोकांकडे विचारपूस करून आरोपी व मुलाचा कसून शोध घेतला. तसेच संशयित लोकांचे मोबाईल कॉल डिटेल ही तपासले तरीही याचा तपास लागेना.
त्यांनी या केसचा सखोल अभ्यास करून त्यातील संशयित नंबरची सायबर सेल कडून संपूर्ण माहिती करून घेतली. त्याचा अभ्यास केला असता त्याचे लोकेशन हे तेलंगणा राज्यातील विकीराबाद या ठिकाणी असल्याचे दिसून आले.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
पोलिस निरिक्षक विनोद घुगे यांच्या मार्गदर्शनानुसार पोसई खारगे व शरद ढावरे यांनी जिल्हा विकीराबाद ( तेलंगणा) या ठिकाणी जाऊन संशयित मोबाईल क्रमांकाच्या संपर्कात असणाऱ्या लोकांची माहिती घेतली . मोबाईल क्रमांकाच्या संपर्कात असणाऱ्या व्यक्तींना ताब्यात घेऊन सदर मुलगा व आरोपी बाबत चौकशी केली. मुलगा व आरोपी हे रंगारेड्डी येथील एका हॉटेलात व स्क्रॅप दुकानात काम करत असल्याची माहिती त्यांच्या कडून मिळाली.
या माहितीच्या आधारे मुलगा मिळालेल्या माहितीच्या आधारे त्या ठिकाणी आहे, का याची खात्री केली. मुलगा स्क्रपच्या दुकानात प्लास्टिक बाटल्या गोळा करीत होता. मग त्या मुलास पळवून नेणारा इसम सापडणे ही महत्वाचे होते. मुलगा हा एमआयडीसी चिंचोली या ठिकाणचा राहणारा असून आरोपी हा त्याच्या घराशेजारी राहण्यास होता व तो एमआयडीसी मिळेल ती मजुरी करीत होता. त्याने त्या लहान मुलास मोबाईल घेऊन देतो असे सांगून अडीच महिन्यापूर्वी पळवून नेले होते. सदर आरोपी हा चिंचोली एमआयडीसीत मिळेल ते काम करीत होता.
त्यामुळे विकिराबाद या ठिकाणी जाऊन संशयित मोबाईल क्रमांकाच्या संपर्कात असणाऱ्या लोकांची माहिती घेऊन सदर माहिती ही अतिशय गोपनीय ठेवून सदर इसमाना ताब्यात घेतले. सदर मुलाबाबत व आरोपीबाबत त्यांच्याकडे चौकशी केली असता मुलगा व आरोपी हे रंगारेड्डी येथील एका हॉटेलात व स्क्रॅप दुकानात काम करत असल्याची सदर इस्मानी माहिती दिल्याने लागलीच सदर व त्या मुलास पठवून नेणारा किसन दुबया सामलेटी यास पकडण्यात ही यश मिळाले.
पोलिस त्यास घेवून त्या लहान मुलाकडे गेले व आम्ही पोलिस आहोत सोलापूर वरून तुला नेण्यासाठी आलो आहे, असे म्हणताच त्या लहान मुलाने पोलिसांनाच मिठी मारली. २ महिन्यात झालेल्या त्रासाची कहाणीच त्याने कथन केली व सर्व हकीकत रडून कथन केली. त्या लहान मुलाला झालेला दोन महिन्यातील त्रास ऐकून तेथील लोक ही चकित झाले. त्यास मोहोळ येथे आणून पोसई खारगे व पो हे .कॉ .शरद ढावरे यांनी नातेवाइकांच्या ताब्यात दिले. एखाद्या चित्रपटात शोभेल असा हा प्रसंग घडला. त्यामुळे मोहोळ पोलिसांचे विशेष अभिनंदन करण्यात येत आहे.