○ अधिकाऱ्यांसमवेत घेतली बैठक; अडचणी व आव्हाने
सोलापूर : सोलापूर शहराला सुरळीत व नियमित पाणीपुरवठा करण्यासाठी शहराच्या पाणीपुरवठ्याचा इतिहास आणि भूगोल जाणून घेत महापालिका आयुक्तांनी मास्टर प्लॅन तयार केला आहे. Water schedule in five divisions of Solapur city for smooth water supply! Meetings officers staff difficulties challenges संबंधित अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेत शहराचे पाच विभागाअंतर्गत पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक ही तयार केलं आहे. चार दिवसाआड नियमित आणि सुरळीत पाणीपुरवठा व्हावा यासाठी अभ्यासाअंती हा कृती आराखडा करण्यात आला आहे.
सोलापूर महापालिका आयुक्त शितल तेली – उगले यांनी शुक्रवारी (ता. 31 मार्च) विभाग प्रमुख व सर्व कनिष्ठ अभियंता यांची महत्त्वाची बैठक घेतली. या बैठकीत महापालिका आयुक्त शितल तेली – उगले यांनी सोलापूर शहराच्या पाणीपुरवठ्याचा गेल्या अनेक वर्षापासूनचा इतिहास जाणून घेतला. पाणीपुरवठ्यातील अडचणी व आव्हाने काय आहेत ? याचा अभ्यास केला. सन 2000 पासून सोलापूर शहराला साधारणतः चार दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. हा पाणीपुरवठा नियमित आणि सुरळीत कसा होईल ? यासंदर्भात महापालिका आयुक्त शितल तेली – उगले यांनी या बैठकीत एक “मास्टर प्लॅन” तयार केला. सर्व कर्मचारी – अधिकाऱ्यांना त्यासंदर्भात सूचनाही दिल्या.
○ पाणी उद्भावापासून लांब असलेले एकमेव शहर !
पाणी उद्भवापासून 110 किलोमीटर अंतर लांब असलेले सोलापूर शहर हे एकमेव असल्याचे दिसून येते. सोलापूर शहराला सोलापूर शहराचे 178 स्क्वेअर किलोमीटर क्षेत्रफळ आहे. सुमारे 12 लाख लोक या शहरात राहतात. घनता कमी आहे, असे महापालिका आयुक्त शितल तेली – उगले यांनी सांगितले.
● या आहेत अडचणी व आव्हाने
सन 2000 पासून सोलापूर शहराला चार दिवसाआड पाणीपुरवठा केला जातो. यामध्ये अधून मधून विस्कळीतपणा होत असल्याचे दिसून येते. त्याची विविध कारणे आहेत. सोलापूर शहराचे 178 स्क्वेअर किलोमीटर क्षेत्रफळ असून सुमारे 12 लाख लोक राहतात. शहराची घनता कमी आहे. पाण्याची साठवण क्षमताही कमी आहे. उंचावरील टाक्या आहेत. जलवाहिनीच्या लांबी जास्त आहे. लोकसंख्या वाढली मात्र अद्यापही काही ठिकाणी जुन्या चार इंची पाईपलाईन आहेत. बोगस नळ कनेक्शन आढळून येतात. पाणी गळती आणि पाणी चोरीचेही प्रमाण आहे.
○ सुरळीत पाणीपुरवठ्यासाठी हा आहे कृती आराखडा !
सोलापूर शहराला नियमित आणि सुरळीत पाणीपुरवठा होण्यासाठी महापालिका आयुक्त शितल तेली – उगले यांनी एक मास्टर प्लॅन तयार केला. या कृती आराखड्यानुसार लवकरच पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. यामध्ये पाणीपुरवठ्यासाठी शहराचे 5 विभाग करण्यात आले आहेत. त्याचे वेळापत्रकही बनवले. कुठल्या टाकी वरून कोणत्या वारी, कोणत्या नगरांना पाणीपुरवठा केला जाणार आहे ? याचेही नियोजन केलं आहे. झोन अधिकारी, कनिष्ठ अभियंता, चावीवाला यांच्या कामाचे चार्ट (आराखडा) तयार केला आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
○ पाण्याचे वेळापत्रक झोननिहाय लावणार !
सोलापूर शहराला चार दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचे नियोजन केले आहे. सोलापूर शहरातील विविध विभागातील नगरांमध्ये कधी पाणीपुरवठा होणार ? या संदर्भातले वेळापत्रक ही तयार करण्यात आले आहे. त्याचे चार्ट प्रत्येक झोन निहाय लावण्यात येणार असल्याचे महापालिका आयुक्तांनी सांगितले.
○ तक्रार निवारण केंद्र !
सोलापूर शहरातील विविध भागात पाणीपुरवठा संदर्भात तक्रारी व अडचणी असल्यास त्याचे निराकरण करण्यासाठी तक्रार निवारण केंद्र महापालिकेत स्थापन करण्यात येत आहे. या ठिकाणी तीन कर्मचारी तैनात असतील. आलेल्या तक्रारीची नोंद करून त्या – त्या विभागाला कळविण्याची जबाबदारी या केंद्राकडे सोपवण्यात आली आहे.
○ सोलापूर शहरात चालू स्थितीत 3076 हातपंप !
सोलापूर शहरात एकूण 3 हजार 589 हातपंप / विंधन विहीर असून त्यापैकी 3076 चालू स्थितीत आहेत. 400 हात पंपांची दुरुस्ती केली आहे तर 187 हातपंप आहे. कायम बंद आहेत. त्याचे जल पुनर्भरण करण्याचे आदेशही दिले आहेत. इलेक्ट्रिक पंप बोअरवेअरची संख्या एकूण 97 असून त्यापैकी 25 हे बंद अवस्थेत आहेत तर 72 चालू स्थितीत आहेत. बंद अवस्थेतील हे बोअरवेल दुरुस्त करण्याच्याही सूचना दिल्या आहेत, असे महापालिका आयुक्तांनी स्पष्ट केले.
○ संबंधित अधिकाऱ्यांनी नियोजनानुसार काम करणे बंधनकारक !
सोलापूर शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी जे वेळापत्रक व नियोजन करण्यात आले आहे, त्यानुसार संबंधित कर्मचारी व अधिकाऱ्यांनी अंमलबजावणी करणे बंधनकारक आहे. तसे न केल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा महापालिका आयुक्त शितल तेली – उगले यांनी दिला आहे.
○ साठवण क्षमता वाढल्यास एक दिवसाने पाणीपुरवठा कमी होईल !
सोलापूर शहराला विविध भागात चार दिवसाआड सध्या पाणीपुरवठा होतो. भविष्यात साठवण क्षमता वाढविल्यास तसेच उजनीतून 170 एमएलडी पाणी आल्यानंतर पाणीपुरवठा एक दिवसाने कमी होईल तर काही भागात दोन दिवस कमी होऊ शकतील. तूर्तास तरी रोज पाणीपुरवठा शक्य नाही. स्काडा प्रणालीचे काम एप्रिल अखेरपर्यंत पूर्ण होईल.
● उर्वरित सार्वजनिक नळही बंद करण्याचे आदेश
अमृत व इतर योजनांच्या अनुदानासाठी सोलापूर शहरातील सार्वजनिक नळ बंद करणे अपरिहार्य आहे. यामुळे सार्वजनिक नळ बंद करण्यात येत आहेत. उर्वरित सार्वजनिक नळही बंद करण्याचे आदेश दिलेले आहेत. नवीन नळ कनेक्शन सुलभ पद्धतीने देण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.
○ पाणीपुरवठ्यासंदर्भात सूचनांचे स्वागत !
सोलापूर शहराला नियमित, सुरळीत पाणीपुरवठा व्हावा हा प्रमुख उद्देश आहे आणि त्यासाठी निवृत्त अधिकारी, अनुभवी लोकप्रतिनिधी, त्याचबरोबर ज्यांना या संदर्भात माहिती आहे अशा व्यक्तींनी अथवा संस्थांनी सूचना केल्यास त्यांचे स्वागत आहे. त्यांनी आपल्या सूचना थेट आयुक्तांकडे करू शकतात, असे आवाहनही महापालिका आयुक्त शितल तेली – उगले यांनी केले आहे.