सोलापूर : माढा लोकसभा मतदारसंघातून भाजपने जर मोहिते-पाटील यांना तिकिट दिले, तर आम्ही प्रामाणिकपणे त्यांच्या पाठीशी उभे राहून प्रचार करू, असे माढ्याचे खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी स्पष्ट केले. If Mohite-Patal is nominated, he will campaign, says MP Nimbalkar Solapur Akluj Madha Lok Sabha
माढ्याचे खासदार निंबाळकर हे मंगळवारी माढा मतदारसंघाच्या दौऱ्यावर होते. त्यावेळी माढ्यात पत्रकारांशी बोलताना त्यांना लोकसभा उमेदवारीबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता, त्यावेळी निंबाळकर बोलत होते. ते पुढे म्हणाले, भाजपमध्ये लोकशाही आहे. भाजपला वाटलं, उद्या माढ्यातून अन्य व्यक्तीला तिकिट द्यावे. नाव घेऊन सांगायचे झालं तर मोहिते -पाटील यांना तिकिट द्यावं, असे पक्षाला वाटले तरी काही गैर नाही. त्यांना जरी तिकिट दिलं तर आम्ही प्रामाणिकपणे मोहिते-पाटील यांच्या पाठीमागं उभे राहणार आहोत.
त्यामुळे पक्षात वाद होण्याची कोणतीही चिन्हे नाहीत. माझी शंभर टक्के कामे झाली आहेत, त्यामुळे पाच वर्षांच्या कामावर मी पूर्णपणे समाधानी आहे. त्यामुळे भाजपचा कार्यकर्ता असून पक्ष जे सांगेल ते काम मी करणार आहे, असेही खासदार निंबाळकर यांनी नमूद केले.
○ सर्वांनी एकत्र फिरावे असे काही नाही
रणजितसिंह निंबाळकर म्हणाले की, रणजितसिंह मोहिते-पाटील हे आमदार आहेत. सर्वांनी एकत्र फिरावे, असे काही नाही. पक्षाच्या वेगवेगळ्या जबाबदाऱ्या असतात. त्यांना सांगोल्याची जबाबदारी दिली होती, त्यांनी त्या ठिकाणी काम करावे. मी काल दिल्लीत होतो, आज कार्यक्रमानिमित्त माढ्यात यावे लागले.
○ निंबाळकर यांच्या विधानामागचे कारण काय ?
मध्यंतरी दिल्लीत माढ्याचे आ. बबनराव शिंदे आणि माजी आ. राजन पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. त्या भेटीमागे निंबाळकर असल्याची चर्चा होती. मोहिते-पाटील यांना शह देण्यासाठी निंबाळकर हे शिंदे यांच्याशी जवळीक साधत आहेत, अशी चर्चाही राजकीय वर्तुळातून होत असते. त्यामुळे निंबाळकर यांच्या आजच्या विधानामागचे कारण काय अशी चर्चा मतदारसंघात होत आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
》 प्रा. अशोक निंबर्गी – सुरेश पाटील पाच वर्षांनी एकत्र; आता मतभेद, कटुता नसल्याचे दोघांचे स्पष्टीकरण
सोलापूर : भाजपाचे माजी शहराध्यक्ष प्रा. अशोक निंबर्गी आणि माजी सभागृह नेते सुरेश पाटील हे तब्बल ५ वर्षांनी एकत्र एका व्यासपिठावर पाहावयास मिळाले निमित्त होते बसवंती स्मृती पुरस्कार पत्रकार परिषदेचे. या पत्रकार परिषदेत प्रा. निंबर्गी आणि सुरेश पाटील या दोघांनीही आता आमच्यामध्ये आता कोणतीही कटूता राहिली नसल्याचे स्पष्टीकरण दिले.
बसवंती पुरस्काराचे आयोजन १० एप्रिल रोजी करण्यात येणार आहे या निमित्त मंगळवारी श्रमिक पत्रकार संघात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या पत्रकार परिषदेला प्रा. अशोक निंबर्गी, माजी सभागृह नेते सुरेश पाटील, मयूर बसवंती आदी उपस्थित होते.
काही वर्षांपूर्वी सुरेश पाटील यांनी आपल्यावर विष प्रयोग झाला असून त्यामध्ये प्रा.निंबर्गी यांच्यासह पाचजणांचा समावेश असल्याचा आरोप केला होता. यानंतर भाजपमध्ये बराच गदारोळ झाला होता. ही घटना पाच वर्षांपूर्वी घडली होती. या घटनेपासून सुरेश पाटील आणि निंबर्गी यांच्यात दुरावा आला होता. मात्र बसवंती स्मृती पुरस्काराच्या पत्रकार परिषदेच्यानिमित्ताने हा दुरावा मिटल्याचे दिसून आले.
यावेळी सुरेश पाटील म्हणाले की, आपल्यात आणि अशोक निंबर्गी यांच्यात आता कोणतीही कटुता राहिली नाही. झाले गेले गंगेला मिळाले. आपल्यावर विष प्रयोग झाला आणि तो करण्यामागे प्रा. निंबर्गी यांच्यासह आपण काही जणांची नावे घेतली.