सोलापूर : नवीन आर्थिक वर्षाच्या अनुषंगाने बार अँड रेस्टॉरंटच्या स्टॉक रजिस्टर व ब्रँड रजिस्टर वर शिक्के मारण्यासाठी तीन हजारांची लाच घेताना एक्साईजच्या निरीक्षकासह तिघांवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली आहे. Three Excise inspectors caught in ‘ACB’s net while taking bribes Anti-corruption department Solapur
निरिक्षक संभाजी साहेबराव फडतरे, कॉस्टेबल प्रियंका बबन कुटे, सहा. दुय्यम निरीक्षक सिद्धाराम अंदेनप्पा बिराजदार असे राज्य उत्पादन शुल्क विभागातील कर्मचार्यांची नावे आहेत. अधिक माहिती अशी की, तक्रारदार यांचे बार अँड रेस्टॉरंट असून बार अँड रेस्टॉरंटच्या अनुषंगाने असलेले स्टॉक रजिस्टर व ब्रँड रजिस्टरमध्ये नवीन आर्थिक वर्षाच्या अनुषंगाने राज्य उत्पादन शुल्क विभाग येथून शिक्के मारून घेण्यासाठी (प्रमाणित करून) देण्याकरिता विभागातील महिला जवान प्रियांका कुटे व बिराजदार यांनी स्वतःसाठी व साहेबांसाठी चार हजारांची लाचेची मागणी केली.
निरीक्षक फडतरे यांनी सदर लाच रक्कमेमध्ये तडजोड करून तीन हजार रुपये रक्कम कुटे यांच्याकडे देण्यास सांगितले. त्यानंतर गुरूवारी सापळा रचून केलेल्या कारवाईमध्ये कुटे यांनी लाच रक्कम स्वीकारली. याप्रकरणी तिन्ही आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.
ही कारवाई पोलीस उपअधीक्षक गणेश कुंभार, पोलिस निरीक्षक उमाकांत महाडिक, पोलीस अंमलदार सोनवणे, घाडगे, मुल्ला, किनगी, पवार, घुगे व चालक उडानशिव यांनी केली.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
Visit us : www.surajyadigital.com
》 द्राक्ष बाग फेल गेल्याने शेतकऱ्याची आत्महत्या, मोहोळ तालुक्यातील मनगोळी येथील दुर्दैवी घटना
सोलापूर : द्राक्षाला दर नसल्याने, तसेच चालू वर्षी बाग ‘फेल’ गेल्याने बाग लागवडीसाठी घेतलेले खासगी व विविध बँकांचे कर्ज कशाने फेडावयाचे या धास्तीने एका ३५ वर्षीय शेतकऱ्याने त्याच्याच शेतातील आंब्याच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी (दि. ४ एप्रिल) दुपारी एक वाजण्याच्या सुमारास घडली.
सचिन अशोक खांडेकर (वय ३५, रा. मनगोळी, ता. मोहोळ) असे गळफास घेतलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सचिन खांडेकर यांनी तीन वर्षांपूर्वी द्राक्ष बाग लागवड केली आहे. बागेची लागवड करताना खर्चासाठी त्यांनी खासगी व विविध बँकांचे कर्ज घेतले होते. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून द्राक्षाला दर नसल्याने तसेच बाग फेल गेल्याने बँकाच्या कर्जाचे हप्ते वेळेत न गेल्याने सचिन हा निराश होता. .
तसेच चालू वर्षी अवकाळी पाऊस पडल्याने व पिकाचे नुकसान झाल्याने तो जास्तच निराश होता. दरम्यान, मंगळवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास राहुल शेंबडे यांना बबलू रमेश खांडेकर यांनी सचिन याने त्याच्या शेतातील आंब्याच्या झाडाला दोरीच्या सहाय्याने गळफास घेतल्याचे सांगितले, तातडीने सचिन यास मोहोळ येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून त्याला मृत झाल्याचे घोषित केले.