सोलापूर : माजी मंत्री स्वर्गीय दिनानाथ कमळे गुरुजी यांनी स्थापन केलेल्या सोलापूर जिल्हा समाजसेवा मंडळाच्या चौदा संचालकाचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने गुरुवारी (ता. 6) फेटाळला. Government fraud: Court rejects bail of fourteen directors of Solapur District Social Service Board
संस्थेत शिक्षक भरती करता यावे, तसेच केवळ स्वतःच्या अर्थिक फायद्यापोटी अल्पसंख्यांक मंत्रालय महाराष्ट्र शासनाकडून अल्पभाषिक कन्नड दर्जाचे प्रमाणपत्र मिळविणेसाठी संचालक मंडळाने स्वतःच्या शाळा सोडल्याच्या दाखल्यात खाडाखोड करुन शासन दरबारी खरे असल्याचे भासवून प्रमाणपत्र मिळविले. तसेच संस्थेखाली शाळेत १४ लोकांची शिक्षकपदी नेमणूक करुन अंदाजे २ कोटी ७५ लाख रुपयाचा फायदा करुन घेत, शासनाची व जनतेची गंभीर फसवणूक केली.
याप्रकरणी पुंडलिक ऊर्फ प्रकाश लायप्पा कोळी, चनगोंडा गुरुसिध्दप्पा हविनाळे, विठ्ठल कामागोंडा पाटील, महादेव धरेप्पा कमळे, बुऱ्हाणद्दीन अमिनसाब जमादार, सलाप्पा रेवाप्पा अंकलगी, तुकाराम लायप्पा कोळी, संदेश पुंडलिक ऊर्फ प्रकाश कोळी, रचना पुंडलिक ऊर्फ प्रकाश कोळी, उमाकांत बापुराव डांगे, लकण्णा सोमण्णा कोळी, बसवंत महादेव भरले, काशिनाथ नामदेव कोळी, भारती पुंडलिक ऊर्फ प्रकाश कोळी या संचालक मंडळाने अटकपूर्व जामीनसाठी जिल्हा न्यायालयात अर्ज दाखल केला होता.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
संचालक मंडळानी संगनमताने समाज विघातक कृत्य केले असून, सखोल तपास होणे गरजेचे आहे, असे ताशेरे ओढत वरील संचालक मंडळांच्या अटकपूर्व जामीन फेटाळला. यात फिर्यादी नागेश बिराजदार तर्फे अड. नागेश खिचडे, यांनी, आरोपीतर्फे ॲड. शशि कुलकर्णी तर सरकारतर्फे ॲड. शितल डोके यांनी काम पाहिले.
》 महिला पोलिसाची आत्महत्या; पतीसह चौघांवर गुन्हा दाखल
सोलापूर – माहेरातून पैसे आणण्यासाठी सासरी होणाऱ्या छळाला कंटाळून महिला पोलिसाने गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी पतीसह चौघांवर माढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
‘मोहोळ पोलीस ठाण्यात कार्यरत असणाऱ्या स्वाती भगतसिंग घोगरे (वय ३५) असे आत्महत्या केलेल्या महिला पोलिसाचे नाव आहे. तिचे वडील दत्तात्रय विश्वनाथ अंबुरे (रा. समर्थनगर, बाळे) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सासरे भारत नवनाथ घोंगरे, सासू- मंगल भारत घोगरे, पती- भगतसिंग भारत घोगरे, दीर- विजय भारत घोगरे (सर्व रा. शिवाजीनगर, माढा) यांच्याविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे.
● विवाहितेवर दुष्कर्म; दोघांवर गुन्हा
सोलापूर – नैसर्गिक विधीसाठी गेलेल्या एका विवाहित महिलेवर शेजारीच राहणाऱ्या तरुणाने दुष्कर्म केल्याची घटना तालुक्यातील एका गावात घडली होती. पीडितेच्या कुटुंबाने त्या तरुणाकडे दुधाचा रतीब लावला असल्याने त्यांचे येणे-जाणे व ओळख होती. पीडिता झाडीमध्ये नैसर्गिक विधीसाठी गेली असता शुभम मोटेने दुष्कर्म केले. शुभम व त्याचा मित्र अभिषेक काळे हे दोघे तेथे आले व शुभमने पीडितेला मला तू लई आवडतेस असे म्हणत तिच्यावर दुष्कर्म केले.