○ गौतमीचा कार्यक्रम ठरतोय पोलिसांसाठी डोकेदुखी
वेळापूर : गौतमी पाटीलचा कार्यक्रम पोलिसांसाठी डोकेदुखीचा विषय बनत चालला आहे. गौतमीचा कार्यक्रम झाला आणि राडा झाला नाही झाला तर नवलच. Gautami Patil’s program in Solapur, Soumya Lathimar, velapur Malshiras वेळापूर येथील कार्यक्रमात गौतमीचे नृत्य सुरु असताना चाहत्यांनी पुन्हा हुल्लडबाजी केल्याचा प्रकार घडला आहे. पोलिसांनी प्रेक्षकांना शांत ठेवण्याचा खुप प्रयत्न केला. पण हजारोंच्या संख्येने जमाव असल्याने परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीचार्ज करावा लागला.
वेळापूर येथील गौतम पाटीलच्या कार्यक्रमात पहिल्या गाण्यावरच बेभान होऊन नाचत असतानाच कार्यक्रमात काही तरुण नाचू लागल्याने कार्यक्रमात व्यत्यय झाला. पोलिसांनी शांततेचे आवाहन करूनही तरुणांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याने पोलिसांनी प्रेक्षकात घुसून नाचणाऱ्या व हुल्लडबाजी करणाऱ्या तरुणांनावर सौम्य असा लाठी मार केला. त्यानंतर कार्यक्रम सुरळीत पार पडला.
बुधवारी (ता. 5) रात्री वेळापूर (ता. माळशिरस, जि. सोलापूर) पालखी मैदान येथे अर्धनारी नटेश्वर यात्रा सोहळ्यानिमित्त यात्रा कमिटीच्या वतीने गौतमी पाटील यांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला दोन हजारच्या आसपास महिलांची व पुरुषांची आणि तरुणांची पंधरा ते सोळा हजाराच्या वर प्रेक्षकांनी पालखी मैदान तुडुंब भरले होते. गौतमी पाटील यांच्या कार्यक्रमासाठी अर्धनारी नटेश्वर यात्रा कमिटीच्या वतीने असे नियोजन केले उत्तम असे होते.
कार्यक्रमासाठी उंच व भव्य असे स्टेज बनवण्यात आले होते तर स्टेज व प्रेक्षक यांच्यामध्ये अंतर ठेवून संपूर्ण स्टेज चारी बाजूने बॅरेकेट लावून वेळापूर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी निलेश बागाव हे स्वतः कार्यक्रमाच्या शेवटपर्यंत उपस्थित होते. त्याचबरोबर २५ पोलीस व होमगार्ड यांच्यासमवेत कडक बंदोबस्त ठेवल्याने हुल्लडबाजी करणाऱ्या तरुणांना वर अंकुश ठेवण्यासाठी बॅरेकेट व प्रेक्षकांमधून पोलीस उभा केल्याने गाण्यावर नाचण्यासाठी उतावीळ असलेल्या तरुणांना पोलिसांची अडचण झाली होती.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
रात्री आठ तीस वाजता गौतमी पाटील यांचे स्टेजवर आगमन होताच राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्ह्याचे नेते उत्तमराव जानकर यांच्या हस्ते गौतमी पाटील यांचा सन्मान करण्यात येऊन उत्तमराव जानकर यांच्या हस्ते श्रीफळ फोडून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. जवळ जवळ दोन तास कार्यक्रम चालला. त्यामध्ये गौतमी पाटील यांच्यासह या पथकातील आठ ते नऊ तरुणींनी १५ ते २० गाण्यावर अदाकारी सादर केली. तर गौतमी पाटील यांनी चार बहारदार अशी गाणी नाचून ठेका धरून तरुणाईला घायाळ केले.
या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्ह्याचे नेते उत्तमराव जानकर, माजी सरपंच विमलताई जानकर, जिप सदस्य बाळासाहेब धाईंजे, शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष अजित बोरकर, पांडुरंग वाघमोडे माजी जिल्हा नियोजन समिती सदस्य ज्ञानेश्वर मुंडफणे, काकासाहेब पाटील, कचरेवाडी उपसरपंच, मार्केट कमिटीचे माजी संचालक दादासाहेब घाडगे, संदीप माने देशमुख, अश्विनी भानवसे, डॉक्टर जयंत चव्हाण, तानाजी जगदाळे, मोहन कचरे, विष्णुपंत गोरड, मच्छिंद्र गोरड, विकास देशमुख, साजिद सय्यद, वेळापूर सरपंच रजनीश बनसोडे, उपसरपंच तानाजीकाका चव्हाण, यात्रा कमिटीचे अध्यक्ष मिलिंद सरतापे, कार्याध्यक्ष विनायक माने, खजिनदार जावेद मुलाणी, उपाध्यक्ष धनंजय शिवपूजे, जीवन जानकर, अमोल पनासे यांच्यासह १६ ते १७ हजार प्रेक्षक गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाला उपस्थित होते.