पंढरपूर – बंदी असणार्या गांजाची उघडपणे शेती करणार्या तालुक्यातील शेवते येथील संशयित आरोपीच्या शेतात पोलिसांनी छापा टाकून तब्बल १६ लाख २२ हजार रूपयांचा ८० किलो गांजा ताब्यात घेतला आहे. मागील अनेक वर्षातील ही गांजावरील मोठी कारवाई आहे. Good price for hemp, cultivation of hemp in Pandharpur; Cannabis plants worth 16 lakhs confiscated police action
या प्रकरणी संतोष चंद्रशेखर पुरी या गांजाची शेती करणार्या शेतकर्याला ताब्यात घेण्यात आले आहे. पंढरपूर तालुक्यातील करकंब पोलीस ठाण्यात अंतर्गत येणार्या शेवते येथील संतोष पुरी हा आपल्या शेतात गांजाची शेती करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार शुक्रवारी (ता. 14) दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास पोलिसांच्या पथकाने तेथे छापा टाकला असता बंदी असणारा गांजा तसेच नशाकारक वनस्पतीची तब्बल २१० झाडे आढळून आली.
विशेष म्हणजे नवीन लागवडीसाठी तयार केलेली २६३ रोपं व काही दिवसापूर्वीच लागवड केलली ८० रोप ठिबक पाइपसह आढळून आली. यावरून संतोष पुरी हा बिनधास्तपणे गांजाची शेती करीत असल्याचे आढळून आले.
दरम्यान गांजाला बाजारात मोठी मागणी असून सध्या याचा २० हजार रूपये किलो दर आहे. पुरी याच्या शेतातील २१० झाडांचा गांजा एकत्र केला असता याचे ८० किलो वजन भरले. याची १६ लाख रूपये किंमत असून ४ हजार २०० रूपयांची २६३ रोपं व २ हजार ४०० रूपयांची ८० लागवड केलेली रोपं असा एकूण १६ लाख २२ हजार ४०० रूपयांचा माल जप्त करण्यात आला आहे.
यासह पोलिसांनी अधिक तपासासाठी ३४ किलो गांजाच्या झाडांचे खोड व मुळं, गांजा लावलेल्या ठिकाणाची माती व इतर ठिकाणाची माती देखील ताब्यात घेतली आहे. मागील अनेक वर्षातील ही गांजावरील सर्वात मोठी कारवाई आहे. या प्रकरणी करकंब पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक निलेश तारू हे करीत आहेत.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
》 कौटुंबिक वादातून नवऱ्याने बायकोचे कानाचा गड्डा उपटून काढला
अक्कलकोट : अक्कलकोट तालुक्यात
कौटुंबिक वादातून नवऱ्याने बायकोचे कान धारदार हत्याराने उपटून काढल्याची घटना घडली.
आरोपी नवरा अंबाजीआप्पा व्हावण्णा जमादर (रा.उडगी) यांच्याविरूद्ध दक्षिण पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा करण्यात आला आहे.
ही घटना ५ एप्रिल रोजी सायंकाळी राहत्या घरी पडली. पोलीस सुत्राकडुन मिळालेली अधिक माहिती अशी की, पत्नी विजयालक्ष्मी हीस माझे वडिल कोठे आहेत त्यांना बघतो असे म्हणून सायंकाळी झाडलोट करीत असताना कोणत्या तरी धारदार शस्त्राने कान कापले.
नवऱ्याने रागाच्या भरात बायको विजयालक्ष्मी जमादार हिच्या कानाचा गड्डा धारदार हत्याराने उपटून काढला. शेजाऱ्यांनी मध्यस्थी करून पीडित विवाहित महिलेला अक्कलकोट येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. त्यानंतर पुढील उपचारासाठी तिला सोलापूर शहरातील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. अधिक तपास पो. नाईक मल्लिनाथ कलशेट्टी हे करीत आहेत.
○ दारुड्या पतीने संशय घेऊन केला पत्नीवर जीवघेणा हल्ला
– आर्थिक मदत करणा-यावरच घेतला पतीने संशय
मोहोळ : मोहोळ शहरातील दत्त नगर येथे पतीने पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन गळ्यावर चाकूचा वार करित जिवे मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना ही घटना ४ एप्रील रोजी सकाळी दहा वाजणेच्या सुमारास घडली.
याबाबत मोहोळ पोलिसाकडून मिळालेल्या माहितीनुसार रेशमा बाळू सरवदे यांच्या पतीस दारूचे व्यसन असल्याने दारू पिण्याच्या कारणावरून दोघात सारखे भांडण व्हायच, म्हणून त्या मोहोळ येथे माहेरी त्यांच्या आईकडे मोहोळ शहरात दत्त नगर येथे येवून राहिल्या.
काही दिवसानंतर तिचे पतीही मोहोळ येथे येऊन राहिले. मागील सहा महिन्यापूर्वी मुलीच्या डिलीव्हरीसाठी आईच्या ओळखीचे असणारे विजय रामा वडते यांच्या कडून सहा हजार रुपये हात उसने घेतले होते, ते पैसे मागण्यासाठी वडते आईच्या घराकडे येत होते.
चार एप्रील रोजी सकाळी आठ वाजणे च्या सुमारास रेशमाचे पती बाळू जगन्नाथ सरवदे गावी जातो म्हणून घरातून निघून गेले त्यानंतर सकाळी दहा वाजणेच्या सुमारास घरामध्ये रेशमा आई बहीण व इतर नातेवाई सोबत गप्पा मारत बसले असताना रेशमाचा पती बाळू सरवदे हा अचानक घरी आला .
विजय रामा वडते हा तुझ्याकडे कशासाठी येतो तुझे व त्याचे काहीतरी लफडे आहे का असे म्हणत रेशमास तुला आता जिवंत सोडत नाही, तुला मारूनच टाकतो तुला आज संपवून टाकतो असे म्हणून त्याच्या हातातील चाकूने रेशमाच्या गळ्यावर जोरात वार केला. त्यावेळी बहीण, आई बहिणीचा नवरा जोरात ओरडले व बाळूला धरत असताना तो हिसका देऊन पळून गेला. गळ्यातून रक्तस्त्राव होवू लागला. नातेवाईकांनी तातडीने ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. नंतर सोलापूर येथे रेफर करण्यात आले. रेशमा सरवदे यांनी त्यांचा नवरा बाळू जगन्नाथ सरवदे (रा पळशी ता पंढरपूर) यांच्या विरोधात मोहोळ पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.