○ उजनी जवळ विद्युत पुरवठा खंडित झाल्याने शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत
○ उजनी – सोलापूर दुहेरी जलवाहिनी कामाच्या पूर्व नियोजनासाठी आयुक्तांनी केली पाहणी
सोलापूर : उजनी जवळील माने गावाजवळ एमएसईबीच्या पोलवर वीज कोसल्यामुळे काल रात्री 9 वाजल्या पासून उजनी पंप हाऊस येथील वीजपुरवठा खंडीत झाला आहे. Water supply to Solapur city will be delayed by one day! Ujani Reservoir without power supply त्या ठिकाणी आज महापालिकेच्या आयुक्त शीतल तेली-उगले यांनी पाहणी केली.अद्यापही वीज पुरवठा सुरू नसल्याने संबंधित अधिकाऱ्यांना लवकरात लवकर वीजपुरवठा सुरू करण्यासंदर्भात सूचना दिल्या.
दरम्यान, वीजपुरवठा खंडित असल्यामुळे सोलापूर शहरातील पाणी पुरवठा विस्कळीत झाला आहे. एक दिवस पाणी पुरवठा पुढे जाणार आहे. तरी नागरिकांनी याची नोंद घ्यावी. नागरिकांना पाणी जपून वापरावे, असे आवाहन महापालिकेचे आयुक्त शीतल तेली – उगले यांनी केले.
○ दुहेरी जलवानीचे काम लवकरच होणार सुरू
उजनी – सोलापूर दुहेरी जलवाहिनी 170 एमएलडी पाणी पुरवठा योजनेचे काम लवकरच सुरु करण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने आज पूर्व नियोजनासाठी पंपिंग हाऊस, जॅकवेल,उजनी येथील इंटकवेल,नवीन होणारे 170 एमएलडीचे इंटकवेल, कॉपर डॅम, नवीन होणारे 170 एमएलडीचे बी.पी.टीची जागा, एक्सप्रेस फीडर लाईन, सध्या सुरू असलेल्या खंडाळा येथील बी.पी.टीची जागा आदी ठिकाणाची पाहाणी करून आयुक्तांनी अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या.
यावेळी अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, सार्वजनिक आरोग्य विभागाचे कार्यकरी अभियंता विजय राठोड, उपअभियंता व्यकटेश चौबे, उपअभियंता नीलकंठ मठपती, सहायक अभियंता संतोष यलगुलवार, अवेक्षक गणेश काकडे, इलेक्ट्रिक सुपरवायझर नितीन आंबीकर आदी उपस्थित होते.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
》 उजनी – समांतर जलवाहिनी कामासंदर्भात सर्व विघ्ने दूर
सोलापूर : उजनी – सोलापूर समांतर जलवाहिनी कामा संदर्भात लवादात जवळजवळ समजोता झाला आहे. येत्या पंधरा दिवसात संबंधित मक्तेदाराला सुधारित मान्यता देण्यात येईल. यातील सर्व विघ्न दूर झाले आहेत. लवकरच या जलवाहिनीचे काम सुरू करण्याचा प्रयत्न राहणार आहे, अशी माहिती पालकमंत्री राधाकृष्ण विखे – पाटील यांनी दिली.
सोलापुरात नियोजन भवन येथे आयोजित स्मार्ट सिटी व सोलापूर विकास आराखडा संदर्भात आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर, आमदार सुभाष देशमुख, आमदार समाधान आवताडे, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, महानगरपालिका आयुक्त शीतल तेली – उगले, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, महावितरणचे सांगळे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे देशपांडे आदी उपस्थित होते. यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी बैठकीत झालेल्या चर्चेसंदर्भात माहिती दिली.
उजनी – सोलापूर समांतर जलवाहिनी कामा संदर्भात जुना मक्तेदार असलेल्या “पोचमपाड” कंपनीने लवादात धाव घेतली होती. त्याने नव्या लक्ष्मी कंपनीलाही प्रतिवादी केले होते. दरम्यान लवादामध्ये याप्रकरणी जवळ जवळ समजोता झाला आहे. येत्या पंधरा दिवसात संबंधित मक्तेदाराला सुधारित मान्यता देण्यात येईल. या कामातील सर्व विघ्न आता दूर झाले आहेत. यामुळे लवकरात लवकर काम सुरू करण्याचा प्रयत्न आहे. शहराला अधिक पाणीपुरवठा या कामानंतर उपलब्ध होईल, असेही पालकमंत्री विखे – पाटील यांनी यावेळी सांगितले.
स्व. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत मृत शेतकरी कुटुंबियांच्या वारसांना धनादेशाचे वितरण पालकमंत्र्यांच्या हस्ते केले.
याप्रसंगी खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार सुभाष देशमुख, आमदार समाधान आवताडे, जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर यांच्यासह कृषी विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
● चिमणी प्रकरणी महापालिका लवकरच कार्यवाही करेल !
सोलापुरातील विमानसेवेस अडथळा ठरणाऱ्या चिमणी प्रकरणी श्री सिद्धेश्वर साखर कारखान्याच्या गाळपामुळे निर्णय घेण्यात आला नव्हता. आता गाळप संपला आहे. त्यामुळे महापालिका स्तरावर आता या संदर्भात आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल. या संदर्भात महापालिका आयुक्तांना सूचना दिल्या आहेत. सोलापूर शहरातून विमानसेवा सुरू करण्यासाठी डीजीसीए कडून परवानगी घेऊन आवश्यक ती पुढील ही कार्यवाही आणि पाठपुरावा करण्यात येईल, असेही असे स्पष्टीकरण पालकमंत्री विखे – पाटील यांनी यावेळी दिले.
○ कर्नाटकाकडून अवैध पाणी उपसा; लवादात तक्रार करण्याचे दिले आदेश !
दरम्यान, औज धरणातून कर्नाटकाकडून मोठ्या प्रमाणात पाणी उपसा केला जात असल्या संदर्भात विचारले असता कर्नाटकाकडून रोज धरण परिसरातून अवैध उपसा केला जात आहे याप्रकरणी लवादात तक्रार करावी अशा स्पष्ट सूचना प्रशासनाला दिले आहेत. दरम्यान या संदर्भात मुख्यमंत्री यांच्याशीही चर्चा करण्यात येईल, असेही पालकमंत्री विखे – पाटील यांनी यावेळी स्पष्ट केले.
सोलापूरला दैनंदिन सुरळीत पाणीपुरवठा करण्यासाठी सर्वोच्च प्राधान्याने कार्यवाही करावी तसेच, मंगळवेढा प्रादेशिक पाणीपुरवठा योजना पूर्ववत कार्यान्वित करण्यासाठी संबंधित सर्व कार्यान्वयीन यंत्रणांनी तातडीने मार्ग काढावा,अशा सूचना पालकमंत्री राधाकृष्ण विखे – पाटील यांनी यावेळी दिल्या.
सीईओ शीतल तेली – उगले यांनी स्मार्ट सिटीसंदर्भातील सादरीकरण केले. यामध्ये पूर्ण झालेल्या कामांचा तपशील, प्रगतीपथावर असलेल्या कामांचा तपशील, उजनी ते सोलापूर समांतर जलवाहिनी, कामाची सद्यस्थिती यांची माहिती देण्यात आली.