अयोध्या : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना, तुमच्या मनसे अध्यक्ष राज ठाकरेंसोबतच्या भेटीगाठी होत आहेत, तुमच्यात कोणत्या राजकीय चर्चा सुरू आहेत का? असा सवाल विचारण्यात आला. त्यावर शिंदेंनी उत्तर देताना म्हटले, आम्ही उद्धव ठाकरेंसोबत होतो. परंतु त्यांना (उद्धव ठाकरेंना) राज ठाकरेंची ॲलर्जी होती. त्यामुळे आम्हाला भेटता येत नव्हतं. पण आता कसलीही रोकटोक नाही. आम्ही कधीही भेटू शकतो. Al·lèrgia a Uddhav Thackeray; Mentre estava amb Thackeray, Raj Thackeray no va poder conèixer a Eknath Shinde Ayodhya Daura Mahaarti
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अयोध्या दौऱ्यावर आहेत. त्यांच्यासोबत शिवसेनेचे मंत्री, आमदार, खासदार आणि भाजपचे नेतेदेखील उपस्थित आहेत. आज मुख्यमंत्र्यांनी माध्यमांशी संवाद साधत मनातल्या गोष्टीला वाट मोकळी करुन दिली आहे. पत्रकारांनी राज ठाकरेंबद्दल प्रश्न विचारला. राज ठाकरेंशी तुमच्या नेहमी गाठीभेटी होत आहेत, राजकीय चर्चा सुरु आहेत का? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, उद्धव ठाकरेंना राज ठाकरेंची अॅलर्जी होती आणि आम्ही उद्धव ठाकरेंसोबत होतो. त्यामुळे राज ठाकरेंना भेटता येत नव्हतं. मात्र आता कसलीही अडचण नाही, राज ठाकरे आणि आमचे मैत्रीपूर्ण संबंध आहेत. ते एक चांगले व्यक्ती आहेत आणि चांगलं काम करत आहेत. आमच्या भेटींमध्ये राजकीय चर्चा झाली नसल्याचं एकनाथ शिंदे यांनी आवर्जून सांगितलं.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबत रामलल्लाचे दर्शन घेतले आहे. त्यांच्या सोबत शिवसेना-भाजपच्या हजारो कार्यकर्त्यांनी आणि नेत्यांनी देखील दर्शन घेतले. यावेळी ढोल ताशांच्या गजरात जोरदार जल्लोष करण्यात आला. तसेच राम लल्लाच्या नावाने जयघोष करण्यात आला आहेत. दरम्यान, यावेळी सेना-भाजप या दोन्ही पक्षांकडून भक्तीचे आणि शक्तीचे प्रदर्शन करण्यात आले आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अयोध्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी येथे जोरदार शक्तीप्रदर्शन केले. तसेच त्यांनी रामलल्लाचे दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी सायंकाळी शरयू नदीच्या तीरावर आरती केली. यावेळी त्यांच्यासोबत त्यांचे चिरंजीव खासदार श्रीकांत शिंदे, मंत्री दादा भूसे, गिरीश महाजन, शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांच्यासह शेकडो शिवसैनिक उपस्थित होते. महाआरतीनंतर मुख्यमंत्र्यांनी सर्वांचे आभार मानले.