सोलापूर : जुना पुना येथे शनिवारी (ता. 8) रात्री ११ वाजता अज्ञात वाहनाच्या धडकेत आदर्श अमोल बनसोडे (वय १९, रा. रेणुगोपाल नगर) याचा मृत्यू झाला. यात त्याचा मित्र जखमी झाला आहे. मृत बनसोडे व त्याचा मित्र हे दोघे दुचाकीवरून जात होते. त्यावेळी रात्रीच्या वेळेस अज्ञात वाहनाने त्यांना धडक दिल्याने दोघे दुचाकीवरून खाली कोसळले. Accident of two friends on Juna Puna bridge, one dead and one injured in Solapur
हा अपघात इतका गंभीर होता की, यात बनसोडे यांच्या डोक्याचा चेंदामेंदा झाला. घटनेची माहिती कळताच फौजदार चावडी पोलिस ठाण्याचे पोलिस हे घटनास्थळी गेले. दरम्यान, रुग्णसेवक लादेन याने बनसोडे याला उपचारासाठी छत्रपती शिवाजी महाराज शासकीय रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेची नोंद सिव्हिल पोलिस चौकीत झाली आहे. दरम्यान, त्याचा मित्राच्या तब्येतीत सुधारणा होत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
○ जागेच्या वादातून लाथाबुक्क्यांनी मारहाण
सोलापूर : जागेच्या वादातून दोन जणांनी मिळून लोखंडी पाईप व लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्यामुळे तरूण जखमी झाला आहे. ऋतिक देवेंद्र गोने ( वय २२, रा. भद्रावती पेठ) असे जखमी झालेल्या दोघांची नावे आहेत. त्यांना उपचारासाठी छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेची नाेंद सिव्हिल पोलिस चौकीत झाली आहे.○ गोळ्या घेतल्याने इसम रुग्णालयात
सोलापूर : अज्ञात कारणातून इसमाने राहत्या घरात जादा प्रमाणात गोळ्या घेतल्याने त्यांना त्रास होऊ लागला. यामुळे संजय शशिकांत पोतदार (वय-४४, रा. आदित्य नगर,विजापूर रोड) यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेची नोंद सिव्हिल पोलिस चौकीत झाली आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
○ अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार जखमी
सोलापूर : पेट्रोल भरून पंपातून जात असताना पाठीमागून येणार्या दुसर्या दुचाकीने धडक दिल्याने श्रीनिवास अंजय्या श्रीरामोज ( वय ४०, रा. जुना विडी घरकुल) हे जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेची नोंद सिव्हिल पोलिस चौकीत झाली आहे.
○ पाईपने मारहाण केल्याने इसम जखमी
सोलापूर : गैरसमजुतीतून चार जणांनी मिळून इसमाला गॅसच्या पाईपने मारहाण केल्यामुळे इसम जखमी झाला आहे. शंकर राम असादे (वय-४०,रा.अलकुंटे चौक) असे जखमी झालेल्या इसमाचे नाव आहे. त्याला उपचारासाठी छत्रपती शिवाजी महाराज शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेची नोंद सिव्हिल पोलिस चौकीत झाली आहे.
○ चालत जात असताना वाहनाच्या धडकेत पादचारी जखमी
सोलापूर : जुना विडी घरकुल येथील सर्विस रोडवरून चालत जात असताना अज्ञात वाहनाने धडक दिल्याने श्रीनिवास पुंडलिक वंगरी ( वय ५३, रा. जुना विडी घरकुल) हे जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी छत्रपती शिवाजी महाराज शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेची नोंद सिव्हिल पोलिस चौकीत झाली आहे.