मुंबई : अभिनेत्री प्रिया बेर्डेनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. यानंतर प्रवेशाबाबत त्यांनी स्पष्टीकरण दिले. “राष्ट्रवादीमध्ये काम करताना खूपच मर्यादा होत्या. भाजपात मला काम करण्याचा स्पेस मिळाला. मी त्याच कारणाने भाजपात आले”, असे त्यांनी सांगितले. “तसेच आत्तापर्यंत सांस्कृतिक विभाग नेहमीच दुर्लक्षित होता. पण आता प्रत्येक कलाकाराला न्याय मिळेल”, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. …so Priya Berdena gave a farewell to the Nationalists; Joined BJP Laxmikant Berde regrets offensive comments
भारतीय जनता पार्टी सांस्कृतिक आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष प्रिया बेर्डेंची नियुक्ती केलीय. त्यांनी पत्रकारासमोर कलाकारांच्या व्यथा मांडताना अश्रू अनावर झाले होते.
प्रिया बेर्डे यांनी खंत व्यक्त करीत म्हणाल्या, लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यावर सोशल मीडियाच्या माध्यमातून अत्यंत खालच्या स्तरावर जाऊन हल्ले केले जातात, हे निषेधार्ह आहे. म्हणजे ज्या माणसाला आज जाऊन आता 18 ते 19 वर्षे झाली, तसेच ज्या माणसाचे मराठी चित्रपट सृष्टीसाठी खूप मोठे योगदान आहे, अशा व्यक्तीवर ज्यांना काहीच बोलायचा अधिकार नाही. ज्यांची समाजात काहीच प्रतिमा नाही असे लोकं बेर्डे साहेबांवरती व्यक्त होतात याचेच मला नवल वाटते. याबद्दल तुम्ही मीडियाने देखील आवाज उठवायला हवा.
राज्यातील 600 सिंगल स्क्रिन थिएटरची दुरवस्था झाली आहे. यातील हाताच्या बोटावर मोजण्याइतके थिएटर सुरू आहेत. मल्टीफ्लेक्समध्ये तर आम्हाला शोच मिळत नाहीत. थिएटर दिले तरी आम्हाला शो मिळतच नाहीत. आणि शो जर दिले तर मोठी बिग बजेटची इंग्लिश किंवा हिंदी फिल्म आली तर मराठी चित्रपटांसाठी त्यांच्या पाया पडावे लागते ते ही आपल्या महाराष्ट्रामध्ये. काय करायचे कलाकारांनी, कसे जगायचे? सध्या आम्ही पाठपुरावा करून एक खूप मोठे काम केले आहे. आपले सांस्कृतिक मंत्री सुधीर मुंनगुटीवर साहेब यांनी नाट्यगृहासाठी 25 कोटींचे अनुदान घोषित केले आहे. यामुळे नाट्यगृहांमध्ये सुधारणा होईल. तमाशा व लोककलावंत यांना कोरोना काळात अनेक मोठ्या समस्यांचा सामना करावा लागला. काहींना तर लोकांची धुणी-भांडी करावी लागली. कलाकारांची एवढी वाईट अवस्था पाहवत नसल्याचे बेर्डे म्हणाल्या.
प्रत्येक कलाकाराला व तंत्रज्ञ यांना न्याय देण्यासाठी मी राजकीय व्यासपीठावर आले आहे. आमचा पक्ष व आम्ही त्यांच्या समस्या नक्की सोडवू.!#BJP4IND #bjpmh #LatestNews #Maharashtra #Mumbai #DevendraFadnavis #ChandrashekharBawankule #BJPMaharashtra
— priya berde (@berde_priy48892) April 12, 2023
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
प्रत्येक कलाकाराला न्याय देण्यासाठी मी राजकीय व्यासपीठावर आले आहे. शेवटी निवडणूक लढविण्याबाबत पक्षश्रेष्टी निर्णय घेतील, मी माझे काम निष्ठेने करत राहील असे त्या म्हणाल्या. राष्ट्रवादी पक्ष सोडण्याबाबत त्या म्हणाल्या, ‘भाजपमध्ये काम करण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणावर संधी दिली जाते. येथे काम करण्यासाठी मोठी स्पेस आहे. एखादा प्रश्न आपण वरिष्ठ नेते म्हणजेच देवेंद्रजी फडणवीस, चंद्रकांतदादा पाटील, चंद्रशेखर बावनकुळेजी, सुधीरजी मुनगंटीवार साहेब यांच्यासमोर घेऊन गेलो की ते प्रश्न लगेच मार्गी लागतात. वाशी येथे धो धो पावसातही सुधीरजी मुनगंटीवार साहेब पुरस्कार द्यायला आले.
प्रिया बेर्डे म्हणाल्या, ‘मला अभिनय क्षेत्राची खूप मोठी कौटुंबिक पार्श्वभूमी लाभली आहे. त्यामुळे मला चित्रपट क्षेत्रातील अत्यंत खालच्या घटकांपासून वरपर्यंतच्या सर्वच घटकांची म्हणजे कलाकार, तंत्रज्ञ, लाईटमन, स्पॉटबॉय यांची बारीकसारीक माहिती आहे. या सगळ्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. या सगळ्या गोष्टी लहानपणापासून खूप जवळून मी पाहिल्या आहेत. अनेकदा कलाकारांना वेगळी वागणूक दिली जायची, तंत्रज्ञ यांना वेगळी वागणूक दिली जायची. यांना जेवण देखील खूप हीन दर्जाचे दिले आहे जायचे. माझ्या वडिलांनी अनेकदा खिशातील पैसे खर्च करून या घटकांसाठी काम केले आहे. त्यांच्यामुळे या सर्व घटकांविषयी मला तळमळ आहे.
या सर्व मुद्यांवर मी खूपदा भांडले आहे. मला पहिल्यापासून या लोकांसाठी काहीतरी आपण पुढाकार घेऊन करावे असे वाटत होते. कोरोनाच्या काळात ही संधी मला उपलब्ध झाली. या काळात कलाकार, तंत्रज्ञान व अभिनय क्षेत्रातील लोकांची वाईट अवस्था झाली होती. कोरोनाच्या काळात ज्युनिअर आर्टिस्ट, हेअरस्टाईलिस्ट, मेकअप आर्टिस्ट, स्पॉटबॉय अशा अनेक लोकांची कामे गेली. या काळात लक्ष्य कला मंच, श्रीमंथ इंटरटेन्मेंट प्रायव्हेट लिमिटेड या संस्थामार्फत मी आणि माझे बिझनेस पार्टनर अमर गवळी आम्ही सर्व लोकांना फूड पॅकेट पुरविण्यापासून ते जीवनावश्यक वस्तू पुरविल्या. तसेच पुणे इतर ठिकाणच्या 100 लोकांचा विमा देखील उतरवला.