सोलापूर – ग्रामीण भागातील सुशिक्षित बेरोजगार युवक – युवतींना मोफत व्यवसाय प्रशिक्षण देवून उद्योग व्यवसायाकडे वळविण्याच्या हेतूने सुरू असलेल्या बँक ऑफ इंडिया संचलित ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था अर्थात (आरसेटी) मध्ये या वर्षी जवळपास ३० व्यवसाय प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात येणार असून, सर्व मोफत निवासी स्वरुपाचे असणार आहेत. तरी सर्व ग्रामीण भागातील युवक युवतींना या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थेचे संचालक दीपक वाडेवाले यांनी पत्रकाद्वारे केले आहे.
यामध्ये युवतींसाठी शिवणकला, ब्युटीपार्लर, ज्युट प्रॉडक्ट उद्यमी, वस्त्र चित्रकला, ज्वेलरी बनविणे तसेच युवकांसाठी दुचाकी दुरुस्ती, मोबाईल रिपेअरिंग, फोटोग्राफी आणि व्हीडिओग्राफी व शेतीपूरक प्रशिक्षण शेळीपालन, दुग्धव्यवसाय व गांडूळखतनिर्मिती अशा वेगवेगळ्या प्रकारचे प्रशिक्षण वर्षभर चालणार आहे.
या सर्व प्रशिक्षणासाठी लागणारे साहित्य, प्रशिक्षणार्थींची निवास आणि भोजनाची व्यवस्था पूर्णपणे मोफत आहे. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर पुढील दोन वर्षे पाठपुरावा करुन व्यवसाय उभारणीस मदत करण्यात येते. या प्रशिक्षणासाठी प्रशिक्षणार्थी हा सोलापुर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील असावा व त्याचे वय १८ पूर्ण व ४५ वर्षाच्या आतील असावे. अधिक माहितीसाठी ९२७२२०७१११ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहनही . वाडेवाले यांनी केले आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
● महापालिकेतील 19 कर्मचाऱ्यांना आरोग्य निरीक्षकपदी पदोन्नती !
सोलापूर : महापालिकेच्या आकृतीबंधातील आरोग्य निरीक्षकांच्या एकूण ७७ मंजूर पदांपैकी १९ पदे पदोन्नतीने भरण्यात आली आहेत. महापालिकेतील मजूर, झाडूवाला, कनिष्ठ श्रेणी लिपिक व बिगारी यांना आरोग्य निरीक्षकपदी पदोन्नती देण्यात आली आहे. याबाबतचे आदेश सोमवारी महापालिका आयुक्त शितल तेली – उगले यांनी काढले आहेत. यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
महापालिकेच्या मंजूर आकृतीबंधात आरोग्य निरिक्षकांची एकूण ७७ पदे मंजूर आहेत. या मंजूर पदापैकी ५८ (७५ टक्के) पदे सरळसेवेने व १९ (२५ टक्के) पदे पदोन्नतीने भरणेबाबत नव्याने मंजूर केलेल्या सेवाप्रवेशामध्ये नमूद आहे. त्यानुसार वर्ग-३ व ४ संवर्गातील या पदासाठी सेवाप्रवेशमध्ये आरोग्य निरिक्षक पदासाठी विहित केलेली शैक्षणिक व अन्य अर्हता धारण करणारे कर्मचारी यांच्याकडून अर्ज मागविण्यात आलेले होते.
विहित केलेल्या अर्हतानुसार कागदपत्राची तपासणी होवून त्यानुसार खातेनिहाय समितीमध्ये ४३ अर्जदारापैकी ३२ अर्जदार यांना पात्र व ११ कर्मचारी यांना अपात्र करण्यात करण्याबाबत तसेच पात्र कर्मचारी यांचे विभागीय चौकशी, गोपनिय अहवाल व मक्ता व दायित्वे तपासणी करून त्यांचे आरोग्य निरिक्षक (पदोन्नती) या संवर्गातील रिक्त पदावर सेवा जेष्ठतेनुसार नियुक्ती करण्याबाबत निर्णय झालेला आहे.
खातेनिहाय पदोन्नती समितीने पात्र ठरविण्यात आलेल्या कर्मचारी यांची आरोग्य निरिक्षक या पदावर अटीस अधीन राहून तात्पुरत्या स्वरूपात पदोन्नतीने नियुक्ती देण्यात येत आहे. याबाबतचे कार्यालयीन आदेश महापालिका आयुक्त शीतल तेली – उगले यांनी आज सोमवारी काढले आहेत.
○ यांची झाली आरोग्य निरीक्षकपदी पदोन्नती
– आरोग्य निरीक्षकपदी पदोन्नती झालेल्या कर्मचाऱ्यांचे नाव व कंसात पदनाम असे :
अंजली गिरिष काकडे (मिडवाईफ), नितीन बाळकृष्ण नराळे(मजूर), खाजप्पा अशोक कट्टीमनी (वाहनचालक), सोमनाथ एस ताकभाते (क.श्रे. लि.), रविंद्र राजाभाऊ सर्वगोड (क.श्रे. लि.), सोमनाथ नागनाथ सिध्दगणेश( क.श्रे. लि.), भैय्यासाहेब बाबुराव डोळसे (झाडूवाला),
शिलरत्न महादेव दुडे ( बिगारी), दत्ता तानाजी म्हस्के (मजूर), पद्मावती निलमणी इंगळे (झाडूवाला), अ. वाहिद म. अली पेरमपल्ली (वरिष्ठ क्षेत्रकार्यकर्ता),
अतुल अभिमान मस्के (झाडूवाला), शिवप्रसाद विलास कुलकर्णी (बिगारी), विश्वास लुमवेल क्षिरसागर (क.श्रे. लि.), श्रीदेवी सुधाकर गायकवाड (बिगारी), गोरीशंकर प्रकाश बनसोडे (बिगारी), शुभम अरूण रणखांबे (बिगारी), सौ.सुप्रिया महेश कांबळे (बिगारी)
अशोक देविदास इंगळे (झाडूवाला) आदी.