नवी दिल्ली : माफिया अतीक अहमद आणि अशरफ यांच्या हत्याप्रकरणावर तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोइत्रा यांनी भाष्य केले आहे. सत्यपाल मलिक यांच्या मुलाखतीवरून लक्ष विचलित करण्यासाठी भाजपने उत्तर प्रदेशात ही हत्या केली, असा आरोप त्यांनी केला. भाजपने देशाचं काय केलं हे मी इथे सांगेन, परदेशात सांगेन, कारण ते खरं आहे. हा कायद्याच्या राज्याचा मृत्यू आहे, असे त्या म्हणाल्या. Trinamool Congress MP Mahua Moitra killed Atiq Ahmed to divert attention from Satyapal Malik’s allegations
या हत्या घटनेनंतर विरोधी पक्ष योगी सरकारवर हल्लाबोल करत आहे. तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोइत्रा यांनी रविवारी (16 मार्च 2023) ट्विट केले की, “भाजपने देशाला माफिया रिपब्लिक बनवले आहे.
भाजपने देशाचं काय केलं हे मी इथे सांगेन, परदेशात सांगेन, सगळीकडे सांगेन, कारण ते खरं आहे. पोलिस आणि कॅमेऱ्यांसमोर कोठडीत असलेल्या दोन लोकांची गोळ्या झाडून हत्या झाली. हा कायद्याच्या राज्याचा मृत्यू आहे. महुआ मोईत्रा म्हणाल्या की, सत्यपाल मलिक यांच्या मुलाखतीवरून लक्ष विचलित करण्यासाठी भाजपने उत्तर प्रदेशात ही हत्या केली, याचा मला विश्वास असल्याचं मोइत्रा यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
अतीक यांचा मुलगा असद याच्या एन्काऊंटरवरूनही महुआ मोइत्रा यांनी योगी सरकारवर निशाणा साधला. अजय बिष्ट यांचे दुसरे नाव ‘मिस्टर ठोक दो’ असे होते. त्यामुळे अशा प्रकारची संपूर्ण अराजकता, जंगलराज, एन्काऊंटर किलिंग त्यांच्या राजवटीत होत आहे. यापुढेही ती सुरूच राहणार आहे. ‘माननीय ठोक दो मुख्यमंत्री यांनी घडवून आणलेली, चकमक पुन्हा एकदा जंगलराजचा उत्सव साजरा करत आहे, ज्याला भाजप रामराज्य म्हणून दाखवत आहे.
I can even believe BJP got UP shooting done simply to deflect attention away from Satyapal Malik’s interview repercussions.
Nothing, just nothing, is beyond this government.— Mahua Moitra (@MahuaMoitra) April 16, 2023
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
● अदानी मोदींना संपवून टाकेल
पुलवामा निवडणुकीसाठी घडवलं. बोलल्यानंतर गप्प बसण्यास सांगितलं : सत्यपाल मलिक
मुंबई : ‘अदानी प्रकरणात मोदी सरकारचं खूप सारं नुकसान झालंय. हे नुकसान शेवटच्या स्तरापर्यंत झिरपलं आहे. २०२४ मध्ये अदानी हा निवडणुकीचा मुद्दा होईल. यांनी जर वेळीच सुधारणा केली नाही तर अदानी यांना संपवून टाकेल. जर विरोधकांनी एका स एक उमेदवार दिला तर हे वाचूच शकणार नाहीत. इतक्या कमी जागा येतील की यावर विश्वासच बसणार नाही की यांचं सरकार कधीकाळी होतं. मोदी शांत राहून धोका ओढवून घेत आहेत. मला माहिती नाही की त्यांना कुणी सल्ला देतंय की नाही ते. मी त्यांना सल्ला देतोय की कृपा करून अदानी प्रकरणातून हात काढून घ्या. २० हजार कोटींच्या आरोपांचं उत्तर ते देऊ शकत नाहीत. लोकांचा यावर विश्वास बसू लागला आहे की अदानींच्या आर्थिक व्यवहारांमध्ये मोदींना रस आहे.’ हे आरोप नसून उद्गार आहेत भाजपचे वरिष्ठ नेते आणि जम्मू व काश्मीरसह गोव्याचे राज्यपालपद भूषविलेले सत्यपाल मलिक यांचे. त्यांनी एका मुलाखतीत काश्मीरमधील ३७० कलम हटवण्यापासून पुलावामधील हल्ल्यापर्यंतच्या अनेक घटनांचा भांडाफोड केला आहे.
भाजप शासित राज्यांमधील पैसा अदानींकडे जात असावा; अशी शंका व्यक्त करताना मलिक यांनी सांगितले की ‘यांचं सरकार असलेल्या राज्यांमध्ये भ्रष्टाचार चालू आहे. तिथला सगळा पैसा ते मुख्यमंत्री तर खात नाहीत.
तो इथेही येतो आहे. इथून तो पैसा कुठेतरी जात असावा. कदाचित तो पैसा अदानींकडे जात असावा अशी चर्चा लोक करत आहेत, अशा शब्दात मोदी आणि अदानी यांच्यातील संबंधांवर सत्यपाल मलिक यांनी भाष्य केले आहे. ‘संसदेत राहुल गांधींच्या एकाही प्रश्नाचे उत्तर पंतप्रधान नरेंद्र मोदी देऊ शकले नाहीत. त्यांना त्यांच्या बचावात एकही शब्द उच्चारता आले नाही. राहुल गांधींना बोलू न देणे फार चुकीची गोष्ट होती, नरेंद्र मोदी राहुल गांधींमुळे फार अस्वस्थ झाले आहेत. अदानींचा एकदम योग्य मुद्दा राहुल गांधींनी उचलला आहे.’ असा शेराही या माजी राज्यपालांनी मारला आहे.
○ मला हात लावला तर…
‘मी हे बोललो त्याबद्दल काय करतील ते? माझा जीव घेऊ शकत नाहीत. माझा समाज खूप मोठा आहे, त्याला हात लावू शकत नाही, त्यांची दुर्दशा होईल. शेतकऱ्यांच्या मुद्द्यांवर मी बोलल्यामुळे माझ्यामागे एवढा पाठिंबा आहे की ज्या दिवशी मला हात लावतील, त्या दिवशी यांना कळून चुकेल. यांना कुठे जाहीर सभा घेता येणार नाही. मी फकीर माणूस आहे. भाड्याच्या घरात राहतो. मी तर राजकारणात येऊन बापजाद्यांचा जमीनजुमलाही विकून टाकला,’ अशा शब्दात आपणास विरोध करणाऱ्यांचे काय होईल, हेसुध्दा मलिक यांनी सांगून टाकले आहे.
○ मी बोललो तर म्हणाले शांत रहा
‘काश्मीरच्या बाबतीत तर मला सक्त ताकीद दिली होती की काहीही बोलायचं नाही. गोव्यात तर मला एक दिवस फोन करून मला म्हणाले की तुम्ही जर काश्मीरबद्दल पुन्हा बोललात तर मी तुम्हाला पुन्हा कधीच नाही भेटणार. पुलवामा हल्ल्याच्या दिवशी सीआरपीएफने केंद्रीय गृहमंत्रालयाकडे एअरक्राफ्टची मागणी केली होती. पण त्यांनी नकार दिला. मी त्याच संध्याकाळी पंतप्रधानांना सांगितलं की पुलवामा आपल्या चुकीमुळे घडलंय. तर त्यांनी मला सांगितलं की तुम्ही आत्ता शांत राहा.’ असे खुद्द पंतप्रधानांनीच बजावले असल्याचा गौप्यस्फोटही मलिक यांनी केला.
● ते आपल्याच धुंदीत
‘पंतप्रधान नरेंद्र मोदींबाबत सगळ्या जगाचं जे मत आहे ते माझं नाही. मी त्यांना जेव्हा केव्हा भेटलो, तेव्हा मला जाणवलं की त्यांना अजिबात काही माहिती नाही. मी एकदा उदाहरण म्हणून सांगितलं की काश्मीरमधली खरी समस्या जमात आहे. त्यांना त्याची काही काळजीच नव्हती. जमात खूप शक्तिशाली आहे. पण मोदींना काहीच माहिती नाही. ते आपल्याच धुंदीत आहेत. मी दोन-तीन वेळा त्यांना सांगितलं की काश्मीरचा मुद्दा सुटू शकतो. पण ते त्यासाठी इच्छुक नव्हते,’ असे भाष्यही मलिक यांनी काश्मीर प्रश्नावर केले.