》 आप्पासाहेब धर्माधिकारी महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित
》 ‘मानवता धर्म सर्वात श्रेष्ठ धर्म आहे’
मुंबई : नवी मुंबईतील खारघर येथे ज्येष्ठ निरूपणकार पद्मश्री डॉ. अप्पासाहेब धर्माधिकारी यांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्काराने गौरविण्यात आले. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते स्मृतीचिन्ह, शाल, मानपत्र आणि 25 लाख रुपयांचा धनादेश प्रदान करुन त्यांचा सन्मान झाला. यानंतर धर्माधिकारी यांनी पुरस्कारात मिळालेली मानधनाची 25 लाख रूपयांची रक्कम मुख्यमंत्री सहाय्यता निधीला दिल्याची मोठी घोषणा केली. Appasaheb Dharmadhikari presented the honorarium of the award to the Chief Minister’s Assistance Fund Kharghar Maharashtra Bhushan Raigad Jai Sadguru
खारघर येथे महाराष्ट्र भूषण २०२२ पुरस्कार वितरणाचा महासोहळा आयोजित करण्यात आला होता. लाखो श्री सदस्यांच्या साक्षीने खारघर वसाहतीमधील सेक्टर २९ येथील कार्पोरेट पार्क येथील ३०६ एकर मैदानावर हा सोहळा पार पडला. या गर्दीचा उल्लेख आणि कौतुक अमित शहा यांनी आवर्जून केले. पुरस्कार सोहळ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासह अनेक नेतेमंडळींनी हजेरी लावली. याच दरम्यान डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करुन महाराष्ट्र राज्याचा मान वाढल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.
केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या हस्ते ज्येष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. नवी मुंबईतील खारघरमधील कॉर्पोरेट मैदानावर त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे. यावेळी अमित शाह यांचे ही जंगी स्वागत करण्यात आले. धर्माधिकारी यांचा श्रीरामाची मूर्ती देऊन सत्कार करण्यात आला. त्यांना मानपत्र आणि 25 लाखांचा धनादेश देण्यात आला आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. ‘मानवता धर्म सर्वात श्रेष्ठ आहे. प्रत्येकाने कमीतकमी 5 झाडे लावावीत. वृक्ष लावून वृक्षाची सेवा करावी. मी कार्याची सुरुवात खेडेगावातून केली. आपल्या सर्वांच्या कष्टांचा हा गौरव आहे. हे कार्य अखेरपर्यंत सुरु ठेवणार आहे. सेवेसाठी प्रत्येकाने झटले पाहीजे. समाजसेवेचं व्रत आपण घ्यायला हवं’, असे धर्माधिकारी म्हणाले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, धर्माधिकारी कुटुंब भरकटलेल्यांना मार्ग दाखवणारे दिपस्तंभ आहे. हा पुरस्कार दिल्यामुळे पुरस्काराची उंची वाढली. महाराष्ट्राचा मान सन्मान वाढला. मी मुख्यमंत्री असताना त्यांना पुरस्कार दिला जात आहे यापेक्षा दुसरा कोणताही आनंदाचा क्षण असू शकत नाही. लाखो कुटुंबात माझेही एक कुटुंब होते. कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला, त्यावेळी आनंद दिघे यांनी आधार दिला. तर आप्पासाहेबांनी समाजाची सेवा करण्याचा मार्ग दाखवला. त्यांचे मोठे योगदान मी कधीही विसरू शकणार नाही” असंही एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.
“एवढ्या महासागरासमोर काय बोलावं समजत नाही. मी मुख्यमंत्री म्हणून बोलत नाही तर मी परिवारातील श्री सदस्य म्हणून बोलत असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. विनंतीला मान देऊन गृहमंत्री अमित शाह हे उपस्थित राहिले त्याबद्दल त्यांचे आभार मानले. सूर्य आग ओकत असताना एकही माणूस जागेवरून उठत नाही हे आप्पासाहेबांचे आशीर्वाद आहेत. शिस्तीचे पालन सर्व सदस्य करत आहेत. माझी पत्नी आणि मुलगा श्रीकांत समोर बसला आहे. लहान मोठा कोणी नाही” असं मुख्यमंत्री म्हणाले.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राने देशाला तीन मोठे विचार दिले. स्वराज्य, भक्ति आणि शिक्षणाचा विचार राज्याने संपूर्ण देशाला दिला आहे. आता आपासाहेब धर्माधिकारी हे तिन्ही विचार त्यांच्या माध्यमांतून पुढे नेत आहेत, असे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केले.
अमित शहा म्हणाले, दासबोध आणि श्री सद्गुरू चरित्रच्या माध्यमातून समाज घडवण्याचं कार्य आप्पासाहेब धर्माधिकारी प्रदीर्घ काळापासून करत आहेत. त्यांचे वडील नानासाहेब धर्माधिकारी यांच्याकडून त्यांनी हा वारसा घेतला. श्रवण बैठकांच्या माध्यमातून अध्यात्म आणि समाज परिवर्तनाचं कार्य त्यांच्याकडून गेली आठ दशकं सुरू आहे. नानासाहेब धर्माधिकारी यांनी रुजवलेल्या रोपट्याचं वटवृक्ष करण्याचं कार्य आप्पासाहेबांनी केलं आहे. त्यांचं हेच कार्य त्यांचे चिरंजीव सचिनदादा धर्माधिकारी करत आहेत. दासबोधावरील श्रवण बैठका महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात होत आहेतच, शिवाय देशातील सर्व राज्ये आणि जगातील बहुतांश देशात हे कार्य सुरू आहे. अध्यात्म क्षेत्रात कार्यरत असतानाच सामाजिक कार्यात त्यांचा मोठा वाटा आहे.