सोलापूर : सोलापूर महावितरण कार्यालयातील कनिष्ठ अभियंता बाबूराव म्हेत्रे, वायरमन इलाही शेखला लाच घेतल्याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने शिक्षा ठोठावली आहे. यात वीस वर्षापूर्वी सोलापूर सत्र न्यायालयाने दोघांनी निर्दोष मुक्तता केली होती. Bribery engineer, wireman finally sentenced, Solapur court acquitted Bombay High Court
म्हेत्रेला एक वर्षांची तर शेखला सहा महिन्यांची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. या दोघांना २००३ मध्ये लाच घेताना अटक झाली होती. संशयाचा फायदा देत सोलापूर सत्र न्यायालयाने या दोघांची निर्दोष सुटका केली होती. सोलापूर सत्र न्यायालयाचा हा निकाल उच्च न्यायालयाने रद्द केला.
यातील तक्रारदाराचे सोलापूर येथे दुकान आहे. सप्टेंबर २००३ मध्ये या दुकानाचे वीजचे बिल सुमारे सात हजार रुपये आले. तक्रारदाराने सोलापूर महावितरण विभागात कनिष्ठ अभियंता म्हेत्रे आणि वायरमन शेख यांची भेट घेतली. म्हेत्रे आणि शेख तक्रारदाराच्या दुकानात आले. चुकीची वायरींग झाली असल्याचे सांगून दुकानाची वीज कापण्यात आली. तक्रारदाराने वीज कनेक्शन पुन्हा सुरु करण्याची विनंती केली.
यासाठी म्हेत्रे यांनी पाच हजार रुपये तर शेख यांनी तीन हजार रुपयांची मागणी तक्रारदाराकडे केली. तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (एसीबी) याची तक्रार केली. त्यानुसार एसीबीने म्हेत्रे आणि शेखला अटक करण्यासाठी सापळा रचला. एसीबीच्या पथकाने म्हेत्रेला तीन हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले. शेख यांच्यावतीने दुसऱ्या व्यक्तिने तीन हजार रुपये तक्रादाराकडून घेतले. त्यालाही एसीबीच्या पथकाने अटक केली.
या दोघांविरोधात सोलापूर विशेष सत्र न्यायालयात खटला चालला. सत्र न्यायालयाने १७ जानेवारी २००४ रोजी याचा निकाल देत या दोघांची निर्दोष सुटका केली. या निकालाविरोधात राज्य शासनाने मुंबई उच्च न्यायालयात याचिका केली.
न्या. एस. एम. मोडक यांच्या खंडपीठासमोर राज्य शासनच्या अपील याचिकेवर सुनावणी झाली. न्यायालयाने म्हेत्रे आणि शेखला निर्दोष सोडणारे सोलापूर सत्र न्यायालयाचे आदेश रद्द केले. न्यायालयाने म्हेत्रेला एक वर्षांची शिक्षा व दहा हजार रुपयांचा दंड ठोठावला. तसेच शेखला सहा महिन्यांची शिक्षा आणि पाच हजारांचा दंड न्यायालयाने सुनावला आहे. दंडाची रक्कम न भरल्यास या दोघांना अतिरिक्त शिक्षा भोगावी लागणार आहे.
》 लग्नाचे आमीष दाखवत केला अत्याचार
सोलापूर : लग्नाचे आमिष दाखवत तीस वर्षीय महिलेवर अत्याचार करत लग्नास नकार दिल्याप्रकरणी नंदेश्वरच्या तरुणावर गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत पीडितेने फिर्याद दिली असून या फिर्यादीवरून उमेश बापू खडतरे (रा. मंगळवेढा) याच्यावर एमआयडीसी पोलीस ठाण्यात अत्याचाराचा गुन्हा दाखल झाला आहे.
पीडित महिलेची आरोपी उमेश खडतरे यांच्यासोबत काही दिवसापूर्वी ओळख झाली होती. त्याने पीडितेशी जवळीकता साधत ओळख वाढवली. त्यानंतर त्याने पीडितेला लग्नाचे आमिष दाखवत तिच्यावर अत्याचार केला. ही बाब पीडितेच्या आणि आरोपीच्या कुटुंबीयांना कळल्यानंतर त्यांनी दोघांना घरातून हाकलून दिले.
दरम्यान, आरोपीने पीडितेला जोपर्यंत माझे आई-वडील लग्नाला होकार देत नाहीत तोपर्यंत मी तुझ्याशी लग्न करणार नाही. तुला काय करायचं ते कर असे म्हणून निघून गेला. याप्रकरणी पीडितेच्या फिर्यादीवरून आरोपी उमेश खडतरे याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. घटनेचा तपास पोसई वळसंगे करत आहेत.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
□ फायनान्स कंपनीत टॉयलेटमध्ये गेलेल्या महिलेचे केले शुटींग
सोलापूर : सोलापुरातील एका फायनान्स कंपनीत महिलेसोबत धक्कादायक प्रकार घडला आहे. येथे एका लेडीज टॉयलेटमध्ये गेलेल्या महिलेचे शुटींग केले आहे. याबाबत पीडित 39 वर्षीय महिलेने फौजदार चावडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यावरुन सीमोन रमेश गायकवाड याच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लेडीज टॉयलेटमध्ये एक्झॉस फॅनच्या ठिकाणावरुन तो मोबाईल ठेऊन शुटींग करत होता.
महिलेचे शुटींग केल्याप्रकरणी एका तरूणावर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत पीडित महिलेने फौजदार चावडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पीडित महिला ही फायनान्स कंपनीमध्ये कामाला आहे. पीडिता ही १७ एप्रिल रोजी लेडीज टॉयलेटमध्ये गेल्या होत्या. जेन्स व लेडीज टॉयलेट हे एकमेकाला लागून आहे. दोन्हीच्यामध्ये एक्झॉस फॅनसाठी जागा आहे पण, तेथे फॅन नाही. दरम्यान पुरूषांच्या बाजूने असणा-या भागातून कोणीतरी मोबाईलद्वारे लेडीज टॉयलेटमध्ये शुटींग करत असल्याचे पीडितेला दिसले. यामुळे पीडित महिलेने बाहेर येऊन याबाबतची माहिती आपल्या सहकार्यांना दिली.
त्यावेळी पुरूषांच्या टॉयलेटमधून आरोपी सीमोन गायकवाड हा तेथून बाहेर आला. त्याला विचारणा केल्यानंतर त्याने सुरूवातीला उडवाउडवीचे उत्तर दिले. नंतर त्याने शुटींग केल्याचे कबूल केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. यामुळे पीडित महिलेला लज्जा वाटेल असे कृत्य केल्याप्रकरणी सीमोन गायकवाड याच्या विरूध्द विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. घटनेचा तपास मपोसई जेऊघाले करत आहेत.