○ बँकेतील खाते हाताळण्यास घातला प्रतिबंध
सोलापूर : श्री क्षेत्र बाळे खंडोबा देवस्थानचे चेअरमन आणि सचिवांना धार्मादाय उपायुक्त एस.डी. कंकणवाडी यांनी चांगलेच फटकारले आहे. देवस्थानचा चेंज रिपोर्ट अद्याप प्रलंबित आहे. हा वाद न्यायप्रविष्ठ आहे. परस्पर बदल अहवाल प्रलंबित असल्याने विनय ढेपे आणि सागर पुजारी यांना अनुक्रमे अध्यक्ष, सचिव म्हणून कामकाज करता येणार नाही असा आदेश देत ढेपे आणि आणि पुजारी यांचे आधिकार गोठवले आहे. Solapur Deputy Charity Commissioner Freezes Powers of Bale Khandoba Temple Chairman Secretary Bank Account
बँक खाते हाताळण्यास प्रतिबंध घातला आहे. तसे पत्र सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखा अधिकाऱ्यांना धर्मादाय उपायुक्तांनी दिले आहेत.
श्री क्षेत्र बाळे खंडोबा देवस्थानमध्ये वाद चालू आहे. अधिकार नसताना देवस्थानाच्या नावे असलेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या खात्यावरून 90 लाख रूपये परपस्पर अधिकार नसताना चेअरमन आणि सचिव असल्याचे भासवत विनय ढेपे आणि सागर पुजारी यांनी काढले आणि ०.३२ आर हेक्टर शेतजमीन खरेदी केली. त्यासाठी ७० लाखासह २ कोटी ४ लाखांचा धनादेश दिला.
याविरोधात देवस्थानचे पुजारी, मानकरी, गावकरी आणि भक्तांनी धार्मादाय आयुक्तांकडे तक्रार करत देवस्थानवर प्रशासक नेमण्याची मागणी केली होती. तसा तक्रारी अर्ज १ मार्च रोजी देण्यात आला होता. तर पैसे काढण्यापूर्वी सिद्राम पुजारी यांनी देवस्थानचे खाते असलेल्या बँकेत अर्ज देऊन ढेपे आणि पुजारी यांना पैसे काढण्याचे आधिकार नसल्याने पैसे काढण्यास मज्जाव करावा असे दोन वेळा पत्र दिले होते. तरी देखिल १६ जानेवारी रोजी ५१ लाख आणि इतर वेळी असे ७० लाख रूपये परस्पर काढल्याची तक्रार धर्मादाय उपायुक्तांकडे केली होती.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
त्यानुसार चौकशी करून धर्मादाय उपायुक्त कंकणवाडी यांनी १० एप्रिल रोजी पत्र देऊन देवस्थानच्या खाते हाताळण्याचा विनय ढेपे आणि सागर पुजारी यांना अधिकार नाहीत त्यामुळे त्यांना सदरचे खाते हाताळण्यास प्रतिबंध करण्याचे आदेश दिले आहेत.
धर्मादाय आयुक्तांना खोटे चेंज रिपोर्ट दाखल करून एका शासकीय संस्थेची फसवणूक केली आहे. वास्तविक पाहता एखद्याच्या पुजारी मंडळीस ट्रस्टीसाठी पुजारी मंडळीची शिफारस घेऊनच संस्थेचा ट्रस्टी होण्याचा देवस्थानचा कायदा आहे. मात्र बेकायदा नियुक्ती करून खोटा रिपोर्टच्या दाखल करून हा उद्योग केला आहे. लवकर या प्रकरणाचा उलगडा करून खरे कोण खोटे कोण हे खंडोबा भक्तांसमोर आणू, असे विनय ढेपे (चेअरमन श्री खंडोबा देवस्थान ) यांनी सांगितले.
श्री खंडेरायाचे खरे मानकरी भक्त असल्याने गैरकारभार करणाऱ्यांच्या विरोधात भक्तांच्या बाजूने कौल दिला आहे. हा सर्व गावकरी, भक्तजण, मानकरी एक प्रकारे आशीर्वाद दिला आहे. शेवटी विजय सत्याचा होतो, असे किशोर पाटील (मानकरी श्री खंडोबा देवस्थान) यांनी सांगितले.