○ चार हुतात्मा चौकात मूर्तीची प्रतिष्ठापना; शेकडो भाविकांनी घेतला दर्शनाचा लाभ
सोलापूर :– भगवान परशुराम जयंती निमित्ताने आज शनिवारी (दिनांक २२ एप्रिल) भगवान परशुराम जयंती महोत्सव समितीतर्फे भगवान परशुराम यांच्या मूर्तीची भव्य मिरवणूक काढण्यात आली. A grand procession by the Brahmin community on the occasion of Lord Parashuram Jayanti, Solapur
राजवाडे चौकातून सुरू झालेली ही मिरवणूक चार हुतात्मा चौकात समाप्त झाली. त्या ठिकाणी भगवान परशुरामाच्या साडेचार फूट मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली त्यानंतर त्या ठिकाणी शेकडो भाविकांनी दर्शनाचा आणि प्रसादाचा लाभ घेतला रात्री दहा वाजेपर्यंत भाविकांचे दर्शनासाठी गर्दी झाली होती.
भगवान परशुराम जयंतीनिमित्त ब्राह्मण समाजातर्फे स्थापन करण्यात आलेल्या परशुराम जयंती महोत्सव समितीतर्फे शनिवारी भव्य मिरवणूक काढण्यात आली. ही मिरवणूक नव्या पेठेतील राजवाडे चौकातून दुपारी चार वाजता भगवान परशुराम यांच्या मूर्तीचे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पूजन झाल्यानंतर निघाली. राजवाडे चौकातून निघालेली ही मिरवणूक नवी पेठ, मेकॅनिकी चौक, सरस्वती चौक मार्गे जाऊन चार हुतात्मा पुतळा चौकात समाप्त झाली.
या मिरवणुकीत घोडेस्वार, लेझीम पथक ढोल पथक, यांच्यासह समाजातील महिला -पुरुष, युवक – युवती आदींनी पारंपारिक वेष परिधान करून मोठ्या प्रमाणावर सहभाग नोंदविला होता. भगवान परशुराम जयंतीनिमित्त निघालेली ही मिरवणूक चार हुतात्मा चौकात आल्यानंतर त्या ठिकाणी ब्रह्मरुंदांच्या मंत्रघोषात भगवान परशुरामाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली.
वेदमूर्ती गोविंद गवई, मुकुंदराव मुळेगावकर, ऋषिकेश दादेगावकर आदी ब्रह्मवृदांनी मंत्र पठण केले. त्यानंतर त्या ठिकाणी भाविकांची दर्शनासाठी आणि प्रसादासाठी मोठी गर्दी झाली होती. यावेळी भगवान परशुराम जयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष राजन कामत, निमंत्रक नितीन कुलकर्णी, कार्याध्यक्ष अमर कुलकर्णी, सुधीर कुलकर्णी, मोहिनी पतकी, महिला प्रतिनिधी आश्लेषां नीपुणगे, प्रसिद्धी प्रमुख दत्ता आराध्ये, राम तडवळकर, पंचांगकर्ते मोहनराव दाते, भाजपाचे शहराध्यक्ष विक्रम देशमुख, नरेंद्र काळे, माजी महापौर शोभा बनशेट्टी, चंद्रकांत वानकर, काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते काकासाहेब कुलकर्णी, माजी नगरसेवक विनोद भोसले, पांडुरंग दिड्डी, प्रशांत इंगळे, नाट्य परिषदेचे विजय साळुंखे
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
व्यंकटेश पटवारी, पत्रकार अभय दिवाणजी, देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण शिक्षणोत्तेजक संस्थेचे सतीश पाटील, श्याम जोशी, हेमा चिंचोळकर, विजय कुलकर्णी, यांच्यासह जयतीर्थ पडगानूर, विक्रम ढोनसळे, गोपाल खंडेलवाल, प्रशांत बडवे, अॅड. यशश्री मराठे, मोहिनी पतकी, प्रशांत कुलकर्णी, मीनाताई चाटी, नीरज गोडबोले, ब्रह्म प्रतिष्ठानचे सुहास देशपांडे, यांच्यासह समाजबांधव, कार्यकर्ते उपस्थित होते.
● भगवान परशुराम जयंतीनिमित्त प्रथमच सोलापुरातून ब्राह्मण समाजातर्फे भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली होती. त्यामुळे मिरवणुकीत अभूतपूर्व असा उत्साह दिसून आला.
● भगवान परशुरामांच्या मूर्ती स्थापनेनंतर सायंकाळी विविध समाजातील मान्यवरांनी हुतात्मा चौकात भेट देऊन दर्शन आणि प्रसादाचा लाभ घेतला.