● लेखक तारिक फतेह यांचे निधन
मुंबई : पाकिस्तानी वंशाचे आणि कॅनडाचे नागरिक लेखक तारिक फतेह यांचे निधन झाले. ते 73 वर्षांचे होते. त्यांची मुलगी नताशाने ट्विट करुन ही माहिती दिली आहे. पंजाबचा सिंह, हिंदुस्थानचा पूत्र, कॅनडाचा प्रेमी, सत्यासाठी लढणारा, शोषितांचा आवाज तारिक फतेह आपल्यात नाहीत, असे ट्विट नताशाने केले आहे. दरम्यान तारिक फतेह स्वतःला मूळ भारतीय समजत होते. ते न्यूज चॅनलवरील चर्चांमध्ये पाकिस्तानवर नेहमीच टीका करत होते. Senior writer, journalist Tariq Fateh passed away, Anupam Kher was a true Indian of Pakistani origin
मी पाकिस्तानात जन्मलेला भारतीय आहे, पंजाबी आहे पण जन्म इस्लाममध्ये झाला, अशा पद्धतीने स्वतःची ओळख करून देणारे प्रागतिक विचारांचे तारेक फतेह यांचे कर्करोगाच्या दीर्घ आजाराने निधन झाल्याची माहिती आहे. पाकिस्तानी वंशाचे व कॅनडाचे नागरिक असलेले लेखक तारेक फतेह यांच्या निधनावर अभिनेते अनुपम खेर यांनी दुःख व्यक्त केले. ‘ते हृदयापासून सच्चे भारतीय होते, निर्भिड आणि दयाळू वृत्तीचे होते, मी अनेकदा त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली. त्यांच्याशी वेळ घालवणे खूपच खास होते,’ असे खेर यांनी म्हटले. फतेह यांचे सोमवारी (ता. 24) निधन झाले. त्यांच्या निधनावर बॉलिवूडसह राजकारणातील अनेक दिग्गज व्यक्तींनी शोक व्यक्त केला आहे.
आपल्या वादग्रस्त विधानांमुळं ते अनेकदा चर्चेत राहिले. पण मुस्लिमांवर टीकात्मक विधानं आणि लिखाणामुळं ते हिंदुत्ववाद्यांमध्ये प्रसिद्ध होते. फतेह यांनी आपल्या ट्विटरवर लिखाण करत अनेकदा वाद ओढवून घेतले होते. एका मुस्लिम धर्मगुरुला आपली हत्या करायची होती, असा आरोप करत तारेख फतेह यांनी कोलकाता पोलिसांना नपुंसक असं संबोधलं होतं. तसेच मुस्लिम लोक गुगलमध्ये काम करत असून त्यांनी आपला ईमेल सस्पेंड करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही त्यांनी केला होता.
Lion of Punjab.
Son of Hindustan.
Lover of Canada.
Speaker of truth.
Fighter for justice.
Voice of the down-trodden, underdogs, and the oppressed.@TarekFatah has passed the baton on… his revolution will continue with all who knew and loved him.Will you join us?
1949-2023 pic.twitter.com/j0wIi7cOBF
— Natasha Fatah (@NatashaFatah) April 24, 2023
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
तारेक फतेह यांनी अनेकदा पाकिस्तानवर टीका करताना पंतप्रधान मोदींचं कौतुकही केलं आहे. त्यामुळं त्यांची भारतातील हिंदुत्ववादी विचारांच्या लोकांकडून कायम प्रशंसा होत राहिली. त्यांचा ट्विटरवर सर्वाधिक उजव्या विचारसरणीच्या युजर्सचा पाठिंबा आहे. २०१६ मध्ये, इंडिया फाउंडेशननं आयोजित केलेल्या ‘इंडिया आयडियाज कॉन्क्लेव्ह’ या उजव्या विचारसरणीच्या बौद्धिक शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी त्यांना निमंत्रित करण्यात आलं होतं.
जयपूर डायलॉग्जमध्ये राजस्थानच्या भाजप सरकारसाठी सहभागी होण्यासाठी त्यांना आमंत्रित करण्यात आलं होतं. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी घनिष्ठ संबंध असलेल्या एका गटाने भोपाळमध्ये 2016 मध्ये आयोजित लोकमंथन परिषदेतही त्यांचं भाषण झालं होतं. कोलकाता इथं बलुचिस्तान आणि काश्मीरवर फतेह यांची चर्चा आयोजित केली होती. पण पश्चिम बंगाल सरकारनं ती रद्द केली होती. स्थानिक भाजप नेत्याच्या नेतृत्वाखालील ‘स्वाधिकार बांग्ला फाउंडेशन’ द्वारे ही चर्चा आयोजित करण्यात आली होती.
फतेह हे स्वतःची ओळख सांगताना ‘मुस्लिम ज्यांचे पूर्वज हिंदू होते’ असे वर्णन करायचे. हिंदू धर्म हा भारताचा खरा, स्वायत्त विश्वास आहे, जो दीर्घकालीन हिंदुत्वाच्या भूमिकेला प्रतिध्वनित करतो असंही त्यांनी म्हटलं आहे. यासाठी त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ‘घर वापसी’ कार्यक्रमाचा दाखला दिला होता. तसेच फतेह यांनी नवी दिल्लीतील औरंगजेब रोडच्या नामांतराचं समर्थन केलं होतं. तसेच त्यांनी मुस्लिमांवर मुघल सम्राट बाबरची मूर्ती बनवल्याचा खळबळजनक आरोपही केला होता. याच कृतीमुळं बाबरी मशीद पाडण्याच्या चळवळीला प्रोत्साहन मिळाल्याचाही दावाही त्यांनी केला होता.