सोलापूर/ विशेष प्रतिनिधी :
इच्छा नसतानाही उध्दव ठाकरे यांना मुख्यमंत्री पद मिळाले. स्वतःला मुख्यमंत्री व्हायचे होते; म्हणून अदृश्य शक्तीच्या बळावर ठाकरेंचे सरकार उलथवून टाकणारे देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा मुख्यमंत्री व्हायचे होते, पण झाले उलटे. मनी असताना पण ध्यानी नसताना एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. I want to be Chief Minister; Nana Patole political talk Modi hai to mumkin hai ! Sharad Pawar Ajit Pawar संधी असतानाही मुख्यमंत्री पद न मिळाल्याने दीर्घकाळापासून नाराज असणाऱ्या अजितदादांनाही आता मुख्यमंत्री पद हवे आहे. त्यांनी तर ‘आत्ताच ‘ मुख्यमंत्री पदावर दावा केला आहे. आता या स्पर्धेत पुण्यातील कसब्याचे काँग्रेस आ. रवींद्र धंगेकर यांनीही उडी मारली आहे. म्हणे त्यांनाही मुख्यमंत्री व्हावेसे वाटत आहे. पण या सर्वांना मुख्यमंत्री करणार कोण ? या प्रश्नाचे उत्तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांनी ‘मोदी है तो मुमकीन है’ अशा मिश्किल शैलीत ‘सूचक’ शब्दात सध्या सुरू असलेल्या राजकीय घडामोडींवर ‘अचूक उत्तर दिले आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे नेते विधिमंडळातील विरोधी पक्षनेते अजित पवार नॉट रिचेबल झाले आणि त्यांच्या त्यांचे बंडाची चर्चा राज्यात सुरू झाली. ते त्यांच्या समर्थक चाळीस आमदारांना घेऊन पुन्हा एकदा भाजपला पाठिंबा देणार आणि स्वतः मुख्यमंत्री होणार अशी राजकीय अटकळ बांधली गेली. कारण सर्वोच्च न्यायालय सत्तांतर नाट्याचा निकाल देणार आणि मुख्यमंत्री शिंदे यांच्यासह १६ आमदार अपात्र होणार. त्यातूनच सरकार कोसळणार, त्यावेळी अजितदादा भाजपला मदत करणार, त्याबदल्यात त्यांना मुख्यमंत्री पद मिळणार, अशी चर्चा सुरू झाली. असे काहीच नाही, ही अफवा आहे, असे सांगत शेवटी अजितदादांनीच या चर्चेला पूर्णविराम दिला.
या पार्श्वभूमीवर राज्यातील इतर विषय मागे पडले आणि अजितदादांच्या मुख्यमंत्री पदाचीच हवा सुरू झाली महाविकास आघाडी म्हणून तिन्ही पक्ष एकत्र आहेत, मात्र वैयक्तिक अडचणीमुळे कोणी वेगळा निर्णय घेतला तर त्याबाबत सांगता येत नाही, असे विधान करून महाविकास आघाडीचे कर्तेधर्ते शरद पवार यांनी नवीन पुडी सोडली आणि चर्चेला दुसरे वळण लागले.
याच मुद्यावर माध्यमांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांना छेडले असता ‘मोदी है तो मुमकीन है’ अशा ‘सूचक शब्दात ‘अचूक’ उत्तर देत नानाभाऊंनी पुन्हा अजितदादांच्या बंडाच्या थंड होत चाललेल्या चर्चेला चालू ठेवण्याचे काम केले आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
○ नानाभाऊंच्या गंभीरतेवर रवीभाऊंची मिश्किली
दरम्यान, सोमवारी पुण्यातील कसब्याचे काँग्रेस आ. रवींद्र धंगेकर करमाळा दौऱ्यावर आले होते. त्यावेळी माध्यमांनी अजितदादांच्या विधानावरून छेडले असता ‘मलाही मुख्यमंत्री व्हावं वाटतंय’ असे हसत हसत उत्तर देत मिश्किली साधली. अजितदादांच्या विधानात स्पष्टता होती. त्यावर नानाभाऊंनी गांभीर्याने बोलत भाजपच्या हालचालींकडे बोट दाखवले होते. पण रवीभाऊंनी मिश्किली साधत आलेला प्रश्न आला तसा टोलवला.
● मुख्यमंत्री काँग्रेसचाच होणार
राजकारणात काहीही होऊ शकते. इथे कोणी कोणाचा मित्र नसतो आणि कुणीही शत्रू नसतो. मोदी है तो मुमकीन है. महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांकडे आपापले मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार आहेत. विधानसभेत ज्या पक्षाला जास्त जागा मिळतील त्या पक्षाचा मुख्यमंत्री होईल. काँग्रेसचेच सर्वाधिक आमदार निवडून येणार आणि भविष्यात राज्यात काँग्रेसचाच मुख्यमंत्री होणार, असा ठाम विश्वासही नानाभाऊ पटोले यांनी व्यक्त केला आहे.
● जेव्हा घ्यायची तेव्हा ठाम भूमिका घ्यावी लागेल
आज आमची आघाडी आहे. एकत्र काम करण्याची आमची इच्छा आहे. पण फक्त इच्छाच नेहमी पुरेशी नसते. जागांचे वाटप आणि त्यात काही अडचणी आहेत की नाहीत यावर अजून चर्चा केलेलीच नाही. कुणी फोडायचं काम करत असेल, त्यांचा तसा काही कार्यक्रम असेल तर ते करत राहतील. आम्हाला जेव्हा यासंदर्भात ठाम भूमिका घ्यायची असेल, तेव्हा ती घ्यावी लागेल, अशा शब्दात भविष्यातील महाविकास आघाडीवर शरद पवारांनी भाष्य केले आहे.