सोलापूर – मुरारजी पेठेतील उमा नगरीत राहणाऱ्या एका २२ वर्षीय तरुणीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली . ही घटना मंगळवारी (ता. 25) सकाळच्या सुमारास घडली. Engineering girl committed suicide by hanging herself in Umanagar Pune job
सुखदा अंबऋषी मोरे (वय २२ रा.उमा नगरी) असे गळफास घेतलेल्या तरुणीचे नाव आहे . सकाळी ११ वाजेच्या सुमारास तिच्या मृतदेह घरातील छताच्या लोखंडी हुकाला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. मयत सुखदा मोरे ही अभियांत्रिकीचे शिक्षण घेतली होती. ती पुण्यात जॉबला होती. तिच्या पश्चात आई आणि भाऊ असा परिवार असत्याची माहिती पोलिसांनी दिली . या घटनेची नोंद फौजदार चावडी पोलिसात झाली असून या मागचे कारण समजले नाही . पुढील तपास हवालदार घुगे करीत आहेत.
○ ताईचौकात इसमाची गळफास घेऊन आत्महत्या
ताई चौक परिसरातील पार्वती नगरात राहणाऱ्या विठ्ठल व्यंकटनरसु कतरोज या इसमाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली .
मंगळवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास त्याचा मृतदेह लाकडी वाशाला दोरीने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला . या घटनेची नोंद एमआयडीसी पोलिसात झाली असून या मागचे कारण समजले नाही . हवालदार बागवान पुढील तपास करीत आहेत.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
○ सिद्धार्थ नगरात महिलेची आत्महत्या
सदर बझार परिसरातील सिद्धार्थ नगरात राहणाऱ्या शुभांगी राहुल कानडी (वय३४ ) या महिलेने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली .
काल सोमवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास तिचा मृतदेह छताच्या पंख्याला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला . या घटनेची नोंद सदर बझार पोलिसात झाली असून या मागचे कारण समजले नाही.
○ विषबाधा झालेल्या वृद्ध महिलेचा मृत्यू
मंगेवाडी (ता.सांगोला) येथे विषबाधा झालेल्या साळूबाई भगवान यलपले (वय ८५ ) या सोलापुरातील शासकीय रुग्णालयात उपचार घेताना मंगळवारी सायंकाळी मयत झाल्या.
२० एप्रिल रोजी पहाटेच्या सुमारास त्या घरात झोपल्या होत्या . त्यावेळी फळीवर ठेवलेला पिकावरील फवारणीचा डबा अंगावर पडल्याने त्यातील विषारी द्रव तोंडात गेल्याने त्यांना विषबाधा झाली होती . सांगोला येथे प्राथमिक उपचार करून त्यांना सोलापुरात दाखल करण्यात आले होते . अशी नोंद तालुका पोलिसात झाली आहे.