जनहित याचिका दाखल : खारघर दुर्घटनेवर तातडीने सुनावणीस हायकोर्टाचा नकार

0
1

 

○ आता 8 जूनला होणार सुनावणी, पनवेल कोर्टातही तक्रार दाखल

मुंबई : महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यातील दुर्घटनेबाबत मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांच्यासह डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.  Public Interest Litigation filed: High Court’s refusal to urgently hear the Kharghar tragedy, court complaint Appasaheb Dharmadhikari उच्च न्यायालयात या जनहित याचिकेवर गुरुवारी सुनावणी झाली. यावेळी तातडीने सुनावणीस हायकोर्टाने नकार दिला आहे. या याचिकेवर 8 जूनला सुनावणी होणार आहे.

या सोहळ्यात मोठी दुर्घटना घडली आणि 14 लोकांचा मृत्यू झाला. यात मृतांचा आकडा लपवला जात असल्याचाही आरोप होत आहे. याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. याच्यावर तातडीची सुनावणी घेण्यात यावी, अशी मागणी याचिकाकर्त्या शैला कंठे यांनी वकील नितीन सातपुते यांच्यामार्फत केली होती. त्यावर आज गुरुवारी सुनावणी झाली. यावेळी न्यायालयाने मात्र तातडीच्या सुनावणीस नकार देत पुढील तारीख दिली आहे.

 

आता याप्रकरणी आता 8 जूनला सुनावणी होणार आहे. यामुळे आता 8 जूनला याचिकेवर काय निर्णय होणार? याकडे लक्ष लागले आहे. तर हा कार्यक्रम महाराष्ट्र सरकारचा होता. त्यासाठी 14 कोटी रुपये खर्च करण्यात आले होते. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह निरुपणकार डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केलीय.

या घटनेला महाराष्ट्र शासनाचे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आप्पासाहेब धर्माधिकारी त्यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा आणि सीबीआय चौकशी करा अशी मागणी करणाऱ्या याचिका न्यायालयाचे हंगामी मुख्य न्यायाधीश संजय गंगापूरवाला आणि संदीप मारणे यांनी दाखल करून घेतली आहे. याचिका कर्त्याच्या वतीने वकील नितीन सातपुते यांनी ही बाब किती गंभीर आहे, हे न्यायालयाच्या द्विख खंडपीठांसमोर मांडले आहे. संबंधित मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या संदर्भात आम्ही जी चौकशी मागणी केलेली आहे, त्याचा न्यायालयाने विचार करावा, अशी मागणीत केली आहे.

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

 

 

दरम्यान, या सोहळ्यात शासनाने कोणतेही पूर्वनियोजन केले नाही. म्हणूनच श्री सदस्यांचा चेंगराचेंगरीमुळे आणि विविध सेवा न मिळाल्याने मृत्यू झाल्याचे कारण सांगत मुंबईतील आम आदमी पक्षाचे धनंजय शिंदे यांनी पनवेल न्यायालयामध्ये फौजदारी तक्रार दाखल केली. या सोहळ्यामध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह तसेच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. याशिवाय अनेक मंत्री आणि इतर आमदार, मान्यवर मंडळी उपस्थित होते.

याचिकेमध्ये महाराष्ट्र शासनाविरुद्ध फौजदारी तक्रार दाखल करण्यासंदर्भात नमूद केलेले आहे की, कार्यक्रमाला लाखो लोकांचा जमाव जमणार आहे; मात्र त्याचे नियोजन, व्यवस्थापन, लोकांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, वैद्यकीय व्यवस्था आणि चेंगराचेंगरी टाळण्यासाठीची व्यवस्था यापैकी कोणतेही नियोजन शासनाने केले नव्हते. त्यामुळेच 14 श्री सदस्यांचा म्हणजे नागरिकांचा मृत्यू ओढावला. याला महाराष्ट्र शासन जबाबदार आहे आणि याची चौकशी झाली पाहिजे. याप्रकरणी दोषींवर त्वरित कारवाई देखील केली पाहिजे, अशा प्रकारची याचिका पनवेल न्यायालयामध्ये वकील असीम सरोदे यांच्यामार्फत धनंजय शिंदे यांनी दाखल केलेली आहे.