मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यात भावी मुख्यमंत्र्यांची चर्चा सुरु आहे. यातच आता शिंदे गटाचे मंत्री अब्दुल सत्तार यांनी भाजपा नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी मुख्यमंत्री व्हावे, अशी इच्छा व्यक्त केली आहे. ‘हनुमानासारखी माझी छाती फाडून दाखवली तर त्यामध्ये राधाकृष्ण विखे पाटीलच दिसतील. विखे पाटील मुख्यमंत्री काय त्यापेक्षा मोठे नेते व्हावेत असे मला वाटते,’ अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. ‘Radhakrishna Vikhe-Patal should be Chief Minister; Abdul Sattar Hanuman’s political desire to tear the chest of Shinde group’s ministers
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भाजपला अपेक्षित अशी कामगिरी करता न आल्याने दिल्लीत पडद्यामागे मुख्यमंत्री बदलण्याच्या हालचाली सुरु आहेत, असे वक्तव्य खासदार संजय राऊत यांनी केले होते. राऊतांच्या या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली होती. ही सगळी चर्चा सुरु असतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नाराज होऊन साताऱ्याला त्यांच्या गावी निघून गेले आहेत. भाजपकडून पडद्यामागून अजित पवार यांच्याशी सुरु असलेल्या वाटाघाटी आणि मुख्यमंत्री बदलण्याच्या हालचाली या बातम्यांमुळे एकनाथ शिंदे हे नाराज झाल्याचे सांगितले जाते. त्यामुळे त्यांनी तडकाफडकी तीन दिवसांसाठी साताऱ्याला जाण्याचा निर्णय घेतला, अशी कुजबूज सुरु आहे. या पार्श्वभूमीवर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी स्पष्टीकरण देत हा दावा फेटाळून लावला आहे.
अशा वेळेस शिंदे गटातील मंत्र्यानी मुख्यमंत्री बदलाची इच्छा व्यक्त केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. काही दिवसांपासून राज्यात पुन्हा मुख्यमंत्री पदाविषयी चर्चा सुरु झाली आहे. त्यातच अजित पवार भावी मुख्यंमत्री म्हणून धाराशिव, नागपूर आणि मुंबई बॅनर लागले होते. दुसरीकडे देवेंद्र फडणवीस भावी मुख्यमंत्री असे बॅनर नागपूरमध्ये लागले होते.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
यामुळेच राज्यात चार वर्षात तिसरे मुख्यमंत्री मिळणार का? अशी चर्चा सुरु झाली आहे. त्यापार्श्वभूमीवर अब्दुल सत्तार यांना तुम्हाला कोण मुख्यमंत्री व्हावं वाटतं, असा सवाल पत्रकारांनी विचारला. त्यावर अब्दुल सत्तार यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांचे नाव घेतले.
कृषीमंत्री अब्दुल सत्तार म्हणाले, मी जर हनुमान महाराजासारखा एखादा भक्त असतो. तर छाती चिरून दाखवली असती की, मुख्यमंत्री पदासाठी माझ्या हृदयामध्ये माझे परममित्र विखे पाटील आहेत. विखे पाटील मुख्यमंत्री व्हावे, अशी माझी इच्छा असल्याचे वक्तव्य अब्दुल सत्तार यांनी केले.
अब्दुल सत्तार यांनी पुढे म्हटले की, सध्या एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहेत. मात्र विखे पाटील हे माझे परममित्र आहेत. त्यामुळे आपला मित्र मुख्यमंत्री व्हावा, असं कुणाला वाटत नाही. त्याप्रमाणेच विखे पाटील मुख्यमंत्री व्हावेत, अशी माझी इच्छा आहे, असं मत सत्तार यांनी व्यक्त केले. पण याचवेळेस त्यांना अडचण होईल असा कोणताही प्रश्न तुम्ही विचारू नका, असं आवाहन अब्दुल सत्तार यांनी केलं.