सोलापूर : विद्युत वितरण कंपनीकडून मंद्रुप सबस्टेशन येथील दुरुस्ती कामासाठी १० मे रोजी दुपारी 2 तास शटडाऊन घेण्यात येणार आहे. त्यामुळे टाकळी हेड वर्क्स येथून होणारा पाणी उपसा पुरेशा प्रमाणात होणार नसल्याने सोरेगाव जलशुध्दिकरण केंद्रावरुन होणारा दि.१० मे २०२३ रोजीचा नियोजित पाणी पुरवठा उशीरा, कमी वेळ व कमी दाबाने होणार आहे. Solapur city’s water supply tomorrow Wednesday will be late, low pressure frugal appeal
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी, सोलापूर विभागाकडून १३२ के.व्ही / ३३ के.व्ही मंद्रुप सबस्टेशनहून टाकळी हेड वर्क्सला ३३ के.व्ही उच्च दाबाने विद्युत पुरवठा केला जातो. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या विनंती नुसार मंद्रुप सबस्टेशन विभागाकडून मंद्रुप सबस्टेशन येथील दुरुस्ती कामासाठी दि.१० मे २०२३ रोजी दुपारी ३ ते ५ वाजेपर्यंत शटडाऊन घेणेत येणार आहे.
त्यामुळे टाकळी हेड वर्क्स येथून होणारा पाणी उपसा दि. १० मे २०२३ रोजी पुरेशा प्रमाणात होणार नसल्याने सोरेगाव जलशुध्दिकरण केंद्रावरुन होणारा दि.१० मे २०२३ रोजीचा नियोजीत पाणी पुरवठा उशीरा, कमी वेळ व कमी दाबाने होणार आहे.
नागरिकांनी उपलब्ध पाण्याचा वापर काटकसरीने करुन महानगरपालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन महापालिकेचे कार्यकारी अभियंता तथा सार्वजनिक आरोग्य अभियंता विजयकुमार राठोड यांनी केले आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
》 सायबर टेक कंपनीकडून सर्व डाटा हस्तांतरित करणार; महापालिका उपायुक्त विद्या पोळ यांची माहिती
सोलापूर महानगरपालिका क्षेत्रात मिळकतकरांचे सर्वेक्षण सायबर टेक कंपनीकडून करण्यात आले. दरम्यान या मिळकत सर्वेक्षणाला आता पाच वर्षे पूर्ण झाली आहे. सायबर टेक कंपनीकडून पूर्वी केलेल्या सर्वेक्षणाचा डाटा हस्तांतरित करण्यात येत असल्याची माहिती महापालिका उपायुक्त विद्या पोळ यांनी मंगळवारी दिली.
सोलापूर शहरातील मिळकती करा संदर्भात सायबर टेक कंपनीकडून 2013 -14 साली शहराचे सर्वेक्षण करण्यात आले होते. ते सर्वेक्षण 2016- 17 मध्ये पूर्ण झाले. दरम्यान, सर्वेक्षणाला पाच वर्षे पूर्ण झाल्यामुळे नियमित पंचवार्षिक रिविजन म्हणून शहराचा पुन्हा एकदा सर्वेक्षण करण्यात येणार आहे.
आता सोलापूर महापालिका आणि सायबर टेक कंपनी यांच्यात कोणताही संबंध राहिलेला नाही. त्यामुळे सायबर टेक कंपनीकडून सर्व डाटा हस्तांतरित करण्याचे काम सुरू आहे, असेही पोळ यांनी सांगितले. डाटा हस्तांतरांचे काम संपल्यानंतर बिलिंगचे सर्वर सुरू करण्यात येणार आहे. साधारणतः आठवडाभरात हे सर्वर सुरू होईल असेही पोळ यांनी सांगितले.
दरम्यान, सायबर टेक कंपनीचे सर्व बिल अदा करण्यात आले आहे, काही बाकी नसल्याचे उपायुक्त पोळ यांनी स्पष्ट केले.