○ तोतया पत्रकाराची धमकी; मला हात लावताच अनेक सीपींची फोन येतील
पुणे / सोलापूर : पुणे येथील एका व्यवसायिकाला पाच कोटींची खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या सोलापूर येथील बनावट बोगस पत्रकार व त्याच्या भावावर पाटस येथे पोलिसांवर गाडी अंगावर घालून जीवे मारण्याचा प्रयत्न करणे व सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महेश सौदागर हनमे (वय ४७) , दिनेश सौदागर हनमे (वय ४४, दोघेही रा.राजेश्वरीनगर,बोळे, उत्तर सोलापूर जि.सोलापुर) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पुणे येथील चंदननगर पोलीस स्टेशन मध्ये महेश हनमे याच्यावर कलम ३८६ कायद्यांतर्गत गुन्हा दाखल होता.
पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, खराडी येथील ३४ वर्षीय फिर्यादी व्यावसायिकांची सॉफ्टवेअर कंपनी आहे. ऑगस्ट २०२२ पासून आरोपी महेश हा पत्रकार असल्याचे सांगून बदनामी करण्याच्या उद्देशाने व्यावसायिकाला खोट्या बातम्या तयार करून प्रसारित करण्याबरोबरच खोट्या पोलिस केसमध्ये अडकविण्याची धमकी देत होता. त्याद्वारे महेश याने फिर्यादींकडून ३ लाख ८० हजार रुपयांची खंडणी उकळी. मात्र, त्यानंतर देखील तो त्यांच्याकडे पाच कोटींची खंडणी मागत होता. तातडीने पन्नास लाखांची खंडणी घेऊन त्याने फिर्यादींना मोहोळ येथे बोलावले होते. याबाबत चंदननगर पोलिसात महेश याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करून पोलिसांनी तपास सुरू केला होता.
तोतया पत्रकार हणमे हा आपण मोठे प्रस्थ असल्याचे सांगून व्यावसायिकाला धमकावत होते. एवढेच नाही तर तू कोणत्याही पोलिसांकडे तक्रार कर, आम्हाला काहीच फरक पडणार नाही. त्यांनी मला हात लावला तर अनेक सीपींचे फोन येतील, असे म्हणून धमकावत होता.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
पाटस हद्दीत पुणे खंडणी विरोधी पथकाच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न केल्याची माहिती आहे. खंडणी विरोधी पथकाने संबधीत आरोपींच्या गाडीच्या चाकावर गोळीबार केल्यानंतर ती गाडी थांबली गेल्याची माहिती आहे.
आयटी कंपनीच्या व्यवसायिकाला या हनमे याने पाच कोटी रुपयांची खंडणी मागितली. दरम्यानच्या काळात व्यावसायिकाने पाच लाख रुपये त्याला दिले होते, मात्र आता कसल्याही परिस्थितीत पन्नास लाख रुपये द्या अशी धमकी त्याने त्या संबंधित व्यवसायिकाला दिली होती, त्यावरून व्यवसायिकाने गुन्हा दाखल केला आणि पोलीस हनमे याच्या पाळतीवर होते. गुरुवारी (ता. 18) दुपारी दोघांचे पुणे सोलापूर महामार्गावरील वरवंड येथे लोकेशन मिळत होते. त्यानुसार पथकाने पाठलाग केला. पथकाने पाटस टोल नाक्याच्या काही अंतरावर सापळा लावला.
महेश हनमे याला अटक करण्यासाठी पुणे येथील खंडणी विरोधी पोलीस पथकाने त्याच्या गाडीचा पाठलाग केला. पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील पाटस टोलनाक्यापासून अंदाजे पाचशे मीटर अंतरावर या आरोपींची गाडी थांबवण्याचा प्रयत्न या पोलीस पथकाने केला. मात्र त्यांनी पोलिसांवर दगडाने व हाताने मारहाण करून फोर्ड फिएस्टा गाडी (नंबर एम एच 14 बीके 44 84 ) खंडणी विरोधी पथकाचे पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत चव्हाण व इतर पोलीस कर्मचाऱ्यांच्या अंगावर जीवे मारण्याच्या उद्देशाने अंगावर घातली व सरकारी कामात अडथळा निर्माण केला.
अशी फिर्याद पोलीस हवालदार सुरेंद्र दिलीप जगदाळे यांनी यवत पोलीस ठाण्यात दिल्याने या दोघांवर सरकारी कामात अडथळा आणणे व जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यवत पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक केशव वाबळे हे या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.
● पळून जाण्याचा अयशस्वी प्रयत्न
आरोपी चार चाकीने सोलापूर दिशेला जात असताना खंडणी विरोधी पथकाने त्यांना अडविले. मात्र त्यांनी पथकाच्या अंगावर गाडी घालून पळून जाण्याचे धाडस केले. त्यावेळी पथकातील पोलिसांनी त्यांच्या गाडीच्या चाकावर गोळीबार केला. या गोळीबारात टायर फुटल्याने गाडी थांबताच दोघांना ताब्यात घेण्यात पोलिसाना यश आले.
संबंधित आरोपी हे पत्रकार बेबपोर्टलचालक आहे. शिवाय त्यांच्या गाडीच्या काचेवर तसे नाव लिहिले आहे. संबंधित आरोपींनी पूणे येथे एकास अंदाजे पाच कोटींची खंडणी मगितल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.
● व्यापारी फिर्यादी होता पोलिसासोबतच
आरोपींनी खंडणीची मागणी करताच अपर पोलिस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे, उपायुक्त अमोल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणीविरोधी पथकाने सापळा रचला. दोघा हनमे बंधुंना बोलण्यात गुंतवून खंडणी घेण्यासाठी लोणीकाळभोर परिसरात बोलावून घेतले. मात्र, आरोपींनी फिर्यादीला यवत परिसरात या म्हणून सांगितले. पोलिस उपनिरीक्षक श्रीकांत चव्हाण हे फिर्यादीसोबत गाडीत होते. हनमेने त्यांना पाहिले असता पोलिस असल्याचा त्याला संशय आला. त्यांनी एकट्या फिर्यादींना गाडीच्या खाली बोलावून घेतले. त्या वेळी चव्हाण आणि त्यांच्या साथीदारांनी दोघांपैकी एकाला पकडले.
त्याने पोलिसांना मारहाण करत शिवीगाळ केली. त्याचवेळी दुसऱ्या एकाने कार चालू करून पोलिसांच्या अंगावर घालण्याचा प्रयत्न केला. एका कर्मचाऱ्याला दुखापत झाली. चव्हाण यांनी प्रसंगावधान राखत गाडीच्या पाठीमागील चाकावर गोळीबार केला. त्याचवेळी पाठीमागून आलेले पोलिस उपनिरीक्षक मोहनदास जाधव यांच्या पथकाने स्थानिक नागरिकांच्या मदतीने दोघा आरोपींना पकडले.