○ एरंडीच्या बिया खावून आत्महत्येचा प्रयत्न, सुदैवाने वाचली
सांगोला : भारतीय जनता पार्टीचे सोलापूर जिल्ह्याचे माजी जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांची पत्नी असल्याचा दावा करणाऱ्या निर्मला यादव या महिलेने पुन्हा आक्रोश सुरू केल्याने भाजपात खळबळ उडाली आहे. गुरूवारी सांगोला तालुक्यातील जवळा गावाजवळील देशमुख वस्ती येथे तुफान नाट्य घडले. ‘That’ woman who claims Srikant Deshmukh as his wife again in Sangola Nirmala Yadav BJP Solapur Sangola
या महिला देशमुख वस्तीतील श्रीकांत देशमुख यांच्या घरात प्रवेश करण्याचा प्रयत्न करून त्यांच्या वडिलांना भेटण्याचा प्रयत्न केला परंतु लालासाहेब देशमुख यांनी तुमचा नवरा येथे राहत नाही, जिथे राहतो तिकडे जावा म्हणून हाकलून दिले. त्यानंतर संतापाच्या भरात त्या महिलेने एरंडीच्या बिया खाऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यातून विषबाधा झाल्याने या महिलेला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. तिची प्रकृती स्थिर आहे.
या महिलेने एक नवा व्हिडिओ सर्वत्र पाठवला आहे. ‘तुम्ही मंदिरात माझ्या गळ्यात मंगळसूत्र बांधले आहे, मला तुमची म्हणा’. अन्यथा ‘मी नाही जगू शकणार’, असा इशारा दिल्यामुळे श्रीकांत देशमुख यांच्या अडचणी वाढल्या आहेत.
याबाबतचे वृत्त असे की- श्रीकांत देशमुख हे भाजपाच्या जिल्हाध्यक्ष पदावर असताना निर्मला यादव या महिलेने आपण त्यांची पत्नी असल्याचा दावा केला होता. एका ठिकाणी दोघेही प्रेमाच्या गोष्टी करत असतानाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. या महिलेने हा गौप्यस्फोट केल्यानंतर देशमुख यांना आपल्या पदावर पाणी सोडावे लागले. या प्रकारामुळे भाजपाची सर्वत्र नाचक्की झाली.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
या महिलेने गुरूवारी पुन्हा श्रीकांत यांच्या प्रेमाचा पाढा वाचायला सुरुवात केली. तिने देशमुखांचे घर गाठले पण श्रीकांत यांच्या वडिलांनी तिला दारातूनच हाकलून दिले. रागाच्या भरात एरंडीच्या बिया खाल्ल्यानंतर ती सांगोला पोलीस स्टेशनमध्ये हजर झाली. हा प्रकार समजल्यानंतर पोलिसांनी तिला ग्रामीण रुग्णालयात दुपारी एक वाजता दाखल केले. तिथे डॉ. साळुंखे यांनी प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी सोलापूर येथील रुग्णालयात पाठविले. या महिलेने चालीस एरंडीच्या बिया खाल्ल्यामुळे रक्तदाब वाढल्याचे डॉ. साळुंखे यांनी सांगितले.
खासदार रणजीत सिंह निंबाळकर यांच्या वाडेगाव येथील कार्यकर्त्यांनी सांगोला पोलीस स्टेशनमध्ये भाजपाच्या प्रमुख नेत्यांची बदनामी केली म्हणून फिर्याद दाखल केली आहे. त्याचाही परिणाम या महिलेवर झालेला दिसून येत आहे त्यानंतर तिने आज आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला, असे भाजपा नेत्यांचे म्हणणे आहे.
● तुम्ही मला घरात घ्या…
आत्महत्येच्या प्रयत्नापूर्वी व्हिडिओत ती असे म्हणते की श्रीकांत मी तुझ्याशी लग्न केले आहे – मला तुम्ही मंदिरात मंगळसूत्र घातलेले आहे. तरी तुम्ही मला घरात घ्या. मला तुमची म्हणा. मी तुमच्याशिवाय जगू शकत नाही. तुम्ही माझा स्वीकार नाही केला तर मी आत्महत्या करेन तुमच्या नावानेच जीवनाचा अखेरचा निरोप घेईन माझ्याकडे तुमच्याशिवाय दुसरा पर्याय नसल्यामुळे मी माझे जीवन संपवत आहे श्रीकांत देशमुख मला तुमच्याशी शेवटचे बोलायचे आहे माझी जगण्याची लायकी राहिली नाही माझ्या जागी दुसरी मुलगी असती तर तिने पहिलेच असे केले असते.
● बीजेपीमुळे संसार उद्ध्वस्त
माझ्या मृत्यूस तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, श्रीकांत देशमुख व त्यांचे दोन भाऊ हे जबाबदार असतील असे तिने व्हिडिओत म्हटले आहे. ती पुढे म्हणते की मला कोणी पाठिंबा दिला नाही. मदत केली नाही. युवा मोर्चातील गणेश पांडे दिवेकर अमित शेलार नील सोमय्या दीपक ठाकूर संतोष आव्हाड आणि इतर लोकांना माहित आहे, मी कशी आहे ती, तसेच आशिष शेलार व दिव्या ढोले यांनाही माहीत आहे मी कशी आहे ती. माझा संसार होता. बीजेपीमुळे माझा संसार उद्ध्वस्त झाला आहे.
● कोण आहे, निर्मला…
निर्मला यादव ही महिला मूळची पुण्याची असल्याचे सांगण्यात येते. ती भाजपाची काम करत असे. ती चांगल्या घराण्यातली.भाजपाच्या कार्यातून तिची श्रीकांत देशमुख यांची ओळख झाली आणि त्यातून एकमेकांवर प्रेम जडले. एकांतातील प्रेमाचे संभाषण असणारा एक व्हिडिओ दीडवर्षांपूर्वी व्हायरल झाल्यानंतर देशमुखांना जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला. यानंतर आई-वडील व भाऊ यांनी आमचा श्रीकांतशी काहीही संबंध नाही, असे सांगितले होते. या महिलेने पुन्हा टोकाचे पाऊल उचलल्याने देशमुख यांच्या प्रेमाचे प्रकरण कोणते वळण घेणार याकडे लक्ष लागून राहिले आहे.