● सोलापुरात रविवारी काँग्रेसचा निर्धार मेळावा
सोलापूर : वरिष्ठ स्तरावर महाआघाडीचा धर्म सर्व तिन्ही पक्षांनी पाळावा असे ठरले आहे. सोलापूर शहरात काँग्रेसचे पदाधिकारी राष्ट्रवादीत घेताना त्यांनी आघाडीचा धर्म पाळला का याचा विचार त्यांनी करावा, आघाडीचा धर्म फक्त कॉंग्रेसनेच पाळायचा का असा टोला कॉंग्रेस शहर अध्यक्ष चेतन नरोटे यांनी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष भारत जाधव यांना लगावला आहे. Did you not remember the religion of Aghadi while taking the office bearers of Congress into NCP? Question by Chetan Narote Bharat Jadhav Solapur
काँग्रेसच्या वतीने रविवारी ( 21 मे) निर्धार महामेळावा आयोजित करण्यात आला आहे, त्याबाबत माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत चेतन नरोटे बोलत होते. रविवारी (ता.21) होणाऱ्या मेळाव्यात राष्ट्रवादीसह भाजप, एमआयएमचे नेते प्रवेश करणार आहेत, असे मध्यंतरी चेतन नरोटे यांनी म्हटले होते. त्यावर राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष भारत जाधव यांनी काही पोरांना पक्षांमध्ये घेतल्यावर पक्ष फोडला असे होत नाही असे म्हणत काँग्रेसने आघाडीचा धर्म पाळावा, असे आवाहन केले होते.
याबाबत बोलताना चेतन नरोटे म्हणाले की, महाआघाडीचा धर्म तिन्ही पक्षांनी पाळावा असे ठरले आहे. मागच्या काळात राष्ट्रवादीने काँग्रेसचे अनेक पदाधिकारी आपल्या पक्षात घेतले. त्यावेळी त्यांना आघाडीचा धर्म आठवला नाही का? काँग्रेसनेच केवळ आघाडीचा धर्म पाळावा का हा त्यांनी विचार करावा.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
रविवारी होणाऱ्या मेळाव्यात राष्ट्रवादी आणि भाजपसह अनेक पक्षाचे कार्यकर्ते काँग्रेसमध्ये येणार असल्याचे त्यांनी यावेळी पुन्हा सांगितले. कर्नाटक मध्ये शनिवारी काँग्रेसचे सिद्धरामय्या हे मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. त्यावेळी शहर काँग्रेस तर्फे ठीक ठिकाणी जल्लोष करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेला माजी आमदार प्रकाश यलगुलवार, सिद्धाराम म्हेत्रे, विश्वनाथ चाकोते सुरेश हसापुरे, सुदीप चाकोते आदी उपस्थित होते.
○ रविवारी होणार निर्धार मेळावा
रविवार, 21 रोजी शहर आणि जिल्हा काँग्रेसतर्फे निर्धार महामेळाव्याचे आयोजन करण्यात आल्याचे चेतन नरोटे यांनी यावेळी सांगितले. या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले असणार आहेत. याशिवाय या कार्यक्रमास माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासह अनेक नेते उपस्थित राहणार आहेत. या नेत्यांच्या स्वागतासाठी शहर काँग्रेस आणि युवक काँग्रेस सज्ज असल्याचेही ते म्हणाले.
● ‘नोटबंदीचा हा निर्णयही बालिश’
केंद्र सरकारने 2,000 रुपयांची नोट बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. यावर काँग्रेस नेते व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली. मागील नोटबंदीच्या निर्णयाप्रमाणे हा निर्णयही बालिशपणाचा आहे. मागच्या नोटबंदीने 3 उद्दीष्ट साध्य करायची होती. भ्रष्टाचार बंद, काळा पैसा नष्ट, पाकिस्तानातून होणार दहशतवाद कमी होईल ही उद्दीष्ट होती. यापैकी एकही उद्दीष्ट साध्य झाले नाही, असे चव्हाण म्हणाले.