सोलापूर : अंत्यविधी उरकून घराकडे परतत असतानाजमावामध्ये ट्रक घुसून अपघात झाला आहे. या अपघातामध्ये एकाच कुटुंबातील तीन महिलांचा जागीच मृत्यू झाला आहे. ही घटना पंढरपूरपासून जवळ असलेल्या टेंभुर्णी रोडवरील टाकळी पुनर्वसन गावानजीक रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास घडली. 3 women killed, 6 injured in fatal accident while returning from funeral Pandharpur Solapur
पंढरपूर तालुक्यात भीषण अपघात झाला आहे. सासऱ्याचा अंत्यविधी उरकून घराकडे परत निघालेल्या शोकाकुल महिलांच्या जमावात अचानक भरधाव ट्रक घुसला. यामध्ये तीन महिलांचा जागीच मृत्यू झाला, तर 6 महिला जखमी झाल्या. ठार झालेल्या महिला अंत्यसंस्कार केलेल्या व्यक्तीच्या सुना आहेत.
ही घटना काल (21 मे ) रात्री 11 वाजता टाकली गुरसाळे येथे घडली आहे. गेनदेव गुटाळ यांचा अंत्यसंस्कार उरकून ते घरी जात होते. अपघातातील मृत 2 महिला गुटाळ यांच्या सुना आहेत.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
टाकळी गुरसाळे (ता.पंढरपूर) येथील गेनदेव गुटाळ यांचे शुक्रवारी (ता.19) ७ वाजता निधन झाले होते. त्यांच्यावर रात्री आकरा वाजण्याच्या सुमारास गुरसाळे गावच्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यानंतर शोकाकुल महिला पंढरपूर – वेनेगाव रोडच्या बाजूने घराकडे परतत होत्या. यावेळी करकंब कडून भरधाव वेगाने येणारा मालट्रक महिलांच्या घोळक्यामध्ये घुसला.
या भीषण अपघातात मृत गुटाळ यांच्या दोन सुना हिराबाई भारत गुटाळ (वय 35 वर्षे) व मुक्ताबाई गोरख गुटाळ (वय 40 वर्षे) या ठार झाल्या. तिस-या मृत महिलेचे नाव समजू शकले नाही तर इतर सहा महिला गंभीर जखमी झाल्या. गुरसाळे येथे टाकळी जवळ पंढरपूर-वेणेगाव रस्यावर (शुक्रवार) रात्री 11 वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. या घटनेचा अधिक तपास पंढरपूर तालुका पोलीस करत आहेत.