● पुणे विभागात सोलापूर जिल्ह्याचा निकाल सर्वाधिक
पुणे : अखेर प्रतिक्षा संपली आहे. महाराष्ट्रात बारावीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. यंदा 91.25% निकाल लागला आहे. 12th Result 91.25%, Back Girls Top Pune Division Solapur Highest Result Secondary Higher Secondary Maharashtra बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी ही माहिती दिली आहे. बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी ही माहिती दिली आहे. हा निकाल ऑनलाईन जाहीर झाला आहे. तुम्हाला तुमचा निकाल खालील संकेतस्थळावर पाहता येणार आहे.
आज महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण विभागाने बारावीचे निकाल जाहीर केले. राज्याचा एकूण निकाल 91.25 टक्के लागला आहे. या वर्षीच्या निकालामध्येही कोकण विभागाने बाजी तर मारली 96.01 टक्के आहे. तर सर्वात कमी निकाल हा मुंबई विभागाचा 88. 13 टक्के इतका लागला आहे. तसेच यंदाही बारावीच्या निकालात मुलींनी बाजी मारली आहे. मुलींचा निकाल 93.73 टक्के तर मुलांची 89.14 टक्के इतका आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल आज जाहीर करण्यात आला. यंदा राज्याचा बारावीचा निकाल ९१.२५ टक्के इतका लागला असून तो गतवर्षीच्या तुलनेत २.९७ टक्केनी घटला आहे.
आज दुपारी २ वाजल्यापासून हा निकाल सर्वांना ऑनलाईन उपलब्ध झाला आहे. यंदाच्या वर्षी या परीक्षेसाठी १४ लाख २८ हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. कोकण विभागाचा निकाल सर्वाधीक तर मुंबई विभागाचा निकाल सर्वात कमी लागला आहे. मुलाच्या तुलनेत मुलीच उत्तीर्णतेच प्रमाण ४.५९ टक्के जास्त आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
विभाग निहाय निकाल पुढीलप्रमाणे :
पुणे – ९३.३४%, नागपूर – ९०.३५, औरंगाबाद- ९१.८५, मुंबई- ८८.१३, कोल्हापूर – ९३.२८, अमरावती – ९२.७५, नाशिक- ९१.६६, लातूर- ९०.३७, कोकण – ९६.१, शाखा निहाय निकाल : कला-८४.०५, विज्ञान- ९६.९, वाणिज्य – ९०.४२, व्यवसाय अभ्यासक्रम – ९१.२५.
अमरावती विभागाचा एकूण निकाल ९२.७५ टक्के लागला असून, पश्चिम वऱ्हाडातून वाशिम जिल्हा अव्वल राहिला आहे. बुलढाणा जिल्हा दुसऱ्या स्थानी आहे. पुणे, अहमदनगर आणि सोलापूर या तीन जिल्ह्यांचा समावेश होत असलेल्या पुणे विभागात 137 विषयांची परीक्षा घेण्यात आली. त्यातील 34 विषयांचा निकाल 100 टक्के लागला आहे. पुणे विभागात सोलापूर जिल्ह्याचा निकाल सर्वाधिक (93.69 टक्के) लागला आहे. अहमदनगर जिल्ह्याचा 92.63 टक्के तर पुणे जिल्ह्याचा सर्वात कमी 91.14 टक्के निकाल लागला आहे.
महाराष्ट्रात आज बारावीचा निकाल जाहीर झाला आहे. एकूण 91.25 टक्के विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी यामध्ये यश मिळवले आहे. तर दुसरीकडे मध्य प्रदेश आणि उत्तराखंड येथील शिक्षण मंडळानेही दहावी आणि बारावीचा निकाल जाहीर केला आहे. मध्य प्रदेशात बारावीत 55.28 टक्के आणि दहावीत 63.29 टक्के मुले-मुली पास झाले आहेत. तर उत्तराखंडमध्ये बारावीचा 80.98 टक्के आणि दहावीचा 85.17 टक्के निकाल लागला आहे.
● बारावीचा एकूण निकाल 91.25%
विज्ञान शाखा – 96.09%
कला – 84.05%
वाणिज्य – 90.42 %
व्यवसाय अभ्यासक्रम – 89.25%