सोलापूर : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते लोकार्पण झाले. आज गुरुवारी दुपारी एकच्या दरम्यान सात रस्ता येथे बांधण्यात आलेल्या सोलापुरातील नूतन जिल्हाधिकारी कार्यालयाचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला. कोनशिलेच्या उद्घाटनानंतर त्यांनी परिसरातील संविधान प्रास्ताविक शिलालेखाचे उद्घाटन केले. जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या दालनात येऊन त्यांनी काही वेळ पाहणी केली. New Collectorate in Solapur inaugurated by Deputy Chief Minister Devendra Fadnavis Animal Mitra Vilas Shah Bhowal Slaughterhouse Demand Shutdown
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नवीन वास्तूचे उद्घाटन केले आहे. दोन वेळा फडणवीसांचा दौरा रद्द झाल्याने हे उद्घाटन रखडले होते. येथील संविधानाच्या कोनशिलेचेही फडणवीस यांनी उद्घाटन केले. दरम्यान आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आज दिवसभर फडणवीस हे विविध बैठकांना या ठिकाणी हजेरी लावली.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच आज दुपारी १२.३० च्या सुमारास सोलापूर येथे आगमन झालं. विमानतळावर त्यांच स्वागत शहर भाजपाध्यक्ष विक्रम देशमुख, आ. विजय देशमुख, आ. सुभाष देशमुख याचबरोबर माजी आमदार प्रशांत परिचारक आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांनी केलं.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सोलापूर जिल्हा दौऱ्यावर असून याठिकाणी नूतन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीचे उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात आले. देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर पालकमंत्री राधाकृष्ण विखेपाटील, खा. शिवाचार्य महास्वामी, खा. रणजितसिंह निंबाळकर आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आमदार बबनराव शिंदे, आमदार समाधान आवताडे, आमदार राम सातपुते, आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, आमदार राजेंद्र राऊत, आमदार शहाजी बापू पाटील, माजी आमदार प्रशांत परिचारक, प्रभारी जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, सहाय्यक जिल्हाधिकारी मनीषा आव्हाळे, निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अमोल शिंदे, भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष शहाजी पवार यांची उपस्थिती होती.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, शेतकऱ्यांना अवकाळी पाऊस किंवा वेगवेगळी मदत देण्याकरता राज्य सरकारच्या वतीने जवळपास 472 कोटी रुपयांची मदत आम्ही दिलेली आहे. गेल्या दोन महिन्यातली थोडीशी मदत बाकी आहे, पण ती फार कमी आहे आणि ती पुढील 15 दिवसांमध्ये वितरीत करू. त्यामुळे मोठ्या प्रमाणात ती मदत शेतकऱ्यांपर्यंत पोहचली की नाही याचा आढावा घेतला तर ती जवळपास 198 कोटी रुपये जे मागील अवकाळीचे होते, ते शेतकऱ्यांपर्यंत पोहचले आहेत. 50 हजार रुपये शेतकऱ्यांपर्यंत पोहचवले आहेत. वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांचं कसं भलं करता येईल हा प्रयत्न आम्ही केलेला आहे, अशी माहिती फडणवीस यांनी दिली.
या कार्यक्रमावेळी अनेक लोक उपमुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी उपस्थित होते. सोलापुरातील प्राणी मित्र असलेले विलास शाह यांनी मुळेगाव तांडा रोडवरील सोनाई कत्तलखाना बंद करावी यासाठी उपमुख्यमंत्री फडणवीस यांना निवेदन दिले. आश्वासन पूर्ण न केल्यास 15 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकार्यालयासमोर आत्मदहाचा इशारा दिला.
🕞 3.30pm | 25-05-2023 📍 Solapur | दु. ३.३० वा. |२५-०५-२०२३ 📍 सोलापूर.
LIVE | सोलापूर सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडच्या वतीने विकास कामांचे लोकार्पण #solapur #Maharashtra https://t.co/ldApJvjjSb— Devendra Fadnavis (Modi Ka Parivar) (@Dev_Fadnavis) May 25, 2023
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
🕒 2.55pm | 25-05-2023 📍 Solapur | दु. २.५५ वा. |२५-०५-२०२३ 📍सोलापूर.
🔸सोलापूर महानगरपालिका व सोलापूर सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत झालेल्या प्रकल्पांचा लोकार्पण सोहळा.
🔸Inauguration ceremony of projects under Solapur Municipal Corporation and Solapur City… pic.twitter.com/2vVLSCgzlm— Devendra Fadnavis (Modi Ka Parivar) (@Dev_Fadnavis) May 25, 2023
वृद्ध प्राणीमित्र विलास शहा हातात निवेदन घेऊन उभे होते. देवेंद्र फडणवीस यांनी या शहांच्या समस्या उभे राहून जाणून घेतली. परंतु बोलता बोलता ते भोवळ आल्याने ते खाली पडले. यावेळी फडणवीसांनी व अधिकाऱ्यांनी शहांना आधार देण्याचा प्रयत्न केला. दरम्यान ही शहा यांनी येथील कत्तलखाना बंद करण्यासंदर्भातील निवेदन देण्यासाठी आले होते. ते फडणवीस यांच्यासोबत बोलत असताना अचानक खाली कोसळले. याचा व्हिडिओही समोर आला आहे. सध्या शहा ठिक आहेत.
सामाजिक कार्यकर्ते विलास शाह हे कामानिमित्त उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटण्यासाठी आले होते. यावेळी विलास शाह यांना चक्कर आली. वाढलेल्या उष्णतेमुळे शाह यांना चक्कर आल्याची माहिती आहे.
दरम्यान, सायंकाळी ४ वाजता हेरिटेज लॉन्स येथे आगमन होणार आहे. त्यांच्या उपस्थितीत जिल्हा भाजप कार्यकर्त्यांचा मेळावा होणार आहे. या मेळाव्यात काँग्रेस, राष्ट्रवादीचे अनेक लोकप्रतिनिधी भाजपात प्रवेश करणार आहेत. सायंकाळी ५:४५ वाजता सोलापूर विमानतळावरून विमानाने पुण्याच्या दिशेने प्रयाण करणार आहेत.
● मुख्यमंत्री सौर वाहिणी कृषी कार्यक्रमाला गती देणार
आढावा बैठकीत शेतकऱ्यांना दिवसा 12 तास वीज देण्याकरता मुख्यमंत्री सौर वाहिणी कृषी कार्यक्रमाचा आढावा घेतला आहे. त्यासंदर्भात गती देण्याचे निर्देश मी दिलेले आहेत. याकरता सोलापूरमध्ये मोठ्या प्रमाणात जमीन उपलब्ध करून देऊन तिथे सौर प्रकल्प उभारण्याचा आमचा मानस आहे. याशिवाय जलजीवन मिशन, प्रधानमंत्री आवास योजना असेल या सगळ्या योजनांचा आढावा घेतला असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, सोलापूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयाचे उद्घाटन केले. पण खरं म्हणजे हे खूप आधी व्हायला पाहिजे होते, तरीही आज झाले याचा आनंद आहे. याठिकाणी 75 टक्के सरकारी कार्यालये शिफ्ट झाले आहेत आणि 25 टक्के कार्यालयाला जागा कमी पडते आहे. त्यामुळे मी महसुल मंत्री अनासे जे इथले पालकमंत्री आहेत त्यांना या इमारतीवर बांधकाम करून सर्व कार्यालय याठिकाणी एकत्र येतील, अशा प्रकारचे प्रयत्न करण्यास सांगितल्याचे फडणवीस म्हणाले.