● राजकीय दुखवटा जाहीर, प्रधानमंत्र्यांनी व्यक्त केले दुःख
नवी दिल्ली : ओडिशातील बालासोर येथे झालेल्या रेल्वे अपघातात आतापर्यंत 238 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 900 हून अधिक जण जखमी झाले आहेत. बहनागा स्टेशनजवळ हावडा एक्स्प्रेस आणि मालगाडीची समोरासमोर टक्कर झाली आणि त्यानंतर मागून कोरोमंडल एक्स्प्रेस आली, ज्यामुळे ही घटना अधिक भयावह झाली. 238 killed in train accident; Not 2 but 3 train accident, high level probe ordered Balasore Odisha political trauma काल (शुक्रवारी 2 जून) संध्याकाळी 7 वाजण्याच्या सुमारास मोठा रेल्वे अपघात झाला. सध्या बचाव पथक बचाव कार्यात गुंतले आहे. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
ओडिशा रेल्वे अपघातात आतापर्यंत 233 जणांचा मृत्यू झाला असून 900 लोक जखमी झाले आहेत. बचाव कार्य सुरू आहे. त्यातच अपघातानंतर ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी आज एक दिवसाचा राजकीय दुखवटा जाहीर केला. या अपघातानंतर खूप दुःख झाल्याचे त्यांनी म्हटले आहे. मी संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेत आहे, असेही त्यांनी सांगितले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेवर दुःख व्यक्त केले.
आज शनिवारी (3 जून) सकाळी सहा वाजेपर्यंत मिळालेल्या माहितीनुसार या अपघातात 238 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 900 हून अधिक जण जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. जखमींवर जवळच्या गोपालपूर आणि बालासोर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मृतांचा आणि जखमींचा आकडा वाढण्याची भीतीसुद्धा व्यक्त करण्यात आली आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव घटनास्थळी पोहोचले आहेत.
बचावकार्यासाठी पथकं घटनास्थळाकडे रवाना झाल्याची माहिती स्पेशल रिलीफ कमिशनर ऑफिसने दिली. बालासोरच्या जिल्हाधिकाऱ्यांनीही बचावकार्याच्या दृष्टीने आवश्यक आदेश जारी केले आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करुन ओडिशा रेल्वे अपघातावर दुःख व्यक्त केले आहे. त्यांनी या अपघाताचा आढावा रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडून घेतला असल्याचे ते म्हणाले. दुर्घटनेच्या ठिकाणी बचावकार्य सुरू असून बाधितांना शक्य ती सर्व मदत केली जात आहे, असे त्यांनी सांगितले. तसेच आपण अपघातात मृत्यू झालेल्या नागरिकांच्या परिवाराच्या दुःखात सहभागी असल्याचे ते म्हणाले.
https://twitter.com/RSunnny/status/1664804487767408641?t=YCZjD7I2-4LrZbZn2ctRAQ&s=19
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
काल शुक्रवारी संध्याकाळी कोरोमंडल एक्स्प्रेसचे 17 ते 18 डबे रुळावरून घसरले आणि दुसऱ्या रुळावर येणाऱ्या ट्रेनला धडकले. हा दोन ट्रेनचा नाही तर 3 ट्रेनचा अपघात झाला आहे. 2 पॅसेंजर ट्रेन आणि एक मालगाडी अशा 3 गाड्यांचा समावेश असलेला हा अपघात होता, अशी माहिती, ओडिशाचे मुख्य सचिव प्रदीप जेना यांनी दिली. काल रात्रीपर्यंत अपघातात 50 हून अधिक जणांचा मृत्यू झाल्याची माहिती होती. आता त्यात वाढ झाली आहे .
ओडिशातील बालासोर येथे तीन रेल्वेंचा भीषण अपघात झाला. या अपघातात सकाळीच 50 हून अधिक प्रवाश्यांचा मृत्यू झाल्याचे वृत्त होते तर 200 हून अधिक लोक जखमी झाल्याचे वृत्त होते. त्यात आणखी वाढ होत आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी मोठी मदत जारी केली आहे. या अपघातात मृत्यू झालेल्यांच्या परिवाराला 10 लाख रुपये, गंभीर जखमींना 2 लाख आणि किरकोळ जखमींसाठी 50 हजार रुपयांची मदत सरकारने जाहीर केली आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करत त्यांनी बचावकार्याचा आढावा घेतला. दुर्घटनेच्या चौकशीसाठी उच्चस्तरीय चौकशी नेमण्यात येणार आहे, मात्र सध्याचा फोकस केवळ बचावकार्यावर राहील, असं वैष्णव म्हणाले.
ओडिशामधील बालेश्वरजवळ शालिमार चेन्नई कोरोमंडल एक्सप्रेसचे डबे रुळावरून घसरल्याने झालेल्या भीषण दुर्घटनेचे वृत्त क्लेशदायक आहे. या अपघातात बळी पडलेल्या दुर्दैवी प्रवाशांना अश्रुपूर्ण श्रद्धांजली. हा आघात सहन करण्यासाठी ईश्वराने त्यांच्या आप्तस्वकीयांस बळ द्यावे व जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी ही प्रार्थना, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ट्विट करत आपली प्रतिक्रिया दिली.