सोलापूर : आरोपीकडून ताब्यात घेतलेली मोटरसायकल तक्रारदाराला परत करण्यासाठी चार हजार रुपयांच्या लाचेची मागणी केल्याबद्दल पोलीस हवालदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. The police constable demanded a bribe of four thousand; Transfers under police officer under the case registered in the month Solapur
एमआयडीसी पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार इस्माईल इब्राहिम बागवान असे गुन्हा दाखल झालेल्या पोलिसाचे नाव आहे. तक्रारदार व तो काम करत असलेल्या ठेकेदार यांच्यामध्ये आर्थिक देवाण – घेवाणीचा वाद होता. त्यातून ठेकेदाराने तक्रारदाराची मोटार सायकल जबरदस्तीने नेली होती. त्यामुळे तक्रारदाराने एमआयडीसी पोलीस ठाण्यात ठेकेदाराविरुद्ध तक्रार देण्यासाठी धाव घेतली. त्यावेळी तेथील पोलीस हवालदार बागवान यांनी तक्रारदाराची तक्रार ऐकून घेऊन सदरची मोटारसायकल ठेकेदाराच्या ताब्यातून घेतली आणि ती एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या आवारात आणून ठेवली.
तक्रारदाराने सदरची मोटारसायकल परत मिळण्यासाठी पोलीस हवालदार बागवान यांना विनंती केली असता बागवान यांनी त्यासाठी चार हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. त्यामुळे तक्रारदाराने लाच लुचपत प्रतिबंधक खात्याकडे लाच मागणीची तक्रार नोंदवली. त्यानुसार ४ मे रोजी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने या तक्रारीची पंचासमक्ष पडताळणी केली असता पोलीस हवालदार बागवान यांनी कोणतीही कारवाई न करता मोटारसायकल ताब्यात देण्यासाठी पोलीस हवालदार बागवान यांनी चार हजार रुपयांच्या लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले.
यावरून तब्बल एक महिन्यानंतर पोलीस हवालदार बागवान यांच्याविरुद्ध लाच मागणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त गणेश कुंभार,पोलीस निरीक्षक चंद्रकांत कोळी, पोलीस अंमलदार नरोटे, किणगी यांनी केली आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
》 पोलीस अधिकाऱ्यांच्या पुन्हा अंतर्गत बदल्या
सोलापूर : सोलापूर पोलीस आयुक्त डॉ. राजेंद्र माने यांनी सोलापूर शहर पोलीस आयुक्तालयातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पोलीस निरीक्षक, सहाय्यक पोलिस निरीक्षक व पोलीस उपनिरीक्षक यांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आले आहे.
नियंत्रण कक्ष सोलापूर शहर येथे कार्यरत असलेले वरिष्ठ पोलीस निरीक्षक उदयसिंह शामराव पाटील बदली मानव संसाधन विकास महिला सुरक्षा शाखा (अति कार्यभार) येथे करण्यात आली आहे.
विजापूर नाका पोलिस ठाणे येथे कार्यरत असलेले पोलीस निरीक्षक अजय आत्माराम जगताप यांची बदली सायबर शाखा येथे करण्यात आली आहे. एमआयडीसी पोलीस ठाणे येथील सहाय्यक पोलिस निरीक्षक नितीन नारायणपेटकर यांची बदली आर्थिक गुन्हे शाखा येथे करण्यात आली आहे. आर्थिक गुन्हे शाखेतील सहाय्यक पोलिस निरीक्षक विजय संपतराव पाटील यांची बदली गुन्हे शाखा येथे करण्यात आली आहे.
महिला सुरक्षा विशेष कक्ष येथील सहाय्यक पोलिस निरीक्षक ज्योती योगेश कडू यांची बदली एमआयडीसी पोलीस ठाणे येथे करण्यात आली आहे. नियंत्रण कक्ष येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनेश श्रीकांत कुलकर्णी यांची बदली सदर बझार पोलीस ठाणे येथे करण्यात आली आहे. नियंत्रण कक्ष येथे कार्यरत असलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक रोहन पंढरीनाथ खंडागळे यांची दंगा नियंत्रण पथक येथे करण्यात आली आहे.
गुन्हे शाखेचे सहाय्यक येथे करण्यात आली आहे. गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नंदकिशोर पंडीतराव सोळंखे यांची बदली एमआयडीसी पोलीस ठाणे येथे करण्यात आली आहे. जेलरोड पोलीस ठाणे येथील पोलीस उपनिरीक्षक शशिकांत जरिचंद लोंढे यांची बदली सदर बझार पोलीस ठाणे येथे करण्यात आली आहे.
सदर बझार पोलीस ठाणे येथील पोलीस उपनिरीक्षक मुकेश गोविंद गायकवाड यांची बदली विजापूर नाका पोलीस ठाणे येथे करण्यात आली आहे. नियंत्रण कक्षातील पोलीस उपनिरीक्षक बालाजी मच्छिंद्र मस्के कोर्ट पैरवी येथे करण्यात आली आहे. नियंत्रण कक्ष व डायल 112 येथील पोलीस उपनिरीक्षक अश्विनी नागनाथ तळे यांची बदली जेलरोड पोलीस ठाणे येथे करण्यात आली आहे.
मानव संसाधन विकास येथे कार्यरत असलेले पोलीस निरीक्षक शिवशंकर भगवान बोंदर यांची बदली पोलीस निरीक्षक (गुन्हे एमआयडीसी) पोलीस ठाणे येथे करण्यात आली आहे. तर जेल रोड पोलीस ठाणे येथील पोलीस उपनिरीक्षक अल्फाज नुरुद्दीन यांची बदली गुन्हे शाखा, सोलापूर शहर येथे करण्यात आली आहे.