● अजित पवारांचा खोचक टोला
मुंबई : मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांपेक्षा एकनाथ शिंदेंना पसंती असलेल्या सर्व्हेसह फक्त नरेंद्र मोदी, शिंदेचा फोटो असलेली जाहीरात वृत्तपत्रातून झळकल्याने फडणवीसांना शिंदे गटाकडून डावलले जात असल्याच्या चर्चा रंगल्या. Finally, Eknath Shinde’s retreat! Chief Minister Ajit Pawar made himself laugh by giving a new announcement अशातच आज देण्यात आलेल्या जाहीरातीत शिंदे, फडणवीस, मोदी, अमित शाह, बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघेंचे फोटो असल्याचे दिसत आहे. यामुळे शिंदेंनी माघार घेतल्याची चर्चा सुरू झाली आहे.
इतकी वर्षे राजकारणात आहे, पण पहिल्यांदा अशी जाहिरात बघितली. ही जाहिरात देऊन मुख्यमंत्र्यांनी स्वतः चे हसे करून घेतले आहे. शिवसेनेने स्वतःच ठरवून सर्वेक्षण केले. पण हे सर्वेक्षण कोणी केले? कोणी सांगितले की कोणाला किती टक्के पसंती आहे? अशा प्रकारच्या सर्व्हेची जाहिरात करण्याचा एक विश्वविक्रमच राज्याच्या प्रमुखांनी केला आहे, असा खोचक टोला विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शिंदे सरकारच्या जाहिरातीवरून लगावला.
अजित पवार म्हणाले की, लोकांनी एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करण्याचा कौल दिला आहे हे ऐकून खूपच आनंद वाटला. कारण, चांद्यापासून बांद्यापर्यंत लोकांना शिंदे पुढे व्हावेत असे वाटायला लागले आहे. मग इतकाच जर तुम्हाला लोकांचा पाठिंबा आहे तर तुम्ही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका का घेत नाही ? असा सवाल विचारत त्यांनी एकप्रकारे मुख्यमंत्र्यांना आव्हानच दिले आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
येत्या पंधरा – वीस दिवसांनंतर निवडणुका घेतल्या नसल्यामुळे त्याला एक वर्ष पूर्ण होईल. वेगवेगळ्या पक्षाचे कार्यकर्ते विविध पदांसाठी इच्छुक आहेत, तरीसुद्धा तुम्ही निवडणुका घेत नाहीत. उन्हाळा सुरू असतानाही तुम्ही निवडणूक घेतली नाही. त्यांना निवडणुका घेण्याची भीती वाटते. एकीकडे जाहिरातीवर मात्र एवढ्या प्रमाणावर खर्च करायचा, याला अर्थ नाही, अशीही टीका अजित पवारांनी यावेळी केली.
‘देशात मोदी अन् राज्यात शिंदे’ या जाहिरातीनंतर राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा ढवळून निघाले. भाजपच्या काही नेत्यांनी यावरुन नाराजी व्यक्त केली तर विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून या जाहिरातीवरुन सारवासारव करण्यात येत आहे. या जाहिरातीशी शिवसेनाचा काहीही संबंध नाही, जाहिरात देणारा हितचिंतक अज्ञात आहे, अशी प्रतिक्रिया मंत्री शंभुराज देसाई यांनी दिली.
आजच्या जाहिरातीचा शिवसेना पक्षाचा काहीही संबध नाही. हितचिंतकाने ही जाहिरात दिलेली असावी. आम्ही मित्रपक्ष आहोत, पहिल्या दुसऱ्या पदासाठी आमची रस्सीखेच नाही. हिंदुत्वाच्या मुद्यावर 30 वर्षापूर्वी केलेली युती आम्ही पुढे नेत आहोत. जाहिरात देणारा हितचिंतक अज्ञात आहे, अशी प्रतिक्रिया शंभुराज देसाई यांची वादग्रस्त जाहिरातीवर दिली. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे आमच्या मनात आहेत म्हणून फोटोत नसले तरी चुकीचा अर्थ काढू नये, असेही ते म्हणाले.