● यावर्षी शासकीय आयटीआयमध्ये 25 ट्रेडसाठी 924 जागा उपलब्ध !
सोलापूर :- राज्यात शासकीय व खाजगी आयटीआय मध्ये प्रवेश प्रक्रिया 12 जून 2023 पासून सुरू झाली असून दहावी उत्तीर्ण अथवा अनुत्तीर्ण इच्छुक विद्यार्थ्यानी https://admission dvet.gov.in या संकेतस्थळावर 11 जुलै पर्यंत अर्ज करावेत, असे आवाहन औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य ए. डी. जाधवर यांनी केले आहे. Solapur: Students are urged to apply for ITI admissions by July 11
प्रवेश इच्छुक उमेदवारांना अर्ज कोणत्याही ऑनलाईन स्त्रोतामधून भरता येईल. अर्ज भरल्यानंतर अर्जाची निश्चिती कोणत्याही शासकीय व खाजगी आयटीआयमध्ये करता येईल. त्यानंतर प्रवेशासाठी व्यवसाय व संस्था या संबंधीचा विकल्प व प्राधान्य कोणत्याही ऑनलाईन स्त्रोतामधून सादर करता येईल. प्रवेशासंबंधीच्या अधिकच्या सर्व माहितीसाठी https://admission dvet.gov.in या वेबसाईट वर संपर्क करावा अन्यथा जवळच्या शासकीय आयटीआयमधून प्रवेशाबाबत सूचना प्राप्त करून घ्याव्यात.
औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधून (आयटीआय) उत्तीर्ण होणाऱ्या सर्व प्रशिक्षणार्थ्यांना शासनातर्फे शिकाऊ उमेदवार योजने अंतर्गत ( ॲप्रेंटिस ) रोजगार उपलब्ध करून दिला जातो.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
अप्रेंटिसच्या रोजगार उपलब्ध करून देण्याच्या योजनेमुळे आयटीआय प्रशिक्षण पूर्ण केलेल्या सर्व उमेदवारांना भविष्यात रोजगार मिळविणे अथवा स्वयंरोजगार करणे सोयीचे होते. तसेच दोन वर्षाचा आयटीआय प्रशिक्षण पूर्ण केलेल्या उमेदवारांना डिप्लोमा इंजिनिअरिंगच्या दुसऱ्या वर्षाला प्रवेश घेता येतो, अथवा ठराविक विषयाची परिक्षा देऊन महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक बोर्ड पुणे यांच्या कडून एच.एस.सी प्रमाणपत्र प्राप्त करून घेता येते.
सोलापुरातील विजापूर रोड येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये यावर्षी विविध 25 ट्रेडमध्ये प्रवेशासाठी एकूण 924 जागा उपलब्ध आहेत. प्रवेशासाठी शिक्षण कमीत कमी दहावी उत्तीर्ण अथवा अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना खात्रीचा रोजगार उपलब्ध होण्यासाठी आय.टी.आय. मध्ये प्रवेश घ्यावा असे आवाहन औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य ए. डी. जाधवर यांनी केले आहे.
☆ रेशन दुकानांत मिळणार पैसे
सरकारने पोस्टापाठोपाठ रेशनिंग दुकानांना बँकिंग सेवा उपलब्ध करून देण्याची परवानगी दिली आहे. जिथे बँका, एटीएमची व्यवस्था नाही, अशा ठिकाणी बँकिंग व्यवहारासाठी ग्रामस्थांना रेशनिंग दुकान हे महत्त्वाचा आधार ठरणार आहेत. त्यासंदर्भात दुकानदारांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. या निर्णयामुळे रोकड विरहित व्यवहार, देयक भरणा, आरटीजीएस, कर्जसुविधा आदी सुविधा ओटीपी आणि बायोमेट्रिक प्रणालीद्वारे उपलब्ध होणार आहेत.