मुंबई : भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची भेट घेतली असल्याची काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी माहिती दिली आहे. पंकजा मुंडेंनी दोन वेळा दिल्लीत जाऊन भेट घेतली असल्याचं सांगितलं जात आहे. सांगलीतील बड्या नेत्याकडून पंकजा मुंडेंसाठी जोरदार लॉबिंग सुरू असल्याची सूत्रांकडून माहिती मिळाली आहे. त्यामुळे पंकजा मुंडे काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा आहेत. Neelam Gore is in the Shinde faction while Pankaja Munde has remained silent on the entry of the Congress as the vice president of the political BJP
मागच्या दोन-तीन दिवसांपासून पंकजा मुंडे या काँग्रेसमध्ये जाणार अशा चर्चा होत्या. त्यांनी सांगलीतील एका मोठ्या नेत्याच्या माध्यमातून सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची भेट घेतली, अशा बातम्या येत होत्या. त्यावर आता अखेर पंकजा मुंडे यांनी मौन सोडलं आहे. मी भाजपात आहे, भाजपा सोडून कोठेही जाणार नाही, अशी स्पष्ट भमिका पंकजा मुंडे यांनी आज मांडली.
मी आज पत्रकार परिषद बोलावली आहे, कारण मला शेकडो कॉल येत आहेत. २०१९ मध्ये मी भाजपची उमेदवार होते. माझा पराभव झाला. त्यानंतर गेले ४ वर्ष मी नाराज आहे. मी पक्ष सोडणार, अशा चर्चा सुरू झाल्या. मला स्वतःला सिद्ध करायच नाहीय. अनेक पक्षाचे नेते देखील बोलत होते की, पंकजा मुंडे आल्या तर त्यांना पक्षात स्थान देऊ. मी सर्व हे सहजतेने घेतलं. पण आता मी सांगलीतील मोठ्या नेत्याच्या माध्यमातून सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची भेट घेतली अशा बातम्या येत आहेत. मी काँग्रेस नेत्यांची भेट घेतलेली नाही. माझं करिअर संपवण्याचा हा डाव नेमका कुणाचा? असा सवाल मुंडे यांनी केला. पंकजा म्हणाल्या, मी काही महिने राजकारणातून विश्रांती घेणार आहे.
उद्धव ठाकरे यांच्या गटाला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. ठाकरे गटाच्या उपनेत्या, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. या आमदारांसह दोन मोठे पदाधिकारी आणि कार्यकर्तेही शिवसेनेत सामिल होणार आहेत. आज दुपारी गो-हे यांनी शिंदे गटाच्या शिवसेनेत प्रवेश केला.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी शिवसेनेत (शिंदे गटात) प्रवेश केला. यावर आदित्य ठाकरे यांनी ट्विट करत ‘स्वार्थी विरुद्ध प्रामाणिक विचारसरणी अशी ही लढाई आहे ! एकाच व्यक्तीला 4 वेळा विधान परिषदेवर जाण्याची संधी उद्धवसाहेबांनी दिल्यावरही, 21 वर्ष तिथे असूनही, 2 वेळा संविधानिक पदांचा लाभ मिळूनही…..एकच गाणं आठवतं, यह मोह मोह के धागे. खुर्चीचा मोह, नाती तोडतो, नैतिकता विसरवतो !,’ असे म्हटले.
विधान परिषदेतल्या ठाकरे गटाच्या ११ आमदारांपैकी पैकी विप्लव बाजोरिया, मनिषा कायंदें हे अगोदरच शिंदे गटात दाखल झाले आहेत. त्यानंतर आता गोऱ्हे प्रवेश केला. गेल्या वर्षभरात ठाकरे गटाला सोडून शिंदे गटात जाण्याचा ओघ कमी होत नाही. त्यामुळे विश्वासू नेते व कार्यकर्तेही आता शिंदे गटात सामील होत आहे. गो-हे या गेल्या अनेक वर्षांपासून माध्यमांमध्ये शिवसेनेची बाजू मांडत होत्या. त्यांना शिवसेनेने उपसभापतीची संधी दिली. इतकेच नाही तर त्या उपनेत्या सुध्दा होत्या. त्यामुळे हा ठाकरे गटाला मोठा धक्का समजला जातो.
काही दिवसांपूर्वी शिवसेना नेत्या मनीषा कायंदेंनी शिंदे गटात प्रवेश केला. त्यानंतर शिंदेनी मनिषा कायंदेंची शिवसेना सचिव आणि पक्षप्रवक्तेपदी केली नियुक्ती केली आहे. आता गो-हे यांच्याकडेही मोठी जबाबदारी देण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे. याअगोदर आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय राहुल कनाल यांनीही शिवसेनेत प्रवेश केला. त्याबरोबरच माजी नगरसेवक अमेय घोले यांनीही नाराजी व्यक्त करत शिंदे गटात प्रवेश केला.
नीलम गोऱ्हे यांच्या शिवसेनेत जाण्याच्या प्रश्नावर प्रतिक्रिया देतांना उबाठा गटाचे नेते अंबादास दानवे म्हणाले की, नीलम गोऱ्हे कुठेही जाणार नाहीत. त्या उध्दव ठाकरे यांच्या सोबतच कायम राहतील. त्या शिवसेनेत प्रवेश करणार ही बातमी अफवा असल्याचे म्हटले होते.