सोलापूर – हैद्राबाद रोडवरील चंदन काट्याजवळ वेगाने जाणाऱ्या एसटीच्या धडकेने दुचाकी वरील महिलेसह दोघेजण गंभीर जखमी झाले. Chandankata Solapur accident, woman on two-wheeler injured in collision with ST on Hyderabad road
हा अपघात आज रविवारी (ता. 9) सकाळच्या सुमारास घडला. कासिम राजम्मा शेख (वय ४५ ) आणि फरीदा शेख (वय ४२ दोघे रा.साईनगर अक्कलकोट रोड सोलापूर) असे जखमीचे नाव आहेत. त्यांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात सैपन (मुलगा) यांनी दाखल केले. त्यापैकी कासिम शेख यांची प्रकृती गंभीर आहे. हे दोघे आज सकाळी ११ वाजेच्या सुमारास मुळेगाव ते मार्केट यार्डच्या दिशेने निघाले होते. त्यावेळी चंदन काट्याजवळ एमएच१४-बीटी-१५२८ या क्रमांकाचे एसटी धडकल्याने हा अपघात घडला. एमआयडीसी पोलिसात या अपघाताची नोंद झाली आहे.
》 विष प्राशन; तरुणाचा मृत्यू
उमराणी (ता.इंडी जि.विजयपूर ) येथे राहणाऱ्या संजय मुत्यप्पा कट्टीमनी (वय ३५) या विवाहित तरुणाने विष पिऊन आत्महत्या केली. पती-पत्नीच्या भांडणाच्या कारणावरून त्याने ८ जून रोजी दुपारच्या सुमारास राहत्या घरात विष प्राशन केले होते. त्याला सोलापुरातील खाजगी रुग्णालयात उपचार करून सोलापुरातील शासकीय रुग्णालयात ३ जुलै रोजी बेशुध्द अवस्थेत दाखल करण्यात आले होते. तो उपचारादरम्यान आज रविवारी सकाळी मयत झाला . अशी नोंद सिव्हील पोलीस चौकीत झाली आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
》 रिलायन्स मार्केट जवळ पेट्रोलिंग करणाऱ्या वाहनाच्या धडकेने पादचारी ठार
सोलापूर : वेगाने जाणाऱ्या पेट्रोलिंग करणाऱ्या वाहनाच्या धडकेने पादचारी इसम गंभीर जखमी होऊन मरण पावले . हा अपघात मंगळवेढा रोडवरील रिलायन्स मार्केट जवळ शनिवारी (ता. 8) पहाटेच्या सुमारास घडला. परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. रात्री अंत्यसंस्कार केले.
महंमद रफीक अब्दुल बागवान (वय ५०रा . थोबडेवस्ती, देगाव) असे मयत झालेल्या इसमाचे नाव आहे. ते आज पहाटे पाच वाजेच्या सुमारास घरातून नमाज पठण करण्यासाठी बाहेर निघाले होते. त्यावेळी मंगळवेढाच्या दिशेने जाणाऱ्या पेट्रोलिंगच्या चारचाकी वाहनाच्या धडकेने ते गंभीर जखमी झाले होते . त्यांना शासकीय रुग्णालयात दाखल केले असता ते उपचारा दरम्यान मयत झाले. या अपघाताची नोंद फौजदार चावडी पोलिसात झाली आहे.