● दोघांना दोन दिवसांची पोलीस कोठडी तर एकजण फरार
सोलापूर : सोलापुरातील जुना कुंभारी नाका परिसरात तिघांनी एकाला केलेल्या जबर मारहाणीत एका मजुरांचा मृत्यू झाला आहे. एमआयडीसीतील अरिहंत टेक्स्टाईलमध्ये काम करणाऱ्या मुनाकुमार रामधार सिंह (रा. बिहार ) असे त्या मजुराचे नाव आहे. Bihari worker killed in hotel beating; Crime against three, two in custody and one absconding Solapur court मद्यपानावेळी एकमेकांकडे पाहण्यावरून त्यांच्यात मारहाण झाली. यातच त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी एमआयडीसी पोलिसांत गुन्हा दाखल झाला. त्यानंतर पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.
एमआयडीसी मधील अरिहंत टेक्सटाईल मध्ये काम करणाऱ्या मुनाकुमार राजाराम सिंह (वय-४४,रा.मु.पो.पोगर,तालुका रतिगंज,बिहार) याचा खून केल्याप्रकरणी तीन संशयित आरोपींवर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. त्यापैकी दोघांना अटक केली तर एक जण फरार आहे. त्यापैकी दोघास न्यायालयात हजर केले असता त्यांना दोन दिवसाची पोलीस कोठडी दिली आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
याबाबत मिळालेली माहिती अशी की, अरिहंत टेक्स्टाईल इंडिस्ट्रीजमध्ये मुनाकुमार राजाराम सिंह हा कामाला असून,जवळच असलेल्या लोकमंगल हॉस्पिटलजवळ तो राहायला होता. घटनेच्या दिवशी बुधवारी (ता. ५ जुलै ) तो जुना कुंभारी नाका परिसरातील हॉटेल बी प्रकाश मध्ये जेवणाकरिता गेला होता. तेथील असलेल्या तीन अनोळखी इसमाकडे बघण्याच्या कारणावरून बाचाबाची झाली. सिंह याला तिघांनी लाथा बुक्क्यांनी व काचेची बाटली तसेच काठीने मारहाण केली. या गंभीर मारहाणी तो बेशुद्ध होऊन दुसऱ्या दिवशी त्याचा मृत्यू झाला. हि घटना ५ जुलै रोजी रात्री बारा वाजण्याच्या सुमारास हॉटेल बी प्रकाश बार सोलापूर येथे घडली.
या मयताचे येथे कोणीच नातेवाईक नसल्याने अरिहंत टेक्स्टाईलच्या मॅनेजर विलास नारायण बोल्ली (वय-४८,साईबाबा चौक, न्यु पाच्छा पेठ, सध्या- आरफात नगर) यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. एमआयडीसी पोलीस ठाण्यात ८ जुलै रोजी सायंकाळी ७ वाजता गुन्हा दाखल झाला आहे.
खुनाची माहिती मिळताच पोलिस उपायुक्त विजय कबाडे यांनी घटनास्थळी भेट दिली. एमआयडीसी पोलिसांनी संशयित आरोपी नित्यानंद परमेला (वय-२९,रा.सोलापूर) व सागर महेश पवार (वय-२३,रा.सोलापूर) या दोघांना अटक केली असून त्यांना रविवारी न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्यांना दोन दिवसाची पोलीस कोठडी दिली आहे.
खुनाच्या गुन्ह्यातील तिसरा संशयित आरोपी दिगंबर विटकर (रा. सोलापूर) हा फरार झाला आहे. त्याचा शोध पोलिस घेत आहेत. पुढील तपास पोलीस निरीक्षक बोंदर हे करीत आहेत.