○ या पुरस्कार वितरणासाठी महाराष्ट्रातील दिग्गज नेते एका मंचावर येतील का?
मुंबई / पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदींना टिळक राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाल्याने यावर पुणे शहर काँग्रेसचे अध्यक्ष अरविंद शिंदेंनी आक्षेप घेतला होता. आता यावरून काँग्रेस नेते भाई जगतापांनी काँग्रेसलाच घरचा आहेर दिला. टिळक स्मारक ट्रस्टचे विश्वस्त डॉ. रोहित टिळक यांनी या पुरस्काराची घोषणा केली. ‘What’s wrong with awarding Narendra Modi? Congress leader question Pune Tilak Award Bhai Jagtap Maharashtra veteran leader
पुरस्काराचे यंदाचे 41 वे वर्ष आहे. पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली आत्मनिर्भर भारत या संकल्पनेअंतर्गत देशाने प्रगतीची नवी शिखरे सर केली आहेत. देशवासीयांमध्ये त्यांनी राष्ट्रप्रेमाची भावना जागृत करुन देशाला जागितक पटलावर महत्त्वाचे स्थान मिळवून दिले आहे. या कार्यासाठी ट्रस्टच्या विश्वस्तांनी मोदींच्या नावाची या पुरस्कारासाठी एकमताने निवड केली आहे. या सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ नेते शरद पवार यांना निमंत्रित करण्यात आल्याचे रोहित टिळक यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
नरेंद्र मोदींना पुरस्कार देणे यात हरकत काय? राजकीय मतभेद असू शकतात पण अशा कार्यक्रमाला एकत्र येण्यावर विरोध का असावा. तसेच लोकमान्य टिळक स्वतंत्र संस्था आहे,” असे म्हणत त्यांनी या आक्षेपाला विरोध दर्शवला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लोकमान्य टिळक पुरस्कार जाहीर झाला आहे. येत्या 1 ऑगस्टला त्यांना हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. त्यासाठी पुण्यात विशेष पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी शरद पवार यांनाही निमंत्रण देण्यात आले आहे. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लोकमान्य टिळक पुरस्कार मोदींना देण्यास काँग्रेसने तीव्र विरोध दर्शविला आहे. पुणे शहराध्यक्षाने तसे पत्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना पाठविले आहे. आता प्रदेश काँग्रेस कमिटी यावर कोणता निर्णय घेते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. पुरस्कार देणारी संस्था ही स्वतंत्र असूनही त्यांनी कुणाला पुरस्कार द्यावा, त्यांचा प्रश्न आहे, अशी याच्या उलट प्रतिक्रिया काँग्रेस नेते भाई जगताप यांनी दिली आहे.
पुण्यातील टिळक स्मारक समितीच्या वतीने देण्यात येणारा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जाहीर झाला आहे. कार्यरत असलेले पंतप्रधानांना प्रथमच या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. लोकमान्य टिळक यांच्या जयंतीदिनी म्हणजे १ ऑगस्ट रोजी हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष भाई जगताप म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुरस्कार देणारी संस्था ही एक स्वतंत्र संस्था आहे. त्यामुळे त्या संस्थेने कोणाला पुरस्कार द्यावा, हा त्यांचा प्रश्न आहे, असे जगताप यांनी स्पष्ट केले.
पुरस्कार वितरण सोहळ्याला राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार, काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे आणि प्रमुख पाहुणे म्हणून शरद पवार यांना निमंत्रित करण्यात आलेले आहे. त्यामुळे या पुरस्काराची एक महिना आधीच चर्चा रंगली आहे.
कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती असणार आहे. परंतू गेल्या आठवड्यातच एनसीपीत झालेल्या फुटीनंतर पवार-मोदी प्रथमच एकाच व्यासपीठावर उपस्थित राहणार आहे. त्यामुळे खरच हे मान्यवर एकत्र येतील का, यावर राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.