○ सोलापुरातील घटना; कार्यालयातूनच घेतले अर्ज
सोलापूर : वाहन मालक व वाहन मालक प्रतिनिधींनी संगनमत करून खासगी वाहनांवरील बॅंकांचा कर्जाचा बोजा उतरविणे व दुय्यम नोंदणी प्रमाणपत्र मिळविण्यासाठी शासकीय अर्जावर सहायक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अमरसिंह गवारे व विजय तिराणकर यांच्या बनावट सह्या केल्या. Agents forged signatures of ‘RTO’ officials; A case has been registered against 11 people in Solapur या प्रकरणी तिराणकर यांनी ११ जणांविरूद्ध विजापूर नाका पोलिसांत फिर्याद दिली आहे.
आरटीओ कार्यालयाजवळ बसून वाहन मालकांची कामे करणाऱ्या एजटांनी चक्क आरटीओ अधिकाऱ्यांच्याच बनावट स्वाक्षऱ्या केल्याची गंभीर बाब समोर आली आहे. सहायक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी तिराणकर यांच्या फिर्यादीवरून मुस्कान नदीम शेख, परमेश्वर मरगू गाडीवडार, जाविद मन्सुर पठाण, मकवाना संजय बाबुलाल, योगेश्वर सुरेश दळवे, रफिक अल्लाद्दीन फुलारी, इरण्णा भुताळी गायकवाड, भंडारी शिलेषबाबा साहेबलाल,रियाज बेलिफ, रिझवान व अय्याज यांच्याविरूद्ध पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.
तत्पूर्वी, आरटीओ अधिकाऱ्यांनी त्यासंबंधीची सखोल चौकशी केली. त्यात ११ जणांनी २३ जून ते ४ जुलै २०२३ या काळात अशा प्रकारचे गंभीर कृत्य केल्याची बाब समोर आली. त्यानंतर आरटीओ अधिकाऱ्यांनी विजापूर नाका पोलिस ठाणे गाठले. संशयित सध्या पसार झाले असून वरिष्ठ पोलिस निरीक्षक बाळकृष्ण हनपुडे-पाटील यांच्या नेतृत्वाखाली त्यांचा शोध सुरु आहे.
● बनावट रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट मिळविण्यासाठी आरटीओ कार्यालयातून घेतले अर्ज
अकरा जणांनी खासगी वाहनांवरील बॅंकांचा बोजा उतरवून दुय्यम नोंदणी प्रमाणपत्र म्हणजेच बनावट रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट मिळविण्यासाठी आरटीओ कार्यालयातून अर्ज घेतले. त्यावर सहायक उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांच्या बनावट स्वाक्षऱ्या केल्या. अंतिम मान्यतेसाठी ते अर्ज त्याच अधिकाऱ्यांकडे पाठविले. त्यावेळी फिर्यादी विजय तिराणकर यांच्या नजरेत ही बाब पडली. आपण तर त्या अर्जांवर कोणतीही स्वाक्षरी केली नाही, तर या अर्जांवर सह्या केल्या कोणी, याची पडताळणी त्यांनी स्वत: केली. त्यावेळी ११ लोकांनी केलेली बनावटगिरी समोर आली आणि त्यांनी पोलिसांत धाव घेतली.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
》 मोरोची येथे बसला धडकल्याने दुचाकी चालत ठार
सोलापूर – चुकीच्या दिशेने येऊन बसला धडकल्याने दुचाकी वरील संतोष सुभाष भोसले (वय ३७ रा.मोरोची ता.माळशिरस) हे गंभीर जखमी होऊन मरण पावले. हा अपघात रविवारी दुपारच्या सुमारास मोरोची येथील उड्डाणपुलाजवळ घडला .
संतोष भोसले हे आपल्या दुचाकीवरून मोरोची उड्डाण पुलाजवळील प्राथमिक उपकेंद्रा जवळून वेगाने निघाले होते. त्यावेळी समोरून येणाऱ्या एमएच ४०-एक्यू-६२९० या क्रमांकाच्या बसला समोरून धडकल्याने ते गंभीर जखमी होऊन उपचारापूर्वीच मयत झाले होते. या अपघाताची नोंद नातेपुते पोलिसात झाली. बसचे चालक सतीश लिंगदेव यादव (रा. पुळूजवाडी ता.पंढरपूर ) यांनी पोलिसात दाखल केली. पुढील तपास हवालदार घोळवे करीत आहेत .
● झोपेत असताना तीक्ष्ण शस्त्राने वार ; लक्ष्मीटाकळी येथील घटना
सोलापूर – पोलिसाकडे दिलेल्या तक्रारीत आपल्या मामाचे नाव का गोवले ? या कारणावरून घरात घुसून तिक्ष्ण शस्त्राने केलेल्या मारहाणीत ४३ वर्षीय इसम जखमी झाले. ही घटना लक्ष्मीटाकळी (ता. पंढरपूर) येथे रविवारी सकाळच्या सुमारास घडली. या प्रकरणात पंढरपूर तालुक्याच्या पोलिसांनी राहुल मेटकरी (रा.कोर्टी ता. पंढरपूर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
औदुंबर विलास गाढवे (वय ४३ रा.लक्ष्मी टाकळी) असे जखमीचे नाव आहे. ते रविवारी सकाळच्या सुमारास आपल्या घरात झोपले होते. त्यावेळी राहुल मेटकरी याने परवानगीशिवाय घरात प्रवेश केला आणि तू माझे मामा शंकर शेजाळ आणि बबलू मेटकरी यांची नावे तक्रारीत का घातले. असे म्हणून तीक्ष्ण शस्त्राने त्यांच्या डोक्यात आणि हातावर वार करून पसार झाला. अशी नोंद पोलिसात झाली. हवालदार नलावडे पुढील तपास करीत आहेत .