○ ठोस कारवाई होत नसल्यामुळे कर्मचाऱ्यांचा काळ सोकावतोय; पालिकेत होतेय चर्चा
सोलापूर : विजापूर रोडवरील बहुचर्चित बहुमजली पनाश इमारतीच्या गैर प्रकरणाकडे पालिका प्रशासनातील वरिष्ठांनी दुर्लक्ष केल्यामुळे नगररचना आणि बांधकाम परवाना विभागातील अधिकारी, कनिष्ठ अभियंता, कर्मचारी यांचे बेकायदेशीर काम करण्याचे धाडस वाढल्याचे दिसून येत आहे. Solapur Municipal Corporation’s failure due to corruption in construction departmentया खात्यात कनिष्ठ अभियंता, अधिकारी वर्षानुवर्षे ठाण मांडून काम करीत असल्यानेच अशा प्रकारचे गैरप्रकार होण्यास मदत होत आहे. असे अनेक गैरप्रकार महापालिकेत यापूर्वी उघडकीस आले आहेत. परंतु ठोस कारवाई होत नसल्यामुळेच निष्क्रिय व भ्रष्टाचारी अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन मिळत असल्याची कुजबुज पालिकेच्या कर्मचाऱ्यांमध्ये सुरू आहे.
महापालिकेतील बांधकाम विभागात झालेल्या भ्रष्टाचारामुळे पुन्हा एकदा महापालिकेची नाचक्की झाली आहे. शहरातील बांधकाम व्यावसायिक, आर्किटेक्चर, अभियंते यांचे या अधिकारी, कनिष्ठ अभियंत्यांची लागेबांधे निर्माण होतात. ज्यांच्यावर सोलापूर शहर नियमानुसार विकसित करण्याची जबाबदारी आहे त्याच खात्यातील अधिकारी, कनिष्ठ अभियंता जर का बोगस बेकायदेशीर बांधकाम परवाने देत असतील तर ही सोलापूरकरांसाठी मोठी गांभीर्याची बाब आहे.
महापालिकेच्या नगररचना व बांधकाम परवाना विभागाशी संबंधित पर्यायी व्यवस्था निर्माण करून अधिकारी व कनिष्ठ अभियंता जर का गैरप्रकार करून बोगस बांधकाम परवाने देत असतील तर शहरातील बहुमजली इमारती सुरक्षित आहेत का? अशी शंका देखील व्यक्त होत आहे. बहु चर्चित बहुमजली ५० इमारतीच्या गैरप्रकार आकडे अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्यामुळेच असे गैरप्रकार करण्याचे धाडस वाढत आहे. सहाय्यक संचालक नगर रचना संभाजी कांबळे यांनी आयुक्तांच्या आदेशानंतर देखील पनाश प्रकरणाचा अहवाल तब्बल सहा महिन्यानंतर अद्यापही दिला नसल्याची शोकांतिका आहे. यावरूनच महापालिकेतील महत्त्वाच्या विभागाचा भोंगळ कारभार स्पष्ट होत आहे.
महापालिकेच्या विभागांमध्ये यापूर्वी देखील अनेक मोठे घोटाळे परंतु त्यावर कोणतीही ठोस कारवाई होत नसल्यानेच पालिकेतील भ्रष्टाचारी अधिकारी व कर्मचाऱ्यांचे फावते आहे, अशी चर्चा पालिका आवारात सुरू आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
▪︎ यापूर्वीचे काही घोटाळे; ठोस कारवाई नाही
डॉक्टर आंबेडकर चौकालगतची उलन मार्केट ची जागा भूमी व मालमत्ता विभागाच्या तत्कालीन अधिकाऱ्यांसह तीन कर्मचाऱ्यांनी परस्पर विक्री केल्याचा प्रकार उघडकीस आला व पोलीसात गुन्हाही दाखल झाला, परंतु त्यात अद्याप पुढे काही ठोस कारवाई दिसत नाही.
महापालिका परिवहन विभागात दहा हजार लिटर डिझेलचा भ्रष्टाचार झाला, याप्रकरणी देखील गुन्हा दाखल झाला. परंतु अद्याप पुढे काही झाले नाही. महापालिकेच्या विविध झोनमध्ये पाणीपुरवठा टँकरचा घोटाळा उघडकीस आला. या प्रकरणी काही तत्कालीन झोन अधिकारी व कर्मचारी बडतर्फ निलंबित झाले. याप्रकरणी देखील पुढे ठोस काही झाल्याचे दिसत नाही.
महापालिकेतील काही विभागात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई देखील झाली तरी देखील अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये सुधारणा दिसत नाही. पालिकेच्या तत्कालीन आयुक्तांनी निकृष्ट रस्त्या प्रकरणी काही मक्तेदारांवर दंडात्मक कारवाई केली तर आठ कनिष्ठ अभियंत्यांची विभागीय चौकशी प्रस्तावित केली पण ती चौकशी देखील झाली नसल्याचे उघडकीस येत आहे.
○ आयुक्तांकडून सोलापूरकरांना अपेक्षा
तत्कालीन आयुक्त पी. शिवशंकर यांनी पालिकेतील तब्बल १००० निष्क्रिय, कामचुकार व भ्रष्टाचारी अधिकारी कर्मचाऱ्यांवर बडतर्फी, निलंबन, दंडात्मक कारवाई केली होती. आयुक्त तेली देखील महापालिकेतील भ्रष्टाचारी व कामचुकार अधिकारी कर्मचाऱ्यांना शोधून कारवाई करतील आणि नक्कीच महापालिकेच्या कारभारात पारदर्शकता आणतील, अशी अपेक्षा सोलापूरकर व्यक्त करीत आहेत.