□ खा. रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या प्रयत्नाला यश
सोलापूर : सातारा जिल्ह्यातील माण, खटाव, फलटण, पुणे जिल्ह्यातील काही भाग व सोलापूर व मराठवाडा या भागातील जनतेच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या कृष्णा खोरेचे पाणी वळविण्याच्या (फ्लड डायवर्षण) प्रोजेक्टला तत्वतः मान्यता मिळाली असल्याची माहिती खासदार रणजितसिंह निंबाळकर यांनी दिली आहे. 20,000 crores project to divert flood water of Krishna River approved in principle by Deputy Chief Minister Devendra Fadnavis MP Ranjitsinh Naik-Nimbalkar
मुंबई येथे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी खासदार रणजितसिंह नाईक- निंबाळकर यांच्या विनंतीनुसार माढा लोकसभा मतदारसंघातील लोकप्रतिनिधी आमदार जयकुमार गोरे, आमदार शहाजी बापू पाटील, आमदार बबनदादा शिंदे, जलसंपदा विभागाचे सचिव दीपक कपूर, कार्यकारी संचालक कपोले, अधीक्षक अभियंता कुमार पाटील, मुख्य अभियंता गुणाले, कार्यकारी अभियंता योगेश सावंत यांच्या उपस्थितीमध्ये बैठक पार पडली.
पावसाळ्यामध्ये कोल्हापूर सांगली व साताऱ्यातील काही भाग मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस झाल्यानंतर कृष्णा नदीतून जे पाणी वाहून जाते, त्यामुळे कोल्हापूर, सांगली, सातारा या भागामध्ये पूरग्रस्त परिस्थिती निर्माण होते. त्यामुळे जनजीवन व आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणामध्ये होत असते. यासाठी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी हे वाहून जाणारे अतिरिक्त पाणी आपण जर दुष्काळी भागातील जनतेला उपलब्ध करून दिले तर त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये सिंचन होईल व सातारा जिल्ह्यातील माण खटाव, फलटण, पुणे जिल्ह्यातील काही भाग व सोलापूर व मराठवाडा या भागातील जनतेला पाणी उपलब्ध होऊन या भागातील दुष्काळ कायमस्वरूपी संपेल. ही बाब खा. निंबाळकर यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निदर्शनास आणून दिली.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
त्यानंतर बुधवारी तातडीची बैठक घेऊन उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी या प्रकल्पाला तत्वत: मान्यता दिली.
हा प्रकल्प अंदाजे २० हजार कोटी रुपयांचा असून त्यासाठी लागणाऱ्या सर्वेक्षणाच्या निधीची तरतूद करण्याचे आदेश पारित करण्यात आले आहे. यामुळे मराठवाडा व सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळी भागातील जनतेला खूप मोठी भेट फडणवीस यांनी दिल्याचे खा. निंबाळकर यांनी सांगितले.
○ आठ जिल्ह्यातील एक कोटी लोकांना होणार फायदा
सांगली, कोल्हापूर, सातारा, क्षेत्रातील गावांना याचा फायदा होणार आहे. तसेच सोलापूर जिल्ह्यासह मराठवाड्यातील चार जिल्ह्यांतील सुमारे एक कोटी लोकांना याचा फायदा होणार आहे. भविष्यात दुष्काळी भागाचा कायमस्वरूपी शेती व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न यामुळे मिटणार आहे. हा संपूर्ण भाग ओलिताखाली येणार आहे. यामुळे रोजगार मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्ध होईल. हरित क्रांती बरोबर आर्थिक क्रांती होईल तसेच हा महाराष्ट्रातील सर्वात महत्त्वाचा महत्त्वकांक्षी प्रकल्प आहे, असे खासदार रणजितसिंह नाईक- निंबाळकर यांनी सांगितले.