सोलापूर : शिंदे-फडणवीस सरकारचा बहुचर्चित आणि शेवटच्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तार लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. पावसाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार होणार, असे सांगितले जात होते. मात्र, गेल्या काही दिवसांमधील घडामोडी पाहता मंत्रिमंडळाचा विस्तार हा पावसाळी अधिवेशनानंतरच होऊ शकतो, अशी माहिती अजित पवार यांच्या गटातील वरिष्ठ नेत्याने दिली. Second third… forget ministership; Devendra Fadnavis Ajit Pawar from ‘Artha’ to ‘Anartha’ only after the expansion session
सूत्रांच्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासमवेत अजित पवार व खा. प्रफुल्ल पटेल यांच्यात नवी दिल्ली येथे याबाबत चर्चा झाली. त्यानंतर अमित शाह यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरध्वनीद्वारे चर्चा करुन अर्थ खाते सोडून इतर खात्यावर मार्ग काढल्याचे समजले. हे खातेवाटप शुक्रवारी होईल, असे संकेत मिळाले आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे तातडीने मंत्रिमंडळ विस्तार व्हावा, यासाठी आग्रही होते. मंत्रिमंडळ विस्तारात शिंदे गटाच्या चार ते पाच आमदारांनाच संधी मिळण्याची शक्यता आहे. त्यानंतर शिंदे गटातील उर्वरित आमदारांमध्ये असंतोष उफाळून येण्याची शक्यता आहे. अधिवेशनकाळात यामुळे बाका प्रसंग उद्भवू शकतो. ही परिस्थिती टाळण्यासाठी मंत्रिमंडळाचा विस्तार हा लांबणीवर पडण्याची दाट शक्यता आहे.
अजित पवार यांनी २ जुलै रोजी राजभवनात उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. त्यावेळी मंत्रिमंडळाचा विस्तार पार पडला होता. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या आठ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली होती.
मात्र, त्यावेळी शिंदे गटाचे आमदार वंचित राहिले होते. त्यामुळे आगामी मंत्रिमंडळ विस्तार तातडीने करून आपल्या गटाच्या आमदारांना मंत्रिमंडळात स्थान देण्यासाठी एकनाथ शिंदे प्रयत्नशील होते. गेल्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना कोणतेही खाते देण्यात आले नव्हते.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
खातेवाटपाविषयी गेल्या तीन- चार दिवसांपासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात चर्चा सुरू आहे. मात्र, वर्षा बंगल्यावरील दोन मॅरेथॉन बैठकांनंतरही खातेवाटपाचा तिढा सुटला नव्हता. त्यामुळे अजित पवार हे बुधवारी संध्याकाळी दिल्लीत अमित शाह यांच्या भेटीला गेले होते. या भेटीत खातेवाटपावर तोडगा निघाल्याची माहिती आहे. अजित पवार यांचा गट अर्थ, महसूल आणि जलसंपदा या तीन खात्यांसाठी आग्रही आहे. नंतर पवार यांनी उत्पादन शुल्क खात्याची मागणी केल्याची माहिती आहे.
● अजित पवारांचे दबावतंत्र…
राष्ट्रवादीकडून अर्थ खात्यासह ऊर्जा, जलसंपदा, सहकार, सार्वजनिक बांधकाम आणि गृहनिर्माण या खात्यांची मागणी होत असल्याचं म्हटलं जात आहे. तर राष्ट्रवादीकडून सातारा, सांगली आणि पुणे या जिल्ह्याच्या पालकमंत्री पदासाठी आग्रह होत असून यासाठी अजित पवार दबावतंत्राचा वापर करीत असल्याने बोलले जात आहे.
● राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करा : नाना पटोले
राज्यातील राजकीय वातावरण गढूळ झाले असून भाजपाच्या सत्तापिपासू वृत्तीने राज्यात शासन व प्रशासनही ठप्प आहे. जनतेला वाऱ्यावर सोडून देऊन मलाईदार खात्यासाठी साठमारी सुरू आहे. राज्यात अलिबाबा ४० चोरांसारखी परिस्थिती असून जनतेची तिजोरी लुटली जात आहे. राज्यपाल व महामहिम राष्ट्रपती यांनी यात हस्तक्षेप करुन राज्यात तातडीने राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांच्याकडून करण्यात आली आहे.
● अर्थखाते अजित पवारांनाच मिळणार : वडेट्टीवार
काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी शिंदे-फडणवीस पवार सरकारच्या खातेवाटप आणि मंत्रीमंडळावर बोलताना जोरदार शाब्दिक हल्ला केला. तसेच शिंद गटाने कितीही विरोध केला, तरी अर्थमंत्रीपद अजित पवारांनाच मिळेल, असा मोठा दावा केला. ते म्हणाले, शिंदे गटाकडून अजित पवारांना अर्थखातं देण्याला विरोध होत आहे. आता अजित पवारांना जाहिरपणे सांगा की, आम्ही राहू शकत नाही. शिंदे गटात थोडासा जरी स्वाभिमान असेल, तर त्यांनी सरकारमधून बाहेर पडलं पाहिजे.
● ‘अर्थ’ देण्यास अनेक आमदारांचा विरोध : फडणवीस
एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस हे अजित पवार यांना कोणत्याही परिस्थितीत अर्थ खाते देण्यास तयार नाहीत. फडणवीसांनी ठाम भूमिका घेतली आहे की, भाजपला अजित पवारांचा पुरेपूर आदर आहे. मात्र, त्यांचा दृष्टीकोन वास्वतवादी आणि व्यवहारी असला पाहिजे. सध्याच्या मंत्रिमंडळातील अनेक मंत्र्यांनी अजित पवार यांना अर्थ खाते देण्यास विरोध केला आहे.
शिंदे गटाने ठाकरेंची साथ सोडताना आमदारांनी तत्कालीन अर्थमंत्री अजित पवार निधीवाटपात कोंडी करत असल्याचा आरोप केला होता. तरीही आम्ही अजित पवारांना अर्थखाते देण्याविषयी विचार करु. मात्र, त्यांनी मागणी केलेली सर्व खाती राष्ट्रवादी काँग्रेसला देता येणार नाहीत, असे फडणवीस म्हणाले.