मुंबई : अखेर राज्य सरकारने खातेवाटप जाहीर केले आहे. त्यानुसार अजित पवार यांना अर्थमंत्रीपदाचा कार्यभार सोपवण्यात आला आहे. अजित पवार यांना अर्थमंत्री करण्यास शिंदे गटातील काही आमदारांचा विरोध होता, अशी चर्चा होती. Finally Ajit Pawar became Finance Minister; NCP ministers received ‘these’ accounts Shinde Fadnavis government pressure technique त्यामुळेच खातेवाटपाला एवढे दिवस उशीर झाल्याचेही बोलले जात होते. शेवटी अजित पवारांनी दिल्लीचा दौरा करत अमित शाह यांची भेट घेतली. त्यानंतर खातेवाटपाचा तिढा सुटला आहे.
मागील काही दिवसांपासून रखडलेले मंत्रीमंडळ खातेवाटप अखेर आज जाहीर झाले आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या चर्चेनंतर खातेवाटपावर शिक्कामोर्तब झाले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासमवेत अजित पवार व खा. प्रफुल्ल पटेल यांच्यात नवी दिल्ली येथे याबाबत चर्चा झाली. त्यानंतर अमित शाह यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरध्वनीद्वारे चर्चा करुन अर्थ खाते सोडून इतर खात्यावर मार्ग काढल्याचे समजले. हे खातेवाटप आज शुक्रवारी झाले.
खातेवाटपाची फाईल राज्यपालांकडे स्वाक्षरीसाठी गेली होती. राज्यपाल यांची स्वाक्षरी झाल्यानंतर मुख्यमंत्री यांच्या परवानगीने खातेवाटप प्रसिद्ध करण्यात आलेय. या खातेवाटपमध्ये अनेक मंत्र्यांची खाती काढण्यात आली आहे. भाजपकडून सहा तर शिंदेकडून तीन खाती गेली आहेत. एकनाथ शिंदे यांना महत्वाची खाती राखण्यात यश आलेय. अजित पवार यांच्या गटाला शिवसेना आणि भाजप यांच्यातील काही मंत्र्यांकडील खाती येण्याची शक्यता आहे.
शिंदे – फडणवीस सरकारचा रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार, नव्याने समाविष्ट झालेला अजित पवारांचा गट नंतर लागोलाग त्यांच्या ९ आमदारांना दिलेली मंत्रीपदाची शपथ. यासर्व घटनांनी शिंदे व भाजपच्या आमदारांमध्ये प्रचंड नाराजी आहे. ही नाराजी दूर करण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून केले जात आहेत. तुम्हाला अजित पवार गटाशी जुळवून घ्यावेच लागेल, असा कानमंत्र शिंदे व फडणवीस या दोघांनी आमदारांना दिल्याची माहिती समोर आली आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
खातेवाटपाविषयी गेल्या तीन- चार दिवसांपासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात चर्चा सुरू आहे. मात्र, वर्षा बंगल्यावरील दोन मॅरेथॉन बैठकांनंतरही खातेवाटपाचा तिढा सुटला नव्हता. त्यामुळे अजित पवार हे बुधवारी संध्याकाळी दिल्लीत अमित शाह यांच्या भेटीला गेले होते. या भेटीत खातेवाटपावर तोडगा निघाल्याची माहिती आहे. अजित पवार यांचा गट अर्थ, महसूल आणि जलसंपदा या तीन खात्यांसाठी आग्रही आहे. नंतर पवार यांनी उत्पादन शुल्क खात्याची मागणी केल्याची माहिती होती.
● शिंदे गटाच्या बंडाचा काय उपयोग ?
अजित पवार गट सत्तेत सहभागी झाल्याने उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची बाजू मजबूत झाल्याचा दावा शिंदे – फडणवीस गटाचे काही आमदार खाजगीत करत आहेत. उद्धव ठाकरे हे अजित पवार यांच्यासोबत गेले, अजित पवार मविआ मध्ये आपल्या मतदार संघात निधी देत नव्हते, म्हणून आपण सत्तेतून बाहेर पडलो व आता पुन्हा त्याच अजित पवारांचं जर सत्तेत स्वागत करत त्यांना अर्थ खाते दिले जात असेल आपल्या बंडाचा काय उपयोग हा प्रश्न शिंदे गटाच्या अनेक आमदारांनी मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्र्याकडे उपस्थित केल्याची माहिती सूत्र देत आहेत. परंतु आमदारांच्या या नाराजीवर मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्री यांनी दोन्हीकडच्या आमदारांना शांत राहण्याचे आदेश दिले आहेत. अजित पवारांना सत्तेत घेण्याचा निर्णय हा केंद्रातून झाल्याने त्याच्यावर जास्त भाष्य न करता सध्याच्या घडीला अजित पवार गटाशी जुळवून घ्या, असेही सांगण्यात आले आहे.
दरम्यान, राष्ट्रवादीकडून अर्थ खात्यासह ऊर्जा, जलसंपदा, सहकार, सार्वजनिक बांधकाम आणि गृहनिर्माण या खात्यांची मागणी होत असल्याचं म्हटलं जात आहे. तर राष्ट्रवादीकडून सातारा, सांगली आणि पुणे या जिल्ह्याच्या पालकमंत्री पदासाठी आग्रह होत असून यासाठी अजित पवार दबावतंत्राचा वापर करीत असल्याने बोलले जात आहे.
□ राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना मिळाली ‘ही’ खाती
* अजित पवार – अर्थमंत्री
* छगन भुजबळ- अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण
* दिलीप वळसे पाटील – सहकार मंत्री
* धनंजय मुंडे – कृषी मंत्री
* हसन मुश्रीफ – वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य
* अदिती सुनिल तटकरे – महिला व बालविकास
* संजय बाबुराव बनसोडे – क्रीडा व युवक कल्याण, बंदरे
* अनिल पाटील – मदत पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन.
* धर्मरावबाबा भगवंतराव आत्राम – अन्न व औषध प्रशासन