● अर्थ खाते मिळताच अजित पवार लागले कामाला
मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार सिल्व्हर ओकवर दाखल झाले आहेत. शरद पवारांच्या पत्नी प्रतिभाताई पवार यांच्यावर शस्त्रक्रिया झाली आहे. शस्त्रक्रियेसाठी त्या दुपारी रुग्णालयात दाखल झाल्या होत्या. Ajit Pawar entered Silver Oak for the first time after the rebellion याच पार्श्वभूमीवर काकू प्रतिभाताईंच्या तब्येतीची चौकशी करण्यासाठी अजित पवार सिल्व्हर ओकवर गेले असल्याची माहिती आहे. दरम्यान, राष्ट्रवादीतील बंडानंतर पहिल्यांदाच अजित पवार हे शरद पवार यांच्या घरी दाखल झाले आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार मुंबईतल्या ब्रीच कँडी रूग्णालयात दाखल झाले आहेत. येथे प्रतिभा पवार यांच्यावर आज शस्त्रक्रिया झाल्याची माहिती आहे. त्यामुळे अजित पवार रूग्णालयात पोहचल्याचे समजते. रात्री थेट ‘सिल्व्हर ओक’ गाठून पवारांची भेट घेतली. दोन्ही पवारांमधील संबंध ताणल्याची चर्चा झडत असतानाच अजितदादांच्या सिल्व्हर ओक भेटीने राजकीय वर्तुळ पुन्हा चक्रावून गेले आहे. अजितदादांची ही भेट पूर्वनियोजित आहे की धावती भेट ठरली, अशा प्रश्नांनी सत्ताधारी आणि विरोधकही बुचकळ्यात पडले आहेत.
आरोप-प्रत्यारोप, दावे-प्रतिदावे आणि इशारेवजा भाषेमुळे या दोघांत दुरावा निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले. या चित्रामुळे पुढे काय, अशी चर्चा असतानाच अजित पवार अचानक ‘सिल्व्हर ओक’च्या वाटेवर दिसले. आज शुक्रवारी सकाळीच प्रतिभा पवार यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. प्रतिभा पवार यांनी मात्र कधीच राजकीय महत्त्वाकांक्षा दाखवली नाही. तसेच राजकीय कार्यक्रमांनाही त्या उपस्थित नसतात. अपवादात्मक स्थितीमध्ये त्या शरद पवार यांच्यासोबत कार्यक्रमांना उपस्थित राहतात.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
राष्ट्रवादीतील मंत्र्यांना आज खातेवाटप जाहीर झाली आहेत. यामध्ये भाजप आणि शिंदे गटाची महत्त्वाची खाती राष्ट्रवादीला मिळाली आहेत. अजित पवारांना अर्थमंत्र्याचे खाते मिळाले आहे. खाते मिळताच अजित पवारांनी पदभार स्विकारत संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन वित्त व नियोजन विभागाचा आढावा घेतला आहे. पवारांना 503 क्रमांकाचे नवे दालन देण्यात आले आहे. ते येथून आपल्या खात्याचे काम पाहणार आहेत.
अखेर राज्य सरकारने खातेवाटप जाहीर केले आहे. त्यानुसार अजित पवार यांना अर्थमंत्रीपदाचा कार्यभार सोपवण्यात आला आहे. अजित पवार यांना अर्थमंत्री करण्यास शिंदे गटातील काही आमदारांचा विरोध होता, अशी चर्चा होती. त्यामुळेच खातेवाटपाला एवढे दिवस उशीर झाल्याचेही बोलले जात होते. शेवटी अजित पवारांनी दिल्लीचा दौरा करत अमित शाह यांची भेट घेतली. त्यानंतर खातेवाटपाचा तिढा सुटला आहे.
दरम्यान, 12 आमदारांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्या आहेत. अजित पवार गटाच्या 12 आमदारांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. राष्ट्रवादीच्या (शरद पवार गट) 5 जुलै रोजीच्या पक्षाच्या बैठकीला अनुपस्थित राहून पक्षविरोधी कारवाई केली म्हणून ही नोटीस देण्यात आली आहे. यात आमदार सुनील शेळके, दिलीप बनकर, नितीन पवार, दीपक चव्हाण, इंद्रनील नाईक, यशवंत माने, शेखर निकम, राजू कारेमोरे, मनोहर चंद्रकपुरे, संग्राम जगताप, राजेश पाटील, माणिकराव कोकाटे आदी आमदारांचा समावेश आहे.
मागील काही दिवसांपासून रखडलेले मंत्रीमंडळ खातेवाटप अखेर आज जाहीर झाले आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या चर्चेनंतर खातेवाटपावर शिक्कामोर्तब झाले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासमवेत अजित पवार व खा. प्रफुल्ल पटेल यांच्यात नवी दिल्ली येथे याबाबत चर्चा झाली. त्यानंतर अमित शाह यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरध्वनीद्वारे चर्चा करुन अर्थ खाते सोडून इतर खात्यावर मार्ग काढल्याचे समजले. हे खातेवाटप आज शुक्रवारी झाले.
● शिंदे गटाच्या बंडाचा काय उपयोग ?
अजित पवार गट सत्तेत सहभागी झाल्याने उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची बाजू मजबूत झाल्याचा दावा शिंदे – फडणवीस गटाचे काही आमदार खाजगीत करत आहेत. उद्धव ठाकरे हे अजित पवार यांच्यासोबत गेले, अजित पवार मविआ मध्ये आपल्या मतदार संघात निधी देत नव्हते, म्हणून आपण सत्तेतून बाहेर पडलो व आता पुन्हा त्याच अजित पवारांचं जर सत्तेत स्वागत करत त्यांना अर्थ खाते दिले जात असेल आपल्या बंडाचा काय उपयोग हा प्रश्न शिंदे गटाच्या अनेक आमदारांनी मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्र्याकडे उपस्थित केल्याची माहिती सूत्र देत आहेत. परंतु आमदारांच्या या नाराजीवर मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्री यांनी दोन्हीकडच्या आमदारांना शांत राहण्याचे आदेश दिले आहेत. अजित पवारांना सत्तेत घेण्याचा निर्णय हा केंद्रातून झाल्याने त्याच्यावर जास्त भाष्य न करता सध्याच्या घडीला अजित पवार गटाशी जुळवून घ्या, असेही सांगण्यात आले आहे.
दरम्यान, राष्ट्रवादीकडून अर्थ खात्यासह ऊर्जा, जलसंपदा, सहकार, सार्वजनिक बांधकाम आणि गृहनिर्माण या खात्यांची मागणी होत असल्याचं म्हटलं जात आहे. तर राष्ट्रवादीकडून सातारा, सांगली आणि पुणे या जिल्ह्याच्या पालकमंत्री पदासाठी आग्रह होत असून यासाठी अजित पवार दबावतंत्राचा वापर करीत असल्याने बोलले जात आहे.
□ राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना मिळाली ‘ही’ खाती
* अजित पवार – अर्थमंत्री
* छगन भुजबळ- अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण
* दिलीप वळसे पाटील – सहकार मंत्री
* धनंजय मुंडे – कृषी मंत्री
* हसन मुश्रीफ – वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य
* अदिती सुनिल तटकरे – महिला व बालविकास
* संजय बाबुराव बनसोडे – क्रीडा व युवक कल्याण, बंदरे
* अनिल पाटील – मदत पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन.
* धर्मरावबाबा भगवंतराव आत्राम – अन्न व औषध प्रशासन