मुंबई : मराठी हिंदी चित्रपटसृष्टी गाजवणाऱ्या अभिनेत्याचे निधन झाले आहे. भाड्याच्या घरात त्यांचा मृतदेह आढळला. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. रवींद्र हनुमंत महाजनी असे अभिनेत्याचे नाव आहे. ‘God’ of Marathi film industry lost, famous actor Ravindra Mahajani passed away in a rented house रवींद्र महाजनी यांचा मृतदेह मावळ येथील आंबी गावातील एका बंद खोलीत आढळून आला. देवता या चित्रपटामुळे त्यांनी चाहत्यांच्या मनावर राज्य केले. त्यामुळे मराठी चित्रपटसृष्टीचा ‘देवता’ हरपला असे अनेकजण बोलत आहेत.
मावळ तालुक्यातील आंबी येथे एका बंद खोलीत त्यांचा मृतदेह आढळला आहे. वयाच्या 77 व्या वर्षी त्यांचे आकस्मिक निधन झाले आहे. त्यांचे मुंबईचा फौजदार, देवता हे चित्रपट चांगलेच गाजले. महाजनी यांचा मृत्यू दोन ते तीन दिवसांपूर्वी झाल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. त्यांच्या घरातून वास येऊ लागल्याची माहिती पोलिसांना कळवल्यानंतर पोलिस घटनास्थळी पोहोचले तेव्हा हा प्रकार उघडकीस आला. त्यांच्या निधनाने अनेकांना धक्का बसला आहे.
तळेगाव एमआयडीसी पोलिस स्टेशनमधून मिळालेल्या माहितीनुसार मराठी चित्रपट अभिनेते रवींद्र महाजनी हे मागील 8 ते 9 महिन्यापासून आंबी (ता.मावळ) हद्दीतील एक्झर्बिया सोसायटीमध्ये राहत होते. त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाली होती. अंघोळ करून कपडे बदलत असताना त्यांचा मृत्यू झाल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. सदर बाब समजल्यानंतर पोलिस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी पंचनामा करुन मृतदेह ताब्यात घेतला. उद्या सकाळी नातेवाईक येणार आहेत.
रवींद्र महाजनी यांचा जन्म बेळगाव येथे झाला. त्यांचे वडील ह.रा. महाजनी हे ज्येष्ठ पत्रकार. त्यांचं संपूर्ण बालपण मुंबईत गेले. त्यांना लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती. शांतारामबापूंनी त्यांच्या नाटकाचा एक प्रयोग पाहिला आणि रवींद्र महाजनींना ‘झुंज’ या चित्रपटात मुख्य भूमिकेची संधी मिळाली. 1975 ते 1990 चा काळ त्यांनी दमदार अभिनयाच्या जोरावर गाजवला. दरम्यान, त्यांच्या निधनाने हळहळ व्यक्त केली जात आहे.
आपल्या सर्वांगसुंदर अभिनयाने रसिक प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे ज्येष्ठ मराठी अभिनेते रवींद्र महाजनी यांचे दुर्दैवी निधन झाले आहे. परमेश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती प्रदान करो. तसेच महाजनी परिवारास या दुःखातून सावरण्यासाठी बळ देवो हीच प्रार्थना. भावपूर्ण श्रद्धांजली, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्विट करत महाजनी यांना श्रद्धांजली वाहिली.
Ravindra Mahajani Passed Away : मुंबईचा फौजदार, देवता सारखे चित्रपट गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते रवींद्र महाजन यांचं निधन
#RavindraMahajani #Pune #MarathiCinema#drhemchandramangeshsamant #goregaoneast #goregaonwest pic.twitter.com/Wbak2Z21IG
— Dr.Hemchandra Samant (@HemchandraSam) July 15, 2023
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
आपल्या संपन्न अभिनय कलेतून रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते रविंद्र महाजनी यांचे निधन झाल्याची बातमी अतिशय वेदनादायी आहे. आपल्या भावस्पर्शी अभिनयाने रविंद्र महाजनी यांनी एक काळ गाजवला होता. त्यांच्या अकाली जाण्याने मराठी चित्रपट सृष्टीची मोठी हानी झालेली आहे. महाजनी कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत, असे शरद पवार यांनी ट्विट करत म्हटले.
● रविंद्र महाजनी यांचे गाजलेले चित्रपट
मराठी अभिनेते रवींद्र महाजनी यांचे निधन झाले आहे. देखणेपण, रुबाबदार, दमदार अभिनय या जोरावर त्यांनी अनेक चित्रपट गाजवले.
रवींद्र महाजनी यांनी हिंदी मराठी चित्रपटात अनेक अजरामर भूमिका केल्या आहेत. त्यांचे देवता, मुंबईचा फौजदार, झुंज, लक्ष्मी, गोंधळात गोंधळ, हळदी कुंकू असे चित्रपट प्रचंड गाजले आहेत. तसेच दिग्दर्शक, निर्माता म्हणून देखील त्यांनी काम केले. अभिनेत्री रंजना, उषा नाईक व आशा काळे आदी दिग्गज अभिनेत्रींसोबत त्यांनी चित्रपट केले. “खेळ कुणाला दैवाचा कळला” या प्रसिद्ध गाण्यातील रवींद्र महाजनी कुणीही विसरू शकत नाही.
* आराम हराम आहे *लक्ष्मी
* लक्ष्मीची पावलं * देवता
*गोंधळात गोंधळ *मुंबईचा फौजदार
*बेलभंडार * अपराध मीच केला
*काय राव तुम्ही *कॅरी ऑन मराठा
* देऊळ बंद * पानिपत