नाशिक : नाशिक येथे शासन आपल्या दारी कार्यक्रमासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार दाखल झाले आहेत. येथे त्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी मोठे विधान केले. Sharad Pawar is our inspiration; Saheb’s photo in the cabin – Ajit Pawar Nashik Government at your door शरद पवारसाहेबच आमचे प्रेरणास्थान, श्रद्धास्थान आहेत. माझ्या केबिनमध्ये मी पवारसाहेबांचा फोटो लावला आहे, असेही ते म्हणाले. तसेच सिल्व्हर ओकवर गेलो होतो तेव्हा तिथे पवारसाहेब आणि सुप्रिया सुळे होत्या, असेही ते म्हणाले.
उपमुख्यमंत्री अजित पवार हे ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमासाठी नाशिकमध्ये आले आहेत. यावेळी त्यांनी पत्रकारांसोबत संवाद साधला. विरोधी पक्षनेता निवडीवर अजित पवार यांना विचारले असता ते म्हणाले की, विरोधी पक्षनेता हा अधिवेशनावेळी निवडला जातो. तसेच तो निवडीबाबतचा अधिकार हा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना आहे. तसेच विरोधी पक्षनेत्याचे नाव हे विरोधकांना विधानसभा अध्यक्षांना द्यायचे असतात. त्यामुळे विरोधी पक्षनेताबाबतचा प्रश्न विरोधकांना विचारा, असे अजित पवार म्हणाले.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
अजित पवार म्हणाले, महायुतीच्या आमदारांमध्ये कुठेही कटुता न राहण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत. जो काम करतो तोच चुकतो व जो काम करत नाही तो चुकत नाही. त्यामुळे मी काम करणारा माणूस आहे. राजकारण राजकारणाच्या जागी आहे, तर परिवारही महत्त्वाचा आहे. त्यामुळे मी शुक्रवारी प्रतिभा पवार यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी सिल्व्हर ओकवर गेलो होते, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. त्यावेळी कुठल्याही इतर राजकीय विषयावर चर्चा झाली नसल्याचेही त्यांनी सांगितले.
उपमुख्यमंत्री अजित पवार काल सिल्व्हर ओकवर दाखल झाले होते. शरद पवारांच्या पत्नी प्रतिभाताई पवार यांच्यावर शस्त्रक्रिया झाली आहे. शस्त्रक्रियेसाठी त्या दुपारी रुग्णालयात दाखल झाल्या होत्या. याच पार्श्वभूमीवर काकू प्रतिभाताईंच्या तब्येतीची चौकशी करण्यासाठी अजित पवार सिल्व्हर ओकवर गेले होते. दरम्यान, राष्ट्रवादीतील बंडानंतर पहिल्यांदाच अजित पवार हे शरद पवार यांच्या घरी दाखल झाले होते. यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या.
शुक्रवारी काकींचे (प्रतिभा पवार) ऑपरेशन झाले होते. मला भेटायला थोडासा विलंब झाला होता. सुप्रियाने सिल्व्हर ओकवर बोलावले होते. त्यामुळे मी काकींना भेटण्यासाठी सिल्व्हर ओकवर गेलो होते. राजकारण राजकारणाच्या ठिकाणी, भारतीय संस्कृतीत परिवाराला महत्व आहे. शरद पवारपण तिथे होते. इतर कुठलीही चर्चा त्यावेळी झाली नसल्याचे अजित पवार यांनी सांगितले. पुढे ते म्हणाले की, भेटीदरम्यान शरद पवार यांनी मला एक पत्र दिले आहे. शिक्षण विभागाबाबत ते पत्र होते. त्याबाबत नक्कीच विचार केला जाईल.