● विमानतळावरील शासनाचे नाव कमी करण्याच्या प्रक्रियेला वेग
– जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली बैठक
– अतिक्रमण केलेल्यांना नोटीसा देण्याची सूचना
सोलापूर : होटगी रोडवरील विमानतळावर विमानसेवा चालू करण्यासाठी सिध्देश्वर कारखान्याची अडथळा असलेली चिमणी जमीनदोस्त झाल्यानंतर या विमानतळावर विमानसेवा चालू करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. Solapur airport aviation running moving speed solapur authority overage notice
मात्र सदरच्या विमानतळाच्या जागेवर शासनाचेच नाव आहे. विमान प्राधिकरणाचे नाव नसल्याचे निष्पन्न झाल्यानंतर शासनाचे नाव कमी करण्याच्या संदर्भात हालचालींना वेग आला आहे. ही या संदर्भात शुक्रवारी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, खा. डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांनी अधिकारी आणि अधिका-यांची बैठक जागेवर विमानतळ प्राधिकरणाचे नाव लावणे विमानतळाच्या जागेत झालेल्या अतिक्रमणांचा सर्व्हे करून त्यांना नोटिसा देण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या.
सोलापुरातील विमान चालू सेवा करण्यासाठी आता हालचाली चालू आहेत. खा. जयसिध्देश्वर शिवाचार्य महास्वामी पाठपुरावा करत आहेत. मात्र विमानसेवा चालू करण्यासंदर्भात अनेक अडचणीचा सामना विमानतळ प्राधिकरणाला करावा लागत आहे.
६४ एकर विमानतळ जागेवर अद्याप शासनाचे नाव आहे. हे नाव कमी केल्या शिवाय विमानसेवा चालू करता येणार नसल्याने विमान प्राधिकरणाचे नाव लावण्या संदर्भात प्रक्रियेला वेग आला आहे. शुक्रवारी या संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली. या बैठकीत खा. डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी, अप्पर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे,
महापालिका आयुक्त शीतल तेली- उलगे, विमानतळ प्राधिकरणाचे व्यवस्थापक बानोत, सहाय्यक व्यवस्थाप नागनाथ मंठाळकर, अग्निशामक दलाचे अधीक्षक केदार आवटे, वांच्यासह विविध विभागाचे अधिकारी, तहसीलदार उपस्थित होते.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
या बैठकीत जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी विमानतळाच्या ६४ एकर जागेवर शासनाचे नाव कमी करून लवकरच महाराष्ट्र विमान प्राधिकरणाचे नाव लागण्या संदर्भात सूचना केल्या. महाराष्ट्र वीज महामंडाळचे अनेक उंच पोल विमान क्षेत्रात येत असल्याने हे पोलची उंची कमी करण्यासंदर्भात महाराष्ट्र महावितरण कंपनीला योग्य त्या सूचना जिल्हाधिकान्यांनी दिल्या.
विमानतळाची पाणीपुरवठ्याची ३७ लाखांची पाणीपट्टी थकीत आहे. त्यामुळे विमानतळाचा पाणीपुरवठ्यात तोडण्यात आला आहे. या संदर्भात वरिष्ठ पातळीवर विमान प्राधिकरणाने पाठपुरावा करून थकबाकी तात्काळ भरावी आणि महापालिका प्रशासनाने तो पाणी पुरवठा सुरळीत करावा अशा सूचना देखील जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या.