● पोलिस शिक्षकाची धिंड काढणार का? पालकांतून संतप्त सवाल
कुर्डुवाडी : महाविद्यालयातून घरी चालत निघालेल्या मुलीस शिक्षकाने तिच्या समोर मोटरसायकल आडवी लावून, तिचा हात पकडून तू मला आवडतेस असे म्हणत होकार दे, नाहीतर मी तुझ्या भावाला ठार मारेन अशी धमकी दिल्याची घटना घडलीय. यात पालक खूप संतप्त झाले आहेत. Teacher teases girl, threatens to kill brother Solapur Kave Kurduwadi Dhind Police parents angry
ही घटना दि. १ जून रोजी, दुपारी १२.५० वाजणेच्या दरम्यान कव्हे (ता. माढा) शिवारात घडली. पिडीतेने भीतीपोटी दि. २१ जुलै रोजी, कुर्डूवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. यावरून एका शिक्षका विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणात कव्हे (ता.माढा ) येथील प्रबोधनकार ठाकरे विद्यालयातील शिक्षक पांडुरंग यादव याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माहिती अशी की, परगावी शिकत असलेल्या महाविद्यालयास सुट्टी असल्याने पिडीत मुलगी आपल्या गावाकडे चालत जात असताना काही अंतरावर गेल्यानंतर प्रबोधनकार ठाकरे विद्यालय कव्हे येथील शिक्षक पांडुरंग यादव यांने मोटरसायकल आडवी लावून वाट आडवली.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
पीडिता एकटी असल्याचे पाहून त्याने तिचा हात पकडून तू मला आवडतेस असे म्हणत होकार दे नाहीतर तुझा भाऊ शाळेत एकटा जातो येतो तुही एकटी ये-जा करतेस असे म्हणून तू जर मला नकार दिलास तर मी तुला व तुझ्या भावाला जिवे ठार मारेन व तुझ्या आईला तुझे बाहेर प्रेमसंबंध आहेत असे सांगेन तसेच तुझे शिक्षण बंद करायला लावेन, अशी धमकी देवून तो तेथून निघून गेला.
पीडिता रडत घरी गेल्यावर घडलेला प्रकार आईला सांगितला. यानंतर या शिक्षकाने पीडिताच्या आईला वारंवार फोन करून तुमच्या मुलीचे गावातील मुलाशी प्रेमसंबंध आहेत. त्याच्या बरोबर पळून जाणार आहे असे सांगत होता. पिडीत मुलगी आईसह पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी येणार होती. परंतु शिक्षक पांडुरंग यादव याने तू जर माझ्या विरोधात तक्रार दिल्यास तुझ्या आईसह भावास ठार मारेन, अशी धमकी दिल्याने पीडिता घाबरल्याने तक्रार देण्यास येऊ शकली नसल्याचे म्हटले.
२१ जुलै, शुक्रवार रोजी धाडस करून शिक्षक पांडुरंग यादव याच्या विरोधात पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून, शिक्षका विरोधात भा.दं.वि.३५४(अ), ३५४ (ड)३४१,५०६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कुर्डूवाडी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक यांनी नुकतेच मुलींची छेड काढाल तर शहरातून धिंड काढली जाईल असे प्रसार माध्यमांसमोर सांगितले होते. या शिक्षकाची धिंड काढणार का? असा सवाल ग्रामीण भागासह शहरातील पालक वर्गातून प्रश्न उपस्थित केला जात आहे.