सोलापूर : तब्बल 41 आयएएस अधिकाऱ्यांच्या आज बदल्या केल्या आहेत. त्यामध्ये सोलापूरच्या जिल्हाधिकारी पदी गडचिरोली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद यांची नियुक्ती केली आहे. सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आपला साडेतीन वर्षाचा कार्यकाल पूर्ण केला असून कोरोना काळातील त्यांचे काम उल्लेखनीय होते. As many as 41 IAS officers transferred, Kumar Ashirwad Milind Sunderkar Tukaram Mundhe as Collector of Solapur
राज्य सरकारने शुक्रवारी रात्री प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश जारी केले. मिलिंद शंभरकर यांची महात्मा फुले जनआराेग्य आराेग्य याेजनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती झाली आहे. सीईओ दिलीप स्वामी यांची बदली झाली असली तरी त्यांची नव्या जागी नियुक्ती झालेली नाही.
सोलापूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रांताधिकारी क्रमांक दोन मनीषा आव्हाळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांना साडेतीन वर्षे पूर्ण झाले आहेत तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांना ही अडीच वर्षे पूर्ण होऊन गेले आहेत.
दिलीप स्वामी व मिलिंद शंभरकर या जोडीने कोरोनाच्या लाटेमध्ये अतिशय चांगले काम केल्याचे पाहायला मिळाले. जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी कोरोनाच्या दोन्ही लाटेत चांगल्या पद्धतीने
सोलापूरला काम केले या दोन्ही लाटे मधून त्यांनी सोलापूरला बाहेर काढले होते. जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांना महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी नियुक्ती देण्यात आली आहे.
● तुकाराम मुंढे यांची दीड महिन्यात पुन्हा बदली
राज्यातील 41 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. राज्य सरकारने यासंदर्भात एक परिपत्रक जारी केले आहे. अवघ्या एका महिन्यापूर्वीच मराठी भाषा विभागात बदली करण्यात आलेल्या तुकाराम मुंढे यांची पुन्हा एकदा बदली करण्यात आली आहे. त्यांना आता पशुसंवर्धन आणि दुग्ध विकासाच्या सचिवपदाचा पदभार देण्यात आला आहे.
राज्यातील 41 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यासंबंधी राज्य सरकारने एक परिपत्रक जारी करण्यात आले आहे. विशेष म्हणजे कायम चर्चेत असणारे सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांची अवघ्या दीड महिन्यात पुन्हा बदली करण्यात आली आहे.
तुकाराम मुंढे यांची गेल्या 16 वर्षांत तब्बल 20 वेळा बदली करण्यात आली आहे. महिन्याभरापूर्वीच त्यांना कृषी व पशुसंवर्धन खात्याच्या अतिरिक्त मुख्य सचिव पदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
□ 41 अधिकाऱ्यांच्या बदल्यांची यादी पुढीलप्रमाणे
1. राजेंद्र शंकर क्षीरसागर – मुख्य सचिव कार्यालयाचे सहसचिव, मंत्रालय, मुंबई यांची जिल्हाधिकारी, मुंबई शहर मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
2. वर्षा ठाकूर-घुगे – मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, नांदेड यांची जिल्हाधिकारी लातूर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
3. संजय चव्हाण – मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, कोल्हापूर यांची अतिरिक्त मुद्रांक नियंत्रक, मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
4. आयुष प्रसाद – मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, पुणे यांची जिल्हाधिकारी, जळगाव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
5. बुवनेश्वरी एस – मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, धुळे यांची जिल्हाधिकारी, वाशिम म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
6. अजित कुंभार – सह आयुक्त, बृहन्मुंबई महानगरपालिका यांची अकोला येथील जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
7. डॉ. श्रीकृष्णनाथ बी. पांचाळ – मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, यवतमाळ यांची जिल्हाधिकारी, जालना म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
8. डॉ. पंकज आशिया – मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, जळगाव यांची यवतमाळ येथे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
9. कुमार आशीर्वाद – मुख्य कार्यकारी अधिकारी, Z.P., गडचिरोली यांची जिल्हाधिकारी, सोलापूर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
10. अभिनव गोयल – मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, लातूर यांची जिल्हाधिकारी, धुळे म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
11. सौरभ कटियार – मुख्य कार्यकारी अधिकारी, झेडपी, अकोला यांची जिल्हाधिकारी, अमरावती म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
12. तृप्ती धोडमिसे – प्रकल्प अधिकारी-सह-सहाय्यक जिल्हाधिकारी धुळे यांची मुख्य कार्यकारी अधिकारी, झेडपी, सांगली म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
13. अंकित,- प्रकल्प अधिकारी-सह-सहाय्यक जिल्हाधिकारी अहेरी, गडचिरोली यांची मुख्य कार्यकारी अधिकारी, झेडपी, जळगाव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
14. शुभम गुप्ता – प्रकल्प अधिकारी-सह-सहाय्यक जिल्हाधिकारी अटापली SDO, पो.भारमरागड, ITDP, गडचिरोली यांची मुख्य कार्यकारी अधिकारी, ZP, धुळे म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
15. मीनल करनवाल – प्रकल्प अधिकारी-सह-सहाय्यक जिल्हाधिकारी, ITDP, नंदुरबार NANDURBAR यांची मुख्य कार्यकारी अधिकारी, Z.P., नांदेड म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
16. डॉ. मैनाक घोष – प्रकल्प अधिकारी, ITDP, गडचिरोली -सह-सहाय्यक जिल्हाधिकारी, गडचिरोली यांची मुख्य कार्यकारी अधिकारी, Z.P., यवतमाळ म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
17. मनीषा माणिकराव आव्हाळे – प्रकल्प अधिकारी-सह-सहाय्यक जिल्हाधिकारी, ITDP, सोलापूर यांची मुख्य कार्यकारी अधिकारी, Z.P., सोलापूर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
18. सावन कुमार – प्रकल्प अधिकारी-सह-सहाय्यक जिल्हाधिकारी, धारणी, ITDP, अमरावती यांची मुख्य कार्यकारी अधिकारी, Z.P., नंदुरबार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
19. अनमोल सागर – सहाय्यक जिल्हाधिकारी, देवरी उपविभाग, गोंदिया यांची मुख्य कार्यकारी अधिकारी, Z.P., लातूर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
20. आयुषी सिंह – प्रकल्प अधिकारी-सह-सहाय्यक जिल्हाधिकारी, जव्हार, ITDP, पालघर यांची मुख्य कार्यकारी अधिकारी, Z.P., गडचिरोली म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
21. वैष्णवी बीव – सहायक जिल्हाधिकारी, तुमसर उपविभाग, भंडारा यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प., अकोला.
22. पवनीत कौर – जिल्हाधिकारी, अमरावती यांची संचालक, GSDA, पुणे म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
23. गंगाथरण डी – जिल्हाधिकारी, नाशिक यांची बृहन्मुंबई महानगरपालिका सह आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
24. अमोल जगन्नाथ येडगे – जिल्हाधिकारी, यवतमाळ यांची महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद (MSCERT), पुणे येथे नियुक्ती करण्यात आली आहे.
25. शनमुगराजन एस – जिल्हाधिकारी, वाशिम यांची अतिरिक्त विकास आयुक्त (उद्योग), मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
26. विजय चंद्रकांत राठोड – जिल्हाधिकारी, जालना यांची सह मुख्य कार्यकारी अधिकारी, Mah.Industrial Devp.Corpn., मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
27. निमा अरोरा – जिल्हाधिकारी अकोला यांची संचालक, माहिती तंत्रज्ञान, मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
28. वैभव दासू वाघमारे – यांची प्रकल्प अधिकारी-सह-सहाय्यक जिल्हाधिकारी, अहेरी, गडचिरोली म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
29. संतोष सी. पाटील – उपमुख्यमंत्र्यांचे सहसचिव यांची मुख्य कार्यकारी अधिकारी, Z.P., कोल्हापूर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
30. आर.के.गावडे – मुख्य कार्यकारी अधिकारी, Z.P., नंदुरबार यांची जिल्हाधिकारी, परभणी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
31. आंचल गोयल – जिल्हाधिकारी, परभणी यांना अतिरिक्त महापालिका आयुक्त, नागपूर महानगरपालिका, नागपूर म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.
32. संजय खंदारे – यांची मुख्य सचिव, पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभाग, मंत्रालय, मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
33. तुकाराम मुंढे – सचिव, मराठी भाषा विभाग, मंत्रालय, मुंबई यांची सचिव (AD), कृषी आणि ADF विभाग, मंत्रालय, मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
34. जलज शर्मा – जिल्हाधिकारी धुळे यांची जिल्हाधिकारी, नाशिक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
35. डॉ. ए.एन.करंजकर – आयुक्त, ESIS, मुंबई यांची महापालिका आयुक्त, नाशिक महानगरपालिका, नाशिक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
36. आर.एस.चव्हाण – सहसचिव, महसूल आणि वन विभाग, मंत्रालय, मुंबई यांची मुख्य कार्यकारी कार्यालयात नियुक्ती करण्यात आली आहे.
37. रुचेश जयवंशी – यांची मुख्य कार्यकारी अधिकारी, NRLM, मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
38. पृथ्वीराज बी.पी. – जिल्हाधिकारी, लातूर यांची मुख्य कार्यकारी अधिकारी, स्मार्ट सिटी, नागपूर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
39. मिलिंद शंभरकर – जिल्हाधिकारी, सोलापूर यांची मुख्य कार्यकारी अधिकारी, महात्मा फुले जन आरोग्य योजना सोसायटी, राज्य आरोग्य विमा संस्था, मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
40. मकरंद देशमुख – उपायुक्त (महसूल), कोकण विभाग, मुंबई यांची सहसचिव, मुख्य सचिव कार्यालय, मंत्रालय, मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
41. डॉ. बी.एन.बस्तेवाड – मुख्य महाव्यवस्थापक (L&S), MSRDC, मुंबई यांची मुख्य कार्यकारी अधिकारी, Z.P., रायगड म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.