● अमावस्येच्या दिवशी मुलगा बेपत्ता, डोक्यावरचे केसही काढले
नाशिक – गुप्तधन मिळावे म्हणून 9 वर्षाच्या मुलाचा बळी देण्यात आला आहे. Maharashtra shook…human sacrifice for secret money, four arrested and one absconding Malegaon Nashik Police मालेगावच्या पोहाणे येथील ही खळबळजनक घटना आहे. या प्रकरणी भोंदूबाबाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या. तर 4 आरोपींना अटक करण्यात आली आहे. तर एक जण फरार आहे. रोमा बापू मोरे, रमेश लक्ष्मण सोनवणे, गणेश लक्ष्मण सोनवणे, लक्ष्मण नवल सोनवणे, उमाजी गुलाब मोरे यांनी भोंदूबाबाचे ऐकूण कृष्णा सोनवणे या बालकाचे अपहरण करुन हत्या केल्याचा आरोप आहे.
हा गुन्हा काही फार काळ लपला नाही. कृष्णाच्या पालकांनी मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन तपासाची चक्रे फिरवली. नाशिक ग्रामीण पोलिसांच्या तपासात ही बाब समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी ४ जणांना ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सहा दिवसांपासून बेपत्ता असलेल्या तालुक्यातील पोहाणे येथील नऊ वर्षीय बालकाची हत्या झाल्याचे आणि मृतदेह पुरलेल्या अवस्थेत आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. हा नरबळीचा प्रकार असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. कृष्णा सोनवणे (९) असे हत्या झालेल्या बालकाचे नाव आहे. दरम्यान, पोलीसांनी या प्रकरणी चार संशयितांना ताब्यात घेतले. गुप्तधनाच्या लालसेतुन हा प्रकार घडल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
कृष्णाचे वडील अनिल सोनवणे हे पोहाणे शिवारात वनखात्याने दिलेल्या जमिनीत वास्तव्यास आहेत. गेल्या रविवारी दुपारी कृष्णा दोघा मित्रांसह घराशेजारी खेळत होता. काही वेळानंतर कृष्णा एका मित्रासह तेथून दुसरीकडे निघून गेला. त्यानंतर सायंकाळपर्यंत तो घरी न परतल्याने त्याची शोधाशोध सुरु झाली. मात्र त्याचा तपास लागू शकला नाही. तेव्हा त्याचे अपहरण झाले असल्याची तक्रार वडनेर-खाकुर्डी पोलिसात देण्यात आली. त्याचा शोध सुरु असतानाच गुरुवारी पोहाणे शिवारातील जंगलात एके ठिकाणी त्याचा मृतदेह पुरुन ठेवल्याचे गावकऱ्यांना आढळून आले.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. तहसीलदार नितीनकुमार देवरे यांच्या उपस्थितीत पोलिसांनी हा मृतदेह बाहेर काढला व शवविच्छेदनासाठी धुळ्याच्या वैद्यकीय रुग्णालयात पाठवला. या बालकाचा गळा चिरलेला तसेच मृतदेहासोबत एक चाकूही पुरुन ठेवल्याचे आढळून आले. त्यामुळे कृष्णाची हत्या करुन मृतदेह पुरुन ठेवला असण्याचा पोलिसांचा कयास होता.
कृष्णा हा अमावस्येच्या दिवशी बेपत्ता झाला होता. त्याच्या डोक्यावरचे केसही काढल्याचे आढळून आल्याने हा नरबळीचा प्रकार असण्याचा संशय गावकऱ्यांनी व्यक्त केला. गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेण्यासाठी घटनास्थळी श्वान पथक, ठसेतज्ज्ञ तसेच न्यायवैद्यक प्रयोगशाळेच्या पथकाला पाचारण करण्यात आले. तपासाच्या दृष्टीने पोलिसांनी पाच पथके गठित केली.
घटनास्थळावर पुरण्यात आलेल्या वस्तू आणि श्वान पथकाने घेतलेला माग यातून आरोपी पोहणे गावातील असल्याचे लक्षात आले. वेगवेगळ्या पथकाच्या मदतीने पोलीसांनी उमाजी मोरे (४२, रा. पोहाणे) याला ताब्यात घेत चौकशी केली. त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याने रोमा मोरे २५ , रमेश सोनवणे २१, गणेश सोनवणे १९ , लक्ष्मण सोनवणे ४५ यांच्या मदतीने हा गुन्हा केला. लक्ष्मण सोनवणे फरार आहे. हा प्रकार गुप्तधनाच्या लालसेपोटी झाला असून आरोपीनी मुलाला जीवे ठार मारले. संशयितांना न्यायालयात हजर केले असता त्यांना सात दिवसांची पोलीस कोठडी मंजुर करण्यात आली आहे.