कुर्डुवाडी : दारु समजून कोंबड्यांसाठी आणलेले औषध प्यायल्याने एका तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना बुधवारी ( दि. १९) १० वाजण्याच्या सुमारास कुर्डू येथील कुकुटपालन येथे घडली. सतीश महादेव शिंदे (वय ४५ रा. रेल्वे हाॅस्पीटलच्यामागे कुर्डुवाडी) असे मयताचे नाव आहे. Kurduwadi Solapur died after drinking medicine brought for chickens mistaking it for alcohol
याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की शुभम बोराडे (रा. भोगेवस्ती कुर्डू ) यांची कुर्डू येथे शेती असून शेतात कुकुटपालन ही आहे. दि. १८ रोजी बोराडे यांनी कुक्कुटपालन साफसफाई करिता कुर्डुवाडी येथील चंद्रकांत कुलकर्णी यांना सांगितले होते. त्याप्रमाणे कुलकर्णी हे दि.१९ रोजी सकाळी ७ वा. कुक्कुटपालन साफसफाई करिता सतीश महादेव शिंदे, भगवान भोसले,भास्कर श्रीमंत माने ,संदीप राठोड यांना घेऊन कुर्डू येथे गेले. त्यावेळी बोराडे हे त्यांना आपल्या गाडीतून कुक्कुटपालनकडे घेऊन गेले व काम व्यवस्थित करा म्हणून दुसऱ्या कुकुटपालनाकडे गेले.
त्यानंतर सकाळी १०.०६ मि चंद्रकांत कुलकर्णी यांनी बोराडे यांना फोन करुन सांगितले की, आमचे साफसफाईचे काम संपत आले असताना सतीश महादेव शिंदे व भास्कर श्रीमंत माने हे ड्रमच्या शेजारी बसून काही तरी पित होते. त्यानंतर त्यांना उलट्या होण्यास सुरुवात झाली. त्यावेळी कुलकर्णी यांनी त्यांना काय झाले हे विचारले असता सतीश महादेव शिंदे म्हणाला ड्रममध्ये दारु आहे असे समजून आम्ही ती पिलो तेंव्हापासून उलट्या व मळमळ होऊ लागले आहे, मला दवाखान्यात घेऊन चला, अशी मागणी केली.
बोराडे यांना गाडीत घालून त्यांना कुर्डुवाडी येथील सरकारी दवाखान्यात आणले, त्यावेळी डाॅक्टरांनी तपासून सतीश महादेव शिंदे हा मयत झाला असल्याचे सांगितले व भास्कर माने याच्यावर औषधोपचार केल्यानंतर त्याची प्रकृती बरी असल्याने त्याला डिस्चार्ज देण्यात आला आहे. पुढील तपास पो.काॅ.नितीन गोरे हे करीत आहेत.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
○ दोन हजाराच्या सव्वा कोटी नोटा देतो म्हणून 25 लाखास गंडविले, माळशिरस तालुक्यातील घटना
सोलापूर – तुम्ही आम्हाला २५ लाख रुपये द्या, आम्ही तुम्हाला २ हजार रुपयाच्या सव्वा कोटीच्या नोटा देतो. अशी थाप मारून पुण्यातील तिघा भामट्यानी भांबुर्डी येथील इसमास पंचवीस लाख रुपयास गंडविले.
ही घटना भांबुर्डी (ता. माळशिरस) येथे शनिवारी (ता. १५) दुपारच्या सुमारास घडली. यासंदर्भात नामदेव जयराम वळकुंद्रे (वय २९ रा.मेडद ता.माळशिरस) यांनी पोलिसात फिर्याद दाखल केली. त्याप्रमाणे माळशिरसच्या पोलिसांनी नवनाथ उर्फ नाथा (रा वाघोली जि .पुणे) आणि त्याच्या दोघा साथीदाराविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
नामदेव वलकुंद्रे (रा.मेडद) यांचा माळशिरस परिसरात गॅरेजच्या व्यवसाय आहे. त्यांचे मामा सोमनाथ वाघमोडे हे भांबुर्डी येथे राहतात. पुण्यातील त्यांच्या परिचयात असलेल्या नवनाथ उर्फ नाथा याने वाघमोडे यांना आमच्याकडे दोन हजार रुपये किमतीच्या भरपूर नोटा आहेत. तुम्ही आम्हाला शंभर आणि पाचशे रुपयाच्या नोटा दिल्यास आम्ही तुम्हाला पाचपट दोन हजार रुपयाच्या नोटा देतो असे सांगितले होते.
त्याप्रमाणे सोमनाथ वाघमोडे यांनी शनिवारी दुपारी नवनाथ उर्फ नाथा याला २५ लाख रुपये दिले. त्यानंतर तिघांनी पैसे घेऊन पोबारा केला . आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी माळशिरस पोलिसात फिर्याद दाखल केली. पुढील तपास फौजदार पुजारी करीत आहेत.